संपादने
Marathi

२३वर्षांपासून गरीब मुलांना साक्षर करण्यासाठी त्यांनी सोडले घर, लोक आता त्यांना ‘सायकल टीचर’ म्हणून ओळखतात!

17th Apr 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

ज्यांचे मनौधैर्य मजबूत असते, ज्यांचे विचार उच्च असतात आणि समाजाला बदलण्याची ज्यांच्यात क्षमता असते, असे खूप कमी लोक असतात. असेच काही लोक समाजासाठी जगतात, त्यासाठी काम करतात आणि त्यांच्यासमोर कितीही संकट आले तरी ते मागे हटत नाहीत. अशाच एक व्यक्ती आहेत, लखनौचे आदित्य कुमार. सायकल टीचरच्या नावाने प्रसिद्ध असलेले आदित्य मागील २३वर्षापासून सायकलवर फिरून गरीब आणि घर दार नसलेल्या मुलांना शिकवत आहेत. सध्या आदित्य जवळपास १५००मुलांना मोफत शिक्षण देत आहेत. 

image


आदित्य कुमार यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या फर्रूखाबादमध्ये झाला होता, अनेक आर्थिक अडचणी असूनही, त्यांनी कानपूर येथून बायोलॉजी मधून बीएससी केले. बीएससी केल्यानंतर ते कानपूर मध्येच गरीब मुलांना शिकविण्याचे काम करायला लागले, त्यामुळे ते त्या मुलांकडून पैसे देखील घेत नव्हते. दु:खातून जात असलेल्या कुटुंबाला त्यांची ही सवय आवडत नव्हती आणि ते त्यांच्यापासून नाराज रहायला लागले. त्यांच्या कुटुंबाला वाटत होते की, आदित्य यांनी नोकरी करून घरची परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करावी, मात्र आदित्य यांच्यावर कुठलाही फरक पडला नव्हता. ते केवळ गरीब मुलांना साक्षर करण्यासाठी झगडत होते.

image


घरातल्या लोकांच्या दबावामुळे, आदित्य यांना एक दिवशी स्वतःचे घर सोडावे लागले आणि ते लखनौला आले. आता ते मुक्त होते आणि स्वतःच्या मनाप्रमाणे काम करत होते. लखनौला आल्यानंतर ते काही दिवस चारबाग रेल्वे स्टेशनवर राहिले. सुरुवातीला त्यांनी स्टेशनवर भीक मागणा-या मुलांना शिकविण्याचे काम केले. हळू हळू त्यांना काही अभ्यासवर्ग मिळाले, ज्यामुळे त्यांचा खर्च चालू लागला. त्यानंतर ते बगीचा, रस्त्याच्या कोप-याला अशा मुलांना शिकवायला लागले, जे काही कारणांमुळे शाळेत जाऊ शकत नव्हते. 

image


आदित्य मागील २३वर्षापासून गरीब मुलांना मोफत शिक्षण देत आहेत. त्यासाठी ते सायकलवर स्वार होऊन वेगवेगळ्या झोपडपट्टीत जात होते आणि तेथे निरक्षर मुलांना शिकविण्याचे काम करतात. ते सांगतात की, “जेथे मला मुले मिळतात, माझी सायकल त्यांना शिकविण्यासाठी तेथे थांबते.” या कामात त्यांचे काही सहयोगी देखील त्यांची मदत करतात. हळू हळू लोक त्यांना ओळखायला लागले आणि लोक त्यांना प्रोत्साहित करायला लागले. 

image


मागील १४महिन्यांपासून आदित्य शिक्षणाचा प्रसार देशभरात पसरवण्याच्या अभियानात सामील आहेत. त्यासाठी ते सायकल मार्फत देशातील वेगवेगळ्या राज्यांची यात्रा करत आहेत. आपल्या या यात्रेची सुरुवात त्यांनी लखनौपासून केली आहे. आदित्य सांगतात की,“मी एकटा संपूर्ण देशाला साक्षर करू शकत नाही, मात्र आपल्या सायकल मार्फत प्रत्येक त्या भागात पोहोचण्याचा प्रयत्न करतो, जेथे माझी गरज असते.” सध्या ते आपल्या या अभियानासाठी जयपूर मध्ये आहेत. 

image


आदित्य आपल्या या कामाला एक अभियान नव्हे तर, आपले कर्तव्य समजतात. लखनौमध्ये त्यांनी जवळपास सहा हजार मुलांना आतापर्यंत मोफत शिकविले आहे. त्यासाठी ते अभ्यास वर्गातून मिळणा-या पैशातून मुलांसाठी पुस्तके आणि दुसरी सामग्री देखील विकत घेतात. आज त्यांनी साक्षर केलेली मुले मोठ्या पदावर पोहोचले आहेत. ते मोठ्या गर्वाने सांगतात की, “आज मी शिकविलेला एक मुलगा वकील बनला आहेत तर, काही मुलांना सरकारी नोकरी मिळाली आहे आणि काही मुले स्वतःचा व्यवसाय करत आहेत.”

शिक्षणाच्या क्षेत्रात आदित्य कुमार यांच्या प्रयत्नांमुळेच त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये दाखल आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी नावाजण्यात आले आहे. आपल्या समस्येबाबत त्यांचे म्हणणे आहे की, कधी कधी ते शिकविता शिकविता इतके थकतात की, त्यांचा आवाज देखील निघत नाही. सोबतच कायम प्रवास केल्यामुळे त्यांना कमजोरी देखील वाटते. आदित्य यांची सरकारविरोधी तक्रार आहे की, २३ वर्षापासून शिक्षणाच्या क्षेत्रात काम करूनही, त्यांची दखल घेणारे कुणीच नाही. आदित्य सांगतात की, “मला गुगलने देशातील पहिल्या क्रमांकाच्या शिक्षकाचे स्थान दिले, असे असूनही कोणतीही संस्था किंवा सरकारी अधिकारी माझ्या मदतीसाठी पुढे आले नाही.”

मजबूत विचारांचे आदित्य मानतात की, कुणी त्यांची मदत करो किंवा न करो, मात्र जोपर्यंत ते जिवंत आहेत, तोपर्यंत ते गरीब आणि मागासवर्गीय लोकांच्या मुलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करत राहतील.

रोज पोहत जाऊन मुलांना शिकवणारे शिक्षक ज्यांनी वीस वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही

‘डोरस्टेप स्कूल’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारी शाळा, साक्षरतेला प्रत्येक स्तरावर पोहोचविण्याचा आगळा वेगळा प्रयत्न! 

विदेशातील नोकरीसोडून सुरू केली शाळा, शिक्षणासोबतच मुलींना जीवनात उभे करण्यासाठी वयाच्या ७६व्या वर्षीही धडपडणारे विरेंद्र सँम सिंह!

लेखक : गीता बिश्त

अनुवाद : किशोर आपटे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags