जीवाष्मांच्या मदतीने तुमचे घर किटकमुक्त करणारे स्टार्टअप सुरु केले महिला उद्योजिकेने!

1 CLAP
0

ज्यावेळी घरगुती उदयोगांची सुरुवात मोठ्या प्रमाणात होत आहे, ‘अरबन्स’ ने नैसर्गिक मार्गाने जात रेताड जमिनीत वाढणा-या जिवाश्माच्या मदतीने किटकनाशके आणि जंतू नाशके तयार केली. 

रात्र खूप झाली आहे, १वाजून गेला आहे, सकाळी उठून तुम्हाला महत्वाच्या बैठकीसाठी जायचं आहे, पण घरातल्या किटकांनी तुम्हाला झोपू देण्यास मज्जाव केला आहे अशावेळी तुमची चीडचीड होणारच ना. तुमच्या सारखाच हा प्रश्न अनेकांचा असतो, तसाच ३७ वर्षांच्या टाईम्स ऑफ इंडियाच्या पत्रकार आणि औद्योगिक आरेखिका पुजा जैन- हंसारिया यांचाही होता म्हणूनच त्यांनी मागील वर्षी स्टार्टअप सुरू केला ‘अरबँन्स’. त्यांच्या या स्टार्टअपच्या माध्यमातून घरातील किटकांचा नाश केला जातो, घर किडेमुक्त केले जाते. मात्र नैसर्गिक पध्दतीने कोणतेही रसायन किंवा हानीकारक पदार्थ न वापरता केवळ नैसर्गिक क्षार वापरून.

हे उत्पादन एक प्रकारच्या रेताड जमिनीत येणा-या जिवाश्मापासून तयार केले जाते. त्यातील सुक्ष्म घटक असतात जे कीटकांचा नायनाट करतात. किटकांचे रस शोषून घेत ते त्यांना मारून टाकते आणि ते रसायन मुक्त असल्याने वापरण्यास सुरक्षित आहे.


पार्श्वभूमी 

हे उत्पादन कसे काम करते ते सांगताना पुजा म्हणाल्या की, “ आम्ही कृषीतज्ज्ञांच्या चमू सोबत काम करत आहोत, जेणे करून त्यातून किटकनाशक तयार होईल जे सेंद्रीय पध्दतीने किटनाशक असेल. दर्जा चा विचार करून आम्ही त्यात काही अनिवार्य प्रक्रिया करत आहोत. हे उत्पादन सहज परवडणा-या किमतीत असेल आणि घरात वापरण्यास सुरक्षित असेल.

अनेकांना असे वाटते की ढेकूण फक्त हॉटेलात किंवा सार्वत्रिक रहिवासाच्या ठिकाणीच असतात, असेच त्यानाही वाटायचे, मात्र २०१४मध्ये त्यांच्या घरात ढेकूण दिसले त्यावेळी त्या घाबरल्या. दोन आठवडे तर त्यांना वाटले की जे झोपेत चावते ते डास असतील, “पण एका रात्री ते डोळ्यांनी पहायला मिळाले आणि झोप उडाली. बंगळूरूच्या आमच्या घरात त्यांचे प्रमाण इतके झाले की, शयनगृहात सगळीकडे ते दिसू लागले.”पूजा सांगतात.

पेस्ट कंट्रोल करणा-यांना, शोधले तर ते महागडे होते. त्यांना या त्रासातून लवकर मोकळे व्हायचे होते, त्या दरम्यान शोध घेताना पूजा यांना या रेताड जमिनीत वाढणा-या जिवाश्माची माहिती मिऴाली ज्यामुळे ढेकूण होत नाहीत. यापासून तयार होणारी सारी औषधे विदेशात आहेत, पण ती इथे मागविणे महागडे होते, पुन्हा त्यातील नेमके काय घ्यायचे हे त्यांना माहिती नव्हते कारण कोणते उपयोगी आहे ते समजत नव्हते. 

तज्ज्ञांचा सल्ला

“ माझा दीर अमेरिकेत असतो, त्याने ते मागविले आणि मला पाठविले. त्याने मित्रांकडून त्याच्या प्रभावाबाबतची माहितीदेखील घेतली होती. आम्ही यावरील सूचनांचे पालन करत ते वापरले आणि ढेकणांचे चावे हळूहळू थांबले.” पूजा सांगतात.

त्यांनतर हे उत्पादन आपल्या देशात सहज मिळाले पाहिजे असे पूजा यांना वाटले. कृषी वैज्ञानिकांशी याबाबत बोलून झाल्यावर पुजा आणि त्यांच्या पतीने यावर काम करण्यास सुरवात केली आणि ‘अरबँन्स’चे काम सुरु झाले. तज्ज्ञांच्या मदतीने त्याचा दर्जा आणि बाजारात पुरवठा करण्याबाबतच्या शक्यतांचा अभ्यास सुरु झाला. हे पदार्थ बहुतांश ऑनलाईन विकले जातात त्यामुळे त्याचा लोकांना चांगला फायदा होतो आणि सहज मिळतात.

किटकनाशकांचे बाजार

असे असले तरी, अरबंन्स समोर मोठे आव्हान होते की लोकांच्या समोर याची माहिती नेणे आणि याच्या प्रभावी वापराबाबत जागृती करणे. अशा प्रकारच्या किटनाशकाची संकल्पना देशात नवी होती. सध्या देशात सगळीकडे रासायनिक पेस्ट कंट्रोल करणा-या हानीकारक उत्पादनांचा सुळसुळाट आहे. अशातच पतंजलीसारख्या देशी बनावटीच्या उत्पादनांनी बाजारात क्रांती आणली आहे. श्री श्री रविशंकर यांनी देखील अशा प्रकारच्या उत्पादनांच्या क्षेत्रात बाजारात पाऊल टाकले आहे. देशात सहाशे फ्रेंचायजी ऑनलाइन काम करत आहेत.

पूजा सांगतात की, “ अनेकजण जे आमचे उत्पादन घेतात त्यांना त्याचा वापर केल्यावर लगेच ढेकूण मरावे असे वाटते, पण आम्ही त्यांना शिकवतो की ते हळुहळू सुरक्षित आणि कायमचे ढेकूण घालविते. त्यातून हानीकारक इतर परिणाम होत नाहीत.”

उत्पन्न आणि भविष्य

पूजा यांचे आणखी एक उद्यम आहे ‘स्त्रिवा’ जे २००९मध्ये सुरू झाले त्यात स्त्रियांच्या कपड्याचे किरकोळ विक्री केंद्र बंगळूरू मध्ये आहे.अरबँन्सच्या मध्यमातून त्यांनी पाच हजार ग्राहकांना सेवा दिली आहे आणि तीस लाखांची उलाढाल केली आहे. त्याच्या स्वत:च्या मार्फत ऑनलाइन तर हे उत्पादन विकले जाते या शिवाय ते तुम्हाला ऍमेझॉन फ्लिपकार्ट आणि बिग बास्केट मध्येही खरेदी करता येते. शिवाय किरकोळ दुकानातही ते उपलब्ध आहे' पुजा सांगतात.

त्यांनी दावा केला की आमच्या ढेकूण रोधी पावडरला नौदलाच्या जहाजावरुन मागणी आहे, नेहमी प्रवास करणा-या लोकांना त्याचा उपयोग होतो. देशातील नामांकीत हॉटेल्स, हॉस्पिटलना तसेच घरगुती वापरात त्याचा उपयोग होतो. याचा प्रचार आणि प्रसार करून जागृकता वाढविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी सेंद्रीय उत्पादनांच्या ठिकाणी ते त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत.

“आमच्या पाहण्यात आले आहे की अशीच औषधे बाजारात झुरळे, डास यांच्यासाठी आहेत, पण त्यातून लोकांना त्रासही जाणवतो. ते प्रभावी नाहीत आणि सुरक्षित देखील नाहीत, त्यात रसायनमुक्त आणि सुरक्षित तर फारच थोडी असतील” पूजा सांगतात.

लेखिका : सिंधु काश्यप