संपादने
Marathi

मुलभूत संशोधनासाठी नागालँडचे हे गावकरी वापरतात परंपरागत शहाणपण!

Team YS Marathi
15th Dec 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

जखम झाली तर डॉक्टरांकडे जावून मलमपट्टी अनेकजण करत असतात, त्यातून रक्त येण्याचे थांबते आणि जंतूनाशकामुळे शरीरात जंतूचा प्रवेश होण्यास मज्जाव होतो. अनेक नागालँण्ड मधील गावकरी मात्र रक्त थांबण्यासाठी ‘डॉक्टर पर्ण’ झाडावरून खुडून लावतात. या गावक-यांच्या मते सायंग्लाझा (Eupatorium Odoratum) झाडाच्या पानाचा चिक लावला की जखमेतील रक्त येण्याचे लगेच थांबते.

दुर्गम भागात राहात असल्याने आणि साधनांचा आभाव असल्याने, नागालँण्डव्या गावखेड्यात राहणा-या लोकानी त्यांचे पारंपारीक ज्ञान केवळ टिकवूनच ठेवले नसून ब-याच नव्या शास्त्रीय बाबी अवगत करून घेतल्या आहेत ज्यातून त्यांचे दैनंदिन जीवनमान सुधारेल. त्यांच्या पारंपारिक बचतीच्या आणि उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करण्याच्या सवयीचा परिणाम म्हणून त्यांच्या खडतर जीवनात सुसह्यता निर्माण होते.

image


या आणि अशा प्रकारच्या अनेक पारंपारीक बाबींचा प्रत्यय त्यावेळी आला ज्यावेळी ३८व्या ‘शोधयात्रा’ या नोव्हे २६ ते २डिसेंबर २०१६ दरम्यान झालेल्या नागालँण्डच्या भूमीतील भटकंती दरम्यान शोधयात्रीनी प्रवास केला. त्यात देश आणि विदेशातील भटके सहभागी झाले होते. प्रा. अनिल के गुप्ता, अध्यक्ष सोसायटी फॉर रिसर्च ऍण्ड इनिशिएटिव फॉर सरटेनेबल टेक्नोलॉजीस् ऍण्ड इन्स्टीट्यूशन्स(स्रिस्टी) म्हणाले की, आम्ही या शोधयात्रा वर्षातून दोनदा आयोजित करतो, त्यातून पारंपारीक ज्ञानाची माहिती होते आणि इतर भागातील नवे ज्ञान देशाच्या इतर राज्यात प्रसारित करता येते”

नुकत्याच झालेल्या शोधयात्रेमध्ये, जैव वैविध्यता आणि अन्नप्रक्रिया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यातून गावातील पारंपारिक ज्ञान काय आहे त्याची ओळख होण्यास मदत झाली. त्यातून शाळकरी मुलांच्या मनातील जिज्ञासा आणि त्यांच्यात असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासही मदत झाली. नव्या कल्पनांची देवाण घेवाण झाली. याशिवाय फिराही गावातील नव्वदी पार केलेल्या नायतसंगप्पा या ज्येष्ठांचा सत्कारही करण्यात आला. ते स्वत: मात्र ११२वर्षे वय असल्याचा दावा करतात. ते म्हणाले की, “ माझ्या जीवनात मी अशा प्रकारच्या शोधयात्रेचा उपक्रम प्रथमच अनुभवला. आमच्या नव्या पिढीला त्यातून ब-याच गोष्टी शिकता येणार आहेत. त्यातून त्यांना नव्या प्रेरणाही मिळतील”.

या प्रवासा दरम्यान, तळागाळातील संशोधकानी शोधून काढलेल्या यंत्रसामुग्रीबाबतही प्रदर्शने भरविण्यात येतात. बांबूच्या काठ्यापासून तयार केलेल्या मिझोरामच्या एल रालते आणि एल सायलो यांच्या अगरबत्या,हाताने पाणी खेचण्याचे तामिळनाडूच्या एन सक्तिमएनाथन यांचे उपकरण आणि हरयाणाच्या धरमवीर कुंभोज यानी तयार केलेल्या बहुउपयोगी अन्नप्रक्रिया यंत्राचे प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आले.

तळागाळातील संशोधक आणि शेतकरी असलेल्या अमृत अग्रावत(७१) जे दोन सप्ताहापूर्वी राष्ट्रपती भवनात प्रणव मुखर्जी यांच्या पाहुणचाराने सन्मानित होवून परतले आहेत, त्यांनी देखील या शोधयात्रेत भाग घेतला. नागालँण्डच्या शोधयात्रेचे फलीत सांगताना, “पहिली फेरी पूर्ण करण्यात आली असून दुसरी उन्हाळ्यात उडिशामधून सुरू करण्यात येणार आहे,” असे गुप्ता म्हणाले.

ते महणाले की, “ या शोधयात्रा २०० वर्षांपासूनच्या ज्ञानाचे व्यवस्थापन आहे. शंभर वर्षापासूनच्या आमच्या ज्येष्ठांकडे असलेल्या पारंपारिक गोष्टींचे संवर्धन आहे.ज्यातून येत्या शंभर वर्षात येणा-या नव्या पिढीला आम्ही हे ज्ञान देणार आहोत”. 

सौजन्य : थिंक चेंज इंडिया

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags