संपादने
Marathi

देशवासियांना स्वस्तात पाणी देणा-या ‘पी.लक्ष्मी राव यांच्या संघर्षपूर्ण यशाची अनोखी कहाणी !

28th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

अपयशाची अनेक कारणे असतात, मात्र यशापर्यंत पोहोचण्याचा केवळ एकच मार्ग असतो आणि तो आहे कठोर परिश्रम. अनेकदा लोक यशस्वी लोकांना बघून काही दिवसातच त्यांच्यासारखे होण्याचे स्वप्न पाहतात, त्यांची इच्छा असते की, त्यांना कशाही प्रकारे त्यांच्यासारखे यशस्वी व्हायचे असते, यश मिळविण्याच्या इच्छेमुळे ते अनेकदा जलद मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात आणि याच कारणामुळे त्यांना अपयशच हाती लागते.

यश ही अशी एक गोष्ट आहे, ज्याला कुणी एका रात्रीत मिळवू शकत नाही. कुठल्याही व्यक्तीच्या यशस्वी होण्यापाठीमागे एक कहाणी नक्की लपलेली असते. एक अशी कहाणी ज्यात त्याचे परिश्रम असतात, त्याचे संकल्प आणि दृढ इच्छाशक्ती असते. ‘ सोल्विक्स फोकस इंडिया प्रायवेट लिमिटेड,’च्या संस्थापक पी लक्ष्मीराव यांची देखील अशीच एक कहाणी आहे, ज्यात त्यांचे कठोर परिश्रम आहेत.


image


लक्ष्मी यांचा जन्म विजयवाडा येथे झाला, मात्र त्यांचे प्रारंभिक शिक्षण उत्तर प्रदेशात झाले. लक्ष्मी यांना लहानपणापासूनच डॉक्टर बनण्याची इच्छा होती. मात्र, कुटुंबातील आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांच्यासाठी एमबीबीएसचे महागडे शिक्षण घेणे शक्य नव्हते, सोबतच सशुल्क आसन पद्धतीमुळे प्रवेश घेणेदेखील महाग पडत होते. या कारणामुळे त्या एमबीबीएस मध्ये प्रवेश घेऊ शकल्या नाहीत. लक्ष्मी यांनी अलाहाबाद विद्यापीठातून बीएससीचे शिक्षण पूर्ण केले.

लक्ष्मी कुटुंबात मुलींमध्ये सर्वात मोठ्या होत्या, त्यामुळे घराकडून विवाह करण्याचा दबाव देखील वाढायला लागला, असे असूनही त्यांना त्यावेळी विवाह करायचा नव्हता आणि आपले शिक्षण पुढे सुरु ठेवायचे होते. मात्र, आपल्या वडिलांच्या आग्रहामुळे त्या विवाहासाठी तयार झाल्या आणि १९९४ मध्ये लक्ष्मी यांचा विवाह संपन्न झाला. विवाहानंतर लक्ष्मी यांना अनेक समस्या आल्या. त्यांचे सासर दक्षिण मध्ये होते, जेथील संस्कृती आणि भाषेचे लक्ष्मी यांना तितकेसे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्या थोड्या वेगळ्या वेगळ्या रहात असत. सासर कडून लक्ष्मी यांना जास्त सहयोग मिळाला नाही, त्यादरम्यान लक्ष्मी यांनी नोकरी करण्याचा विचार केला, त्यांना त्यातही कुटुंबाचा खूप विरोध सहन करावा लागला. मात्र, लक्ष्मी यांनी निश्चय केला होता की, त्या आता मागे हटणार नाहीत, त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविणे सुरु केले आणि त्यांचे पहिले मानधन केवळ १५०० रुपये होते.


image


त्यादरम्यान, लक्ष्मी स्वतः देखील शिक्षण घेत होत्या. त्यांच्यात शिक्षणाची आवड होती. त्यांनी आता पुढे शिकण्याचा निर्णय घेतला आणि एमबीएदेखील करण्याचा विचार केला. लक्ष्मी यांनी संगणकाचा प्रगतीशील अभ्यासक्रम केला आणि त्यानंतर ऑटोमोबाइल उद्योगात नोकरी देखील केली, त्यांनी मारुतीमध्ये सहभाग नोंदवला, जेथे त्यांच्या शानदार कामासाठी त्यांना सर्वोत्तम विक्रेत्याचा पुरस्कार देखील मिळाला, एका पुरुषप्रधान उद्योगात आपल्या प्रतिभेच्या बळावर पुरस्कार प्राप्त करणे, खूपच कठीण काम होते. मात्र, लक्ष्मी यांची आवडच होती, ज्याने त्यांना कठीणात कठीण काम सहजतेने करण्याची हिम्मत मिळत असे. मारुतीमध्ये काम करणे लक्ष्मी यांच्या कारकिर्दीतील खूपच चांगला अनुभव होता, त्यांच्या कामाला खूपच नावाजण्यात आले आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास देखील वाढला.

लक्ष्मी सांगतात की, त्या आपल्या कामात खूप खुश होत्या, त्यांचे पति याच क्षेत्रात होते, मात्र घर-गृहस्थी सोबत ऑटोमोबाइल उद्योगात काम करणे सोपे नव्हते. कारण, सणासुदीला गाड्यांची विक्री अधिक होते, त्याच दरम्यान सुट्टी मिळत नव्हती, ज्यामुळे घर सांभाळण्यासाठी समस्या येत होत्या. लक्ष्मी यांनी खूप विचार केला, त्यानंतर एकेदिवशी त्यांना नोकरी सोडावी लागली आणि ‘सिंबॉयसीस’, पुण्यातून एमबीए करायला लागल्या, सोबतच त्यांनी मानव संसाधनाची (एचआर) नोकरी करण्यास सुरुवात केली, सर्वात पहिले त्यांना मानव संसाधन कार्यकारी म्हणून नोकरी मिळाली, त्यानंतर त्यांनी वरिष्ठ मानव संसाधन अधिकारी आणि त्यानंतर शाखाप्रमुख आणि नंतर संचालक म्हणून काम केले.


image


लक्ष्मी यांना आता काही स्वतःचे काम करायचे होते, त्यांना मानव संसाधन क्षेत्राची खूप माहिती झाली होती. त्यांनी निर्णय घेतला की, आता त्या स्वतःची मानव संसाधन कंपनी बनवणार आणि नंतर २ सप्टेंबर २००९ ला त्यांनी ‘द फोकस इंडिया’ चा पाया रचला, ही एक व्यक्तिगत स्वामित्व असलेली कंपनी होती. कंपनीने सुरुवातीपासूनच शानदार काम करण्यास सुरुवात केली आणि लवकरच कंपनीच्या चांगल्या कामामुळे त्यांचे नाव प्रसिद्ध व्हायला लागले. यावेळेपर्यंत लक्ष्मी यांच्याकडे केवळ ४ लोकांचा एक गट होता. मात्र लक्ष्मी यांना माहित होते की, त्यांना कुठल्याप्रकारे पुढे जायचे आहे, त्यामुळे त्यांना कमी लोकांमध्ये देखील समस्या आली नाही आणि कंपन्या पहिल्यापासूनच तेथे आहेत, ज्यांची त्यांच्याशी प्रतिस्पर्धा आहे. मात्र, सोबतच त्यांना हे देखील माहित होते की, या कंपन्या कुठे मागे राहतात, त्यामुळे त्या खूप लक्षपूर्वक आणि सुनियोजित पद्धतीने काम करायच्या. इतकेच नव्हे तर, त्यांच्याकडे खूप कमी लोक होते. मात्र ते सर्वच व्यावसायिक होते आणि तेथे एका मोठ्या कोर्पोरेट ऑफिस प्रमाणेच काम होत होते.

२०१२ पर्यंत ‘द फोकस इंडियाचे’ खूप नाव प्रसिद्ध झाले होते आणि अनेक कंपन्या त्यांच्यासोबत सामील व्हायला लागल्या होत्या. तेव्हा लक्ष्मी यांनी विचार केला की, आपल्या कामाचा विस्तार केला पाहिजे आणि आपल्या फर्मला कंपनीचे रूप दिले पाहिजे. ज्यामुळे त्यांना आपल्या कामाचा विस्तार करण्यासाठी मदत मिळेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील ते जातील. खूप विचारविनिमय केल्यानंतर त्यांनी ऑगस्ट २०१२ मध्ये ‘सोल्विक्स फोकस इंडिया प्रायवेट लिमिटेड’ चा पाया घातला, या प्रक्रियेत खूप पैसा लागणार होता आणि लक्ष्मी यांना त्यावेळी कर्ज काढून पैसे घ्यावे लागले.

लक्ष्मी सांगतात की, त्यावेळी देखील त्यांच्या पतीने त्यांना सल्ला दिला की, त्या हे सर्व सोडून त्यांनी एक चांगली आरामाची नोकरी पकडावी, मात्र लक्ष्मी यांनी त्यांना समजाविले की, त्यांनी पहिलेच अनेक समस्या असूनही आपल्या कुटुंबाला सांभाळले आहे आणि त्या हे काम खूपच सहजरित्या करतील. त्यानंतर त्यांच्या कंपनीने हळू हळू प्रत्येक क्षेत्रात कर्मचा-यांची भरती करण्यास सुरुवात केली, मग ते बीपीओ असो, बॉयोटेक्नॉलॉजी असो, रियल इस्टेट असो, वैद्यकीय असो, उत्पादन क्षेत्रात असो, त्याव्यतिरिक्त अनेक भागात आज सोल्विक्स काम करत आहे आणि विद्यार्थ्यांना नोक-या देत आहे.

image


लक्ष्मी सांगतात की, त्या विद्यार्थ्यांना नोकरी व्यतिरिक्त ती मिळविण्यासाठीचे प्रशिक्षण देखील देत आहेत, त्या स्वतः या प्रक्रियेवर देखरेख ठेवत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार त्यांना योग्य त्या कंपनीमध्ये पाठवितात.

image


त्याव्यतिरिक्त २०१४ मध्ये लक्ष्मी यांनी पाहिले की, कोर्पोरेट कर्मचा-यांना खूप प्रवास करावा लागतो आणि त्यांना सुविधा प्रदान करण्यासाठी त्यांनी प्रवास क्षेत्रात देखील काम करण्यास सुरुवात केली. कंपनी प्रवासाशी संबंधित अनेक लहान मोठ्या सुविधा पोहोचवितात, ते मग तिकीट बुकिंग असो, हॉटेल बुकिंग असो किंवा टूर ऑपरेशन इत्यादी. लक्ष्मी यांनी युअर स्टोरीला सांगितले की, “आज मी जे आहे ते आपल्या वडिलांमुळे आहे. मी आपल्या वडिलांच्या खूप जवळ होती, माझ्या वडिलांना असलेल्या कर्करोगामुळे त्यांचा २००९ मध्ये मृत्यू झाला होता. तेव्हापासून माझ्या मनात होते की, मला वैद्यकीय क्षेत्रात देखील आपले योगदान दिले पाहिजे.”

त्या सांगतात की, पाणी अनेक रोगाचे मूळ असते आणि स्वच्छ पाण्याची देशभरात कमतरता आहे. स्वच्छ पाण्यावर प्रत्येक देशवासीयांचा अधिकार आहे, जो त्यांना मिळू शकत नाही आणि हेच पाहून नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांनी ‘पाणी एटीएम’ ची सुरुवात केली. पाणी एटीएम मार्फत लक्ष्मी कमी किमतीत देशवासियांना स्वच्छ पाणी देण्याची सोय करू इच्छितात. त्याची किंमत देखील कमी ठेवण्यात आली आहे, जेणेकरून एखादी व्यक्तीदेखील ते विकत घेऊ शकेल. एक लिटरचे स्वच्छ पाणी केवळ ५ रुपये आहे. पाणी एटीएमला कार्यालय, शाळा, रुग्णालय, रेल्वे स्टेशन व्यतिरिक्त देखील अनके ठिकाणी लावले जाऊ शकते. अनावरणासोबतच कंपनीला बंगळुरूच्या एका कंपनी कडून १००० पाणी एटीएमची मागणी देखील मिळाली आहे.


image


लक्ष्मी सांगतात की, त्यांचा उद्देश याला भारताच्या गावात पोहोचविण्याचे आहे, जेथे स्वच्छ पाण्याच्या समस्या आहेत, ज्यामुळे लोकांना इच्छा नसूनही गढूळ पाणी प्यावे लागते आणि त्यामुळे लोक आजारी पडतात. या प्रकल्पाचा उद्देश फायदा करून घेणे नव्हे तर, देशातील लोकांना रोगमुक्त ठेवणे आहे. लक्ष्मी यांचे मत आहे की, जर भारतातील लोक स्वस्थ असतील तर, देश यश संपादन करू शकेल.

आज लक्ष्मी यांच्याकडे एक खूपच विश्वासू गट आहे, ज्यांच्यावर लक्ष्मी यांना पूर्ण विश्वास आहे. त्यांना माहित आहे की, गटातील एक एक सदस्य खूप मेहनती आहेत. आपल्या यशात त्या आपल्या गटाचे देखील महत्वाचे योगदान असल्याचे मानतात.


भारताव्यतिरिक्त आता सोल्विक्स इंडिया दुबई मध्ये देखील काम करत आहे. लक्ष्मी सांगतात की, व्यवसाय करण्यामागे त्यांचा मुख्य उद्देश केवळ फायदा कमविण्याचे नाही, तर त्यांच्यासाठी त्यांच्या ग्राहकांची संतुष्टी हे सर्वात जास्त महत्वाचे आहे. त्याव्यतिरिक्त पाणी एटीएम सारख्या प्रकल्पामार्फत सामान्य लोकांना सामील करू इच्छितात आणि देशाला स्वस्थ ठेवण्याच्या दिशेने आपले योगदान देऊ इच्छितात.

लेखक: आशुतोष खंतवाल

अनुवाद : किशोर आपटे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags