संपादने
Marathi

तुमच्या स्वप्नातील विशेष लक्झरी कार हाताने तयार करणारे भारतीय पिता-पुत्र

14th Mar 2016
Add to
Shares
6
Comments
Share This
Add to
Shares
6
Comments
Share

बेन्टले अझ्युर, मर्सिडीज-बेन्झ मेबॅक, रोल्स रॉयस फॅन्टम आणि डीसी अवंतीला बाजूला ठेवा आणि ऑर्डरप्रमाणे लक्झरी कार बनवून देणाऱ्या भारताच्या एचआय प्रायव्हेट लिमिटेडची निवड करा. ऑर्डरनुसार शूज, सूट्स, ज्वेलरी आणि बॅग बनवून मिळण्याच्या जमान्यात वावरत असताना हृदयेश कुमार नामदेवने ऑर्डरप्रमाणे कार बनवून देण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांच्या स्वप्नातील कार बनवून देणारा जागतिक दर्जाचा कार मॅन्युफॅक्चरिंग ब्रॅण्ड तयार करणे ही यामागची कल्पना आहे.

2015मध्ये भारतात सुरु झालेला हा ब्रॅण्ड ‘इन्विटेशन ऑन्ली’ धर्तीवर लक्झरी आणि हाताने बनविलेल्या गाड्या पुरविणारा जागतिक स्तरावरचा स्वतःचा मल्टी-क्लस्टर व्यवसाय उभारण्यामध्ये व्यस्त आहे.

“आम्ही खास तुमच्यासाठी तुम्हाला जसा पाहिजे तसा कारचा उत्कृष्ट नमुना हाताने तयार करतो, जो नेहमीच संपूर्ण जगात एकमेवाद्वितीय असेल,” एचआय प्रायव्हेट लिमिटेडचा संस्थापक संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेला 36 वर्षांचा हृदयेश सांगतो. ‘मॉर्रीस स्ट्रीट’ ही त्यांची पहिली हाताने बनविलेली लक्झरी कार आहे.


जयपूरमध्ये मॉर्रीस स्ट्रीट

जयपूरमध्ये मॉर्रीस स्ट्रीटप्रायव्हेट बँकेत करिअर केल्यानंतर आणि एचएनआय आणि अनेक श्रीमंत कुटुंबांच्या संपत्तीचे हिशेब हाताळल्यानंतर सर्व क्लायंट्समधील एक सामाईक बाब हृदयेशच्या लक्षात आली होती आणि ती म्हणजे इतरांकडे नसलेल्या लक्झरी आणि कलात्मक व इतर वस्तूंच्या लिमिटेड एडिशन्स सर्वात आधी मिळविण्याकडे यांचा कल असतो. हृदयेशच्या लक्षात आले की जर ते कारचे टॉप लक्झरी ब्रॅण्ड खरेदी करत असतील तर कारसाठी इन्डियन ग्लोबल लक्झरी ब्रॅण्ड उभा करण्याची कल्पना अद्भूत आहे.

“मी पाहिलं होतं की अनेकांना आपल्याकडे असलेली कुठलीही लक्झरी एकमेवाद्वितीय असावी असं तीव्रतेने वाटत असतं. हा सुरुवातीचा विचार होता. त्यानंतर मी त्याचा जागतिक स्तरावर संशोधन अभ्यास केला आणि त्यातून मास्टरपिस एडिशनद्वारा सुप्रिम लक्झरी देणाऱ्या एचआयची कल्पना उदयास आली,” हृदयेश सांगतो.

34 वर्ष ‘भेल’मध्ये विविध इन्जिनिअरिंग विभाग सांभाळलेल्या आपल्या वडिलांबरोबर म्हणजेच एम.लाल यांच्याबरोबर मिळून हृदयेशने एचआयची सुरुवात केली. एचआयची प्रत्येक कार एकमेव आणि पूर्णपणे हाताने बनविलेली असते. संपूर्ण कार बनविण्याची प्रक्रिया ज्यामध्ये डिझाईन, स्ट्रक्चर, मशिनरी, परफॉर्मन्स, फीचर्स, फिनिश आणि इतर सर्व भाग हे मालकाच्या मागणीनुसार हाताने बनविलेले असतात.

टीम सांगते की एखाद्या मॉडेलची प्रतिकृती कधीच बनविली जात नाही. एका मॉडेलची एकच कार बनविली जाते. या कार कटाक्षाने मागणीवरुन बनविल्या जातात. नेहमीच्या विक्री माध्यमातून त्या उपलब्ध नाहीत.

एकदा का ऑनलाईन रिक्वेस्ट टाकली की टीम ती व्यवस्थित पहाते आणि समजून घेते की समोरच्या ग्राहकाची गरज काय आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे ही कल्पनेतील कार तयार करणे प्रत्यक्ष व्यवहारात शक्य आहे का हे पाहण्यासाठी या कल्पनेची यथार्थता तपासून पाहण्याचा. हृदयेश स्पष्ट करतो : फुलपाखरासारखी दिसणाऱ्या कारसाठी रिक्वेस्ट असू शकते. अशी गाडी कदाचित संग्राहलयात खूप छान वाटेल, मात्र ती त्याचा रस्त्यावर चालवण्याचा व्यावहारिक उद्देश पूर्ण करणार नाही.

बरीचशी उत्पादने कंपनीच्या एनसीआरमध्ये आणि मुंबईमधील कारखान्यामध्ये तयार होतात. तथापि, कुठल्या प्रकारची मशिनरी कारमध्ये पाहिजे याबाबत ग्राहकाची नेमकी मागणी असेल तर तीच मशिनरी वापरली जाते. इन्विटेशन रिक्वेस्ट जगभरातून कुठूनही टाकता येते, पण कार तयार मात्र भारतातच होते.

एचआय सध्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. ते रिसोर्स टीमचा विस्तार करण्यासाठी आणि आदर्श आर्थिक स्रोत, प्रतिभा, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा मिळविण्याच्या दृष्टीने संबंधित संस्थांशी हातमिळवणी करण्याकरिता जगभरात बोलणी करत आहेत.

जगभरातून 300हून जास्त इन्विटेशन रिक्वेस्ट आल्या असून काही नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्सवर काम करत असल्याचा कंपनी दावा करते. एका कारची सरासरी किंमत जवळपास दशलक्ष डॉलर्स असते. कस्टमायजेशननुसार ती बदलते.हृदयेश सांगतो, एचआयने एक नवीन जागतिक बाजारपेठ निर्माण करुन व्यवसायाला सुरुवात केली. तो पुढे सांगतो की ते सातत्याने नाविन्यपूर्ण काम करतील आणि कोणतीही थेट स्पर्धा दूर सारुन नवीन सेगमेंट तयार करतील.

क्रेडिट रेटिंग एजन्सी आयसीआरएनुसार, 2020 पर्यंत भारतात लक्झरी कारची विक्री सध्याच्या 30,000 कारवरुन एक लाखावर जाऊन पोहचेल. या अहवालात पुढे म्हटल्याप्रमाणे 1.8 लाख भारतीय डॉलर मिलेनिअर्स मानले जातात आणि हा वर्ग वेगाने विकसित होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जगभरातील भारतीय लक्झरी कार ब्रॅण्डचे उत्सुक ग्राहक असतील असे गृहीत धरणे योग्य होईल.

भारतातील लक्झरी कारची विक्री ही जागतिक विक्रीच्या सरासरीच्या खूपच कमी म्हणजे एकूण विक्रीच्या 1.5 टक्के आहे ही बाब लक्षात घेणे महत्त्वाचे ठरेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘मेट्रो शहरांबरोबरच टीअर II आणि III दर्जाच्या शहरांमध्येही कंपनीला विक्रीमध्ये वाढ निदर्शनास आली आहे’ हे बीएमडब्ल्यूचे अध्यक्ष फीलीप वॉन साहर यांचे विधान.

तथापि, वाढते मार्केट म्हणजे तीव्र आणि मजबूत स्पर्धा. ऑडी इंडियाच्या अधिकाऱ्यांचे वक्तव्य सांगते की 2014-15 मध्ये ऑडीच्या 11,292 गाड्या विकल्या गेल्या, तर मर्सिडीज बेन्झ 11,213 गाड्या विकल्याचा दावा करते. दोन्ही कंपन्यांच्या वार्षिक वृद्धीची नोंद मागील वर्षाच्या तुलनेत क्रमशः 11.51 टक्के आणि 18 टक्के आहे.

त्यामुळे, जिथे मोठे, सुस्थापित ब्रॅण्ड्स एकमेकांच्या तीव्र स्पर्धेत आहेत तिथे एचआयचा निभाव लागेल? जिथे कंपनीचा दर्जा दर्शवणारी उत्पादनाची किंमत ब्रॅण्ड नेम नुसार वाढत जाते, अशा क्षेत्रात एचआय त्याची ओळख निर्माण करु शकेल? हृदयेश सांगतो की त्यांचे जग ऑडी आणि बीएमडब्ल्यूच्या जगापेक्षा वेगळे आहे, कारण त्यांचे जास्तीत जास्त लक्ष एका मॉडेलचे एक एडिशनही नाही तर फक्त एकच कार तयार करण्यावर आहे.

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित

मुलीच्या साथीनं वडिलांनी निर्माण केला १०० कोटींचा ब्रँड

image


लेखिका : सिंधु कश्यप

अनुवाद : अनुज्ञा निकम 

Add to
Shares
6
Comments
Share This
Add to
Shares
6
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags