चहाचा अड्डा बनला १०० कोटींचा उद्योग
ऑफिसमध्ये सारखे काम करून थकवा आल्यानंतर आपल्याला थोड्या वेळाची विश्रांती हवी असते किंवा मित्रांसोबत फुरसतीने बोलावसं वाटत असतं आणि त्याबरोबरच हवा असतो कडक चहा... तेव्हा आठवते रस्त्याच्या कडेला असलेली चहाची टपरी..... किंवा नेहमीचा चहाचा अड्डा.... जिथे जाऊन आरामात, शांततेत बसून जरा वेळ चहाचा आस्वाद घेऊन गप्पा टप्पा आणि टाइमपास केला जातो. चहाच्या अड्ड्यावर अशाच गप्पा-टप्पा मारत दोन ध्येयवेड्या तरुणांनी स्वत:चा व्यवसाय करायचे ठरविले आणि चहाच्या टपरीचे रुपडे बदलवत 'चहा कॅफे' ची योजना अंमलात आणली.
अश्या या ध्येयवेडया तरुणांचे नाव आहे नितिन सलूजा आणि राघव वर्मा. जे दिल्लीच्या एनसीआर मध्ये ' चहाचे अड्डे ' म्हणजे ' चहा कॅफे ' ची साखळी ‘‘चायोस’’ चे संचालक आहेत. नितिन सांगतात की, " माझ्या आईने मला लहानपणीच चहा बनवायला शिकवलं आणि तेव्हापासून मी माझ्या चहाच्या कपाला घेऊन फार संवेदनशील आहे आणि हीच बाब चहाचे शौकीन असलेले लोक आमचे मेनुकार्ड बघून चटकन ओळखतात. आमचे मेनुकार्ड आमची टॅगलाइन ' चहा सोबत केलेले प्रयोग ' असे आहे. जे आमच्या चहाच्या उद्योगामागील विचारसरणीला दर्शवतात."
२०१२ मध्ये सुरुवात केलेल्या ‘चायोस’ ला दिल्ली एनसीआर च्या युवकांनी आणि चहा प्रेमींनी लगोलग डोक्यावर घेऊन टाकलं आणि आता सध्या एनसीआर मध्ये यांची आठ दुकाने आहेत . लहानपणा पासूनच नितिनचं आणि चहाचं अनोखं नातं आहे. मात्र, भविष्यात त्याचे चहाचे हाईटेक दुकान असेल असा स्वप्नातही विचार केला नव्हता.
आयआयटी, मुंबई मध्ये शिकत असताना नितिनला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती आणि ह्याच मार्गावर चालत त्याने त्याच्या मित्रांच्या सहकार्याने 'रोबोटिक्स ' नावाच्या कंपनीची सुरुवात केली. रोबोटिक्स कंपनीच्या यशस्वी संचालनासोबतच एक अन्य कंपनीचा पाया टाकला पण काही नव करण्याचा जोश, उत्साह नेहमीच त्याच्यात राहिला.
नितिन सांगतो की, " रोबोटिक्सच्या कामाच्या दरम्यान मी मला आवडणाऱ्या विशिष्ट चव असणाऱ्या चहाच्या शोधत होतो, पण मला माझ्या मनासारखा चहा कुठेही मिळाला नाही. ह्याच दरम्यान माझ्या मनात आलं की आपण एखादे चहाचे दुकान थाटावे आणि लोकांना त्यांना हवा असणारा मनपसंद चहा उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून चहा पिऊन त्यांना त्यांचा थकवा घालवता येईल."
चहाच्या अड्ड्या विषयी विचार करत असताना योगा योगाने नितिन ची भेट आयआयटी दिल्लीचा पदवीधर असलेल्या राघव वर्माशी झाली. ते दोघे त्यांच्या एका मित्राच्या घरी भेटले आणि ह्या संदर्भात चर्चा केली आणि ‘चायोस’ चा पाया उभा राहिला. सुरुवातीच्या काळात दोघांनी मिळून त्यांच्या पहिल्या दुकानाला सुरुवात केली आणि आज त्यांची ७ दुकानं यशस्वीरित्या सुरु आहेत.
" कोणत्याही नव्या कामाला सुरुवात करतांना तेथील वस्तूंची गुणवत्ता टिकवून ठेवणे फार आव्हानत्मक असते. ह्या दोघांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या इथे तयार होणाऱ्या चहाच्या प्रत्येक कपाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिलं आणि हे प्रयत्न करीत राहिले की चहा पिणाऱ्या लोकांना नेहमी ' माझ्यासाठीच असलेला चहा' ची जाणीव व्हावी. नितिन पुढे सांगतो की "लोकांनी ह्या दुकानाला भरभरून प्रतिसाद दिला आणि आणि लवकरच त्यांची वार्षिक कमाई १ करोड रुपये पर्यंत पोहोचली. त्यांच्या ग्राहकामध्ये मुख्यत मध्यम वर्गाचे लोक आहेत, ज्यांना खर्च केलेल्या पैशाची पूर्ण वसुली हवी असते.
नितीन पुढे अधिक माहिती सांगताना बोलतो की त्यांच्या चहाच्या मेन्यूकार्ड मध्ये ‘आम पापड़ चहा ’ आणि ‘गुलाब-इलायची’ चहा पण समाविष्ट आहे जो यांना एक वेगळी ओळख निर्माण करून देतो. "आम्ही आमच्या इथे चहाचा आस्वाद घेणाऱ्या लोकांना २५ वेगवेगळ्या प्रकारचा चहा देतो ज्यात देशी पहाड़ी चहा पासून ते विदेशी मोरक्कन चहा चा सुध्दा समावेश आहे .
‘चायोस’ च्या मेन्यूकार्ड मध्ये सगळ्यात जास्त मागणी असलेला चहा म्हणजे आले, वेलची आणि दालचीनी मसाल्यांचा चहा ज्याची किंमत आहे ३५ रुपये. चायोस ह्या चहांचे ४००० पेक्षा जास्त मिश्रणे तयार करू शकतात. या व्यतिरिक्त इथला सगळ्यात महागडा चहा ८५ रुपयाला आहे जो मध, आले आणि लिंबू ह्यापासून तयार करण्यात येतो .
भविष्यात ‘चायोस’ ची सेवा दिल्ली बरोबरच इतर शहरातही उपलब्ध करून देण्याचा नितिनचा हेतू आहे. लवकरच ते मुंबई आणि बेंगलोर इथे ही सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. नितिन पुढे म्हणतो,"चायोस ला आपल्या व्यवसायात बर्याच स्तरावर प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जावे लागते. किमती बद्दल जागरूक असलेले मध्यमवर्गीय ग्राहक, जे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानातील चहा अथवा घरातील चहा पितात त्यांना कमी किंमतीत चांगला चहा हवा असतो. कमी किंमतीत उत्तम चहा पुरवणे आणि दुकानातील वातावरण आनंदी ठेवणे हे एक मोठेच आव्हान आहे."