संपादने
Marathi

यापुढे पदवी घेताना वडिलांचे नाव देणे बंधनकारक नाही...

Team YS Marathi
3rd Jun 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

यापुढे पदवी घेताना वडीलांचे नांव देणे ऐच्छिक आहे किंवा बंधनकारक नाही, विद्यापीठ अनुदान आयोगाने ही घोषणा काही दिवसांपूर्वीच केली आहे. हा निर्णय त्यानंतर घेण्यात आला ज्यावेळी मानव संसाधन विकास मंत्रालयाने त्याचा पाठपुरावा केला, ज्यावेळी महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांची त्या बाबत सूचना आली, त्यामुळे एकल माता आणि घटस्फोटीता यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबतच्या वृत्तानुसार गांधी यांनी प्रकाश जावडेकर यांना कळविले होते की, “ माझ्या असे पाहण्यात आले ज्यावेळी अनेक महिलांशी चर्चा केली, ज्या महिला नव-यांपासून विभक्त झाल्या आहेत, आणि त्यांना किंवा त्यांच्या पाल्यांना पदवी मिळवायची आहे त्या मोठ्या समस्येला तोंड देत असतात. त्यांच्या मुलांच्या नांवे प्रमाणपत्रे देताना वडीलांचा उल्लेख करणे अनिवार्य असते.”

त्या पुढे म्हणतात, “ एखाद्या एकल संवेदनशील स्त्रीच्या नजरेतून पाहिल्यास, आम्हाला त्यात अशी तरतूद करावी लागेल जी नियमावली आणि मार्गदर्शक तत्वानुसार हे नांव देण्यास सक्ती करणार नाही”.


Image: Reuters

Image: Reuters


मनुष्यबळ विकास मंत्री जावडेकर, यांनी या पत्राच्या उत्तरादाखल अपेक्षित बदल करण्याचे मान्य केले, आणि यापुढे यासाठी आक्षेप घेतला जाणार नाही असे म्हटले आहे. गांधी यांच्या मताशी सहमती दर्शवत त्यांनी म्हटले आहे की, हा सर्वथा पालकांचा अधिकार आहे की(वडील किंवा आई) प्रमाणपत्रावर कुणाचे नांव असावे.

हे देखील उल्लेखनीय आहे की, मागील वर्षी गांधी यांनी अंतर्गत बाबी मंत्रालयाला सूचीत केले होते की, पारपत्राच्या नियमांत सुसूत्रता आणावी, त्यावेळी देखील दिल्लीमधील एकलमाता प्रियांका गुप्ता यांचे प्रकरण त्यांच्या पाहण्यात आले होते, ज्यात त्यांना यासाठी न्यायालयात याचिका करावी लागली होती.

या याचिकेत सांगण्यात आले होते की, नियमांत बदल करून वडीलांचे नांव पारपत्र मिळवताना देणे सक्तीचे करण्यात येवू नये. त्याबाबतच्या वृत्तानुसार प्रियांका म्हणाल्या होत्या, “ न्याय यंत्रणेने पूरोगामी निर्णय दिला आहे, की वडीलांचे नांव द्यावेच लागणे बंधन कारक नाही, आम्ही पारपत्र अधिका-यांना विनवून थकलो, पत्रे लिहीली, वरिष्ठांच्या भेटी घेतल्या मात्र आम्हाला शून्य प्रतिसाद मिळाला. शेवटी आम्हाला जबरदस्तीने हे नांव समाविष्ट करावेच लागले. प्रत्येकवेळी माझी मुलगी पारपत्र पाहते, तिला अशा माणसाचे नांव वाचावे लागते ज्याने तिला केवळ दु:ख दिले आहे, जे तिला नकोसे होते.”

प्रियांका यांच्या पतीने त्यांना आणि त्यांच्या मुलीला घराबाहेर काढले होते, त्यावेळी जेंव्हा त्याला मुलगी झाल्याचे समजले होते. त्यामुळे या मुलीला किंवा तिच्या आईला अशा माणसाचे नांव त्यांच्या पारपत्रावर देण्याची सक्ती का करण्यात यांवी यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला होता. शेवटी त्यांच्या लढ्याला यश आले, आणि पारपत्राच्या अर्जावरचा तो रकाना ऐच्छिक करण्यात आला ज्यात मुलांच्या जैविक पित्याचे नांव देणे बंधनकारक होते.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags