संपादने
Marathi

रॉकएनशॉपः ऑनलाईन प्रिमियम लक्झरी उद्योगातील उगवता तारा

Team YS Marathi
21st Nov 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

भारतात लक्झरी ब्रॅंडची बाजारपेठ चांगल्याप्रकारे विकसित होताना दिसत आहे. प्राईसवॉटरहाऊस कूपर्सने तर्फे २०१३ मध्ये जागतिक किरकोळ (रिटेल) कपडे उद्योगाचा अभ्यास करण्यात आला होता. यावेळी काही रंजक गोष्टी उघड झाल्या. या अभ्यासादरम्यान आपली मते नोंदविलेल्या ४२ टक्के भारतीय लोकांनी आपण स्टाईल्स आणि ब्रॅंडच्या सेलिब्रिटी कल्चरने ( सुप्रसिद्ध किंवा लोकप्रिय व्यक्तींची संस्कृती) प्रभावित झाल्याचे मान्य केले.

image


मुख्य म्हणजे देशातील लक्झरी ब्रॅंडचे सुमारे चाळीस टक्के ग्राहक हे महानगरांबाहेरचे असल्याने, लक्झरी ब्रॅंडच्या निवडीतील मोठा वाटा हा टीयर २ आणि टीयर ३ शहरांचा आहे. तर आणखी एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, वार्षिक आंतरराष्ट्रीय इ कॉमर्स लक्झरी विक्रीपैकी ८० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची विक्री ही भारतात होते. लक्झरी बाजारपेठेतील वाढती मागणी आणि व्यवसायाच्या संधीची जाणीव प्रिया सचदेव यांना झाली आणि या क्षेत्रात काहीतरी करुन पहाण्याचे त्यांनी ठरविले आणि यापूर्वी मॉडेल, अभिनेत्री, आर्थिक विश्लेषक म्हणून काम केलेल्या प्रिया यानिमित्ताने उद्योजिका बनल्या... रॉकएनशॉपच्या माध्यमातून त्यांचा प्रिमियम लक्झरी फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रॅंडस् च्या ऑनलाईन बाजारपेठेत प्रवेश झाला.

२०१४ मध्ये सुरु झालेल्या रॉकएनशॉपचे लक्ष्य आहे ते ‘स्टाईल रिच, टाईम पुअर कस्टमर्सची’ (अर्थात स्टाईलबाबत जागरुक पण वेळेची कमी असलेल्या ग्राहकांना) प्रिमियम आणि लक्झरी ब्रॅंडबरोबर गाठ घालून देण्याचे... “ या व्यासपीठाच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक ब्रॅंडस् आणि उत्पादने सहजपणे पहाता आणि खरेदी करता येतात आणि मुख्य म्हणजे ही उत्पादने तुम्हाला अगदी घरपोच मिळू शकतात,” प्रिया सांगतात.

आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक ब्रॅंडस् ना एकत्र करुन खास तयार केलेले निवडक संग्रह हे प्रिया यांच्या मते या व्यासपीठाचे वेगळेपण आहे. तसेच व्होगमध्ये दिसणारे, थेट रनवेवरुन आलेले ब्रॅंडस् येथे उपलब्ध आहेत.

रॉकएनशॉपकडे आजमितीला ६२ ब्रॅंडस् आहेत तर वर्षाअखेरपर्यंत हाच आकाडा शंभरावर नेण्याचा त्यांचा इरादा आहे. ऑस्कर दे ला रेन्टा, सेलिन, सेंट लॉरेंट पॅरीस, व्हिक्टोरीया बेकहॅम, मार्चेसा, स्टेला मॅकार्टनी आणि यांसारख्या प्रचंड मागणी असलेल्या आंतरराष्ट्रीय लक्झरी लेबल्सबरोबर रॉकएनशॉपचा खास सहयोग आहे. तर मात्तबर ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्यानंतर, रॉकएनशॉपने हेमंत एन्ड नंदीता, सिद्धार्थ टायटलर, कुकुन, शिफ्ट ऍन्ड मोर्फ यांसारख्या नामांकित भारतीय डिजायनर्ससह एक खास क्युरेटेड कॅप्सुल कलेक्शन्स बनविले आहे.

“ आमच्याकडे जगातील सर्वोत्तम फॅशन ब्रॅंडस् बरोबरच ऍक्सेसरीज आणि दागिन्यांचे ब्रॅंडस् आहेत. त्याचबरोबर आता आम्ही सौंदर्य प्रसाधने, सुगंधी उत्पादने, नैसर्गिक सौंदर्य आणि त्वचेची निगा राखणाऱ्या उत्पादनांची श्रेणीही सुरु केली आहे. महानगरांमध्ये २४ ते ४८ तासांमध्ये माल पोहचविण्यास आम्ही सक्षम आहोत तर टीयर २ आणि टीयर ३ शहरांमध्ये तीन ते पाच दिवसांत आम्ही माल पोहचवितो. राष्ट्रीय स्तरावर आम्ही एक लाखापर्यंत कॅश ऑन डिलिव्हरी (माल मिळाल्यावर पैसे देणे) ची सुविधा देऊ करतो. त्याचबरोबर आठ बॅंकांच्या मदतीने आम्ही ईएमआयचा पर्यायही उपलब्ध करुन दिला आहे. सुलभ आणि लहान मासिक हफ्ते असल्याने, इच्छुक ग्राहक त्यांच्या आवडीनुसार कपडे आणि इतर उत्पादने, जे विकत घेण्याचे त्यांचे स्वप्न असेल, विकत घेऊ शकतात. सहज उपलब्धता आणि परवडणाऱ्या किंमतीत प्रिमियम आणि लक्झरी ब्रॅंडस् आणि उत्पादने रॉकएनशॉपच्या माध्यमातून आम्ही तयार केली आहेत,” प्रिया सांगतात.

त्यांनी एक कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणूकीसह या लक्झरी ब्रॅंड पोर्टलला सुरुवात केली. संकेतस्थळाची उभारणी, योग्य असे ब्रॅंड पार्टनर्स (भागीदार) मिळविणे आणि इन हाऊस टीमच्या उभारण्यासाठी ही रक्कम खर्च करण्यात आली.

स्थापनेला सुमारे दीड वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता हे व्यासपीठ विस्ताराच्या वळणावर आहे. “ नुकताच आम्ही आमचा सौंदर्य विभाग सुरु केला असून लवकरच मुलांसाठी प्रिमियम विभाग आणि गृह सजावट उत्पादनेही सुरु करणार आहोत,” प्रिया सांगतात.

त्यांची वार्षिक उलाढाल ही सत्तर लाखांपेक्षा जास्त आहे. तर पुढील दोन वर्षांत सध्याच्या जीएमव्हीमध्ये चांगली वाढ करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

बाजारपेठ आणि स्पर्धा

२००७ मध्ये ३.६६ बिलियन (अब्ज) डॉलर्सची असलेली लक्झरी बाजारपेठ २०१२ मध्ये दुपटीने वाढून ७.५८ बिलियन (अब्ज) एवढी झाली होती. सीआयआय-आयएमआरबीच्या अहवालानुसार, २०१३ मधील आर्थिक मंदीचा काहीसा फटका हा लक्झरी बाजारपेठेलाही बसला होता. मात्र नंतर बाजारात पुन्हा चेतना आली आणि २०१४ मध्ये वाढीचे मार्गक्रमण सुरु राहीले. आज, वर्षाकाठी ३० टक्के दराने वाढ होत असून, भारतातील प्रिमियम आणि लक्झरी बाजारपेठ २०१६ पर्यंत ३५ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे.

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आगामी दशकात भारत एक महत्वाची लक्झरी बाजारपेठ म्हणून उदयाला येऊ शकते, पण या वाढत्या बाजारपेठेत मूल्यनिर्धारणाची भूमिका नेहमीच महत्वाची राहील.

जागतिक स्तरावर भारतात उत्पादने पाठविणाऱ्या नेट-ए-पोर्टर, गिल्ट आणि शॉपबॉब, इत्यादींची स्पर्धा आहेच. याशिवाय, ऑबस्टोअर, स्टायलिस्टा, एलिटीफाय (एलिटीफी), पेर्निया पॉप अप शॉप, एक्सक्लुझिव्हली आणि डार्वेस यांसारखी पोर्टल्सही आंतरराष्ट्रीय लक्झरी उत्पादनांमध्ये आहेत. खेरीज फॅशनॅएन्डयु, एम्पोरिओ मॉल आणि लक्झरी उत्पादनांमध्ये असलेले इतर अनेक आहेत जे रॉकएनशॉपसाठी अप्रत्यक्षपणे स्पर्धा ठरत आहेत.

आव्हाने

प्रिया यांच्या मते या क्षेत्रातील सर्वात मोठे आव्हान आहे, ते योग्य ग्राहक ओळखण्याचे आणि योग्य त्या सामाजिक व्यासपीठांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे...

त्या पुढे सांगतात, की या ठिकाणी दोन प्रकारचे ग्राहक दिसतात – द प्रिमियम इव्हॉल्वड कन्स्युमर्स आणि ऍस्पिरेशनल कन्स्युमर्स (आकांक्षा असलेले ग्राहक). पहिल्या प्रकारचे ग्राहक हे भावनिक खरेदीमधून आनंद मिळवितात. तर दुसऱ्या प्रकारच्या ग्राहकांना प्रिमियम किंवा लक्झरी ब्रॅंडस् ची उत्पादने किंवा कपडे खरेदी करण्याची आणि तशा प्रकारच्या जीवनशैलीचा अनुभव घेण्याची इच्छा असते. हेच ग्राहक या विभागाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतील...

“ या आव्हानांचा सामना करणे आणि आपल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करण्याचे काम आम्ही करत आहोत. येत्या काही महिन्यात कळसावर पोहचण्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि या विभागात अधिक प्रगती साधण्याचीही,” प्रिया सांगतात.

लेखक – तौसिफ आलम

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags