संपादने
Marathi

चला पाहूया सीने तारकांचे इ-कॉमर्स सोबत असलेले संबंध

Team YS Marathi
26th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

कोणी जाहिरात करते आहे, तर कोणाची भागीदारी आहे ....

अभिनेत्री देखील आहेत यात आघाडीवर ...

कोणी फॅशन शिकवते आहे तर कोणी नृत्य ......

जस्ट डायल ने जेव्हा आईपीओ आणण्याची घोषणा केली तेव्हा त्याचे संस्थापक वीवीएस मणी यांनी सुटकेचा निश्वास टाकला करण १४ वर्षां पूर्वीचे त्यांचे स्वप्न आता मूर्त रुपात अवतरत होते. या आधी २०१० मध्ये कंपनीने अमिताभ बच्चन यांना ब्रांड अम्बेसेडर बनवले होते आणि याचा मोबदला म्हणून त्यांना ६२ हजार शेअर १० रुपयाच्या किंमतीवर दिले होते. ज्या दिवशी कंपनीचा आयपीओ लिस्ट झाला त्या दिवशी या शेअरची किमत ३.८३ करोड झाली. ज्या नंतर ती सतत वाढतच आहे आणि आता त्याची किंमत सुमारे १० करोडच्या जवळपास आहे.

तसे पाहता कलाकार ओळखले जातात त्यांच्या अभिनयासाठी मात्र असे बरेच कलाकार आहेत जे त्याचा पैसा नव्या कंपन्यांमध्ये गुंतवतात. अशा कलाकारांमध्ये सलमान खान आणि ए आर रहमान पासून करिष्मा कपूर, हृतिक रोशन आणि अगदी सनी लिओनि सारख्या व्यक्तीही सहभागी आहेत. सिनेमा क्षेत्राशी संबंधित या प्रसिद्ध व्यक्ती एकतर नव्या उद्योगां मध्ये सरळ पैसे गुंतवतात अथवा त्यांचे ब्रांड अम्बेसेडर बनून कंपनीमध्ये हिस्सेदार बनतात. चला तर पाहूया कोणत्या कलाकाराने कुठे आपला पैसा गुंतवला आहे.

१. सलमान खान, Yatra.com, Being Human

आज यात्रा ऑनलाइन हा काही स्टार्टअप राहिलेले नाही मात्र सात वर्षां आधी या पर्यटन कंपनीला अमेरिकन उद्योग नॉरवेस्ट आणि इंटेल कॅपिटल यांनी आधार दिला होता. तेव्हा हे लोक सलमान खानला देखील आपल्या सोबत जोडू इच्छित होते. त्या वेळी सलमान सिनेमा करता करोडो रुपये घेत असे. हे पाहून या लोकांनी सलमान खान सोबत एक मजेदार डील केली. त्यांनी सलमानला जाहिरातीच्या मोबदल्यात कंपनीत वाटेकरी बनविले. ज्या नुसार सलमानने कंपनी साठी जाहिरात करायची होती आणि त्या बदल्यात कंपनी त्याना देणार होती ५ टक्के भागीदारी. या शिवाय आपल्याला माहितीच असेल सलमान खान ‘Being Human’ नावाने एक ऑनलाइन दुकानही चालवतात जिथे त्यांच्या या ब्रांडचे टीशर्ट आणि घड्याळे विकली जातात.


image


२. करिष्मा कपूर, Babyoye.com

आपल्याला माहित आहे का कि करिष्मा कपूर Babyoye.com ची सगळ्यात मोठी शेअर होल्डर आहे. Babyoye.com ही एक इ कॉमर्स स्टोर कंपनी आहे जी लहान मुलांचे सामान बनवते. याचे संचालन Nest Childcare Services Pvt. Ltd ही कंपनी करते. या कंपनीत करीश्माचे २६ टक्के शेअर आहेत. जेव्हा कि दुसऱ्या गुंतवणूकदारां मध्ये Accel Partners आणि Tiger Global आहेत. या कंपनीची स्थापना अरुनिमा सिंह आणि संजय नंदकरणी यांनी मिळून केली होती.


image


३. अजय देवगण, Ticketplease.com

Ticketplease.com चा दावा आहे कि ते असे एकमेव पोर्टल आहे जिथे चित्रपट, संगीत महोत्सव, नाटक आणि खेळाशी संबंधित अन्य कार्यक्रम मजेदार पद्धतीने साजरे केले जातात. या कामां मध्ये चित्रपटांचा प्रचार करण्याचे देखील काम आहे. ‘जट यमला पगला दिवाना’ या चित्रपटाच्या प्रचाराच्या वेळी अजय देवगण याने Ticketplease.com ला त्याचे संस्थापक आणि सीइओ जिमी मिस्त्री यांच्या सोबत प्रचाराचे काम सुरु केले होते. तेव्हा अजय देवगण यांनी सांगितले होते की, त्यांना या कल्पनेवर विश्वास आहे आणि ते या करता ब्लाॅग लिहिण्यासाठी वेळ काढतील ज्याने ते आपल्या चाहत्यांच्या अजून जवळ जाऊ शकतील. मात्र चारच ब्लाॅग लिहिल्यानंतर त्याला बंद करण्यात आले.


image


४. शेखर कपूर, ए आर रहमान, Qyuki

दोन प्रसिद्ध सृजनशील व्यक्ती शेखर कपूर आणि ए आर रहमान देखील Qyuki Digital Media Pvt.Ltd. माध्यमातून सोशल मिडिया मध्ये प्रवेश कर्ते झाले आहेत. २०१२ साली Qyuki ने सोशल मिडियाच्या माध्यमातून भारतीय युवकांना नव्या प्रकारे एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला या कंपनीमध्ये सिस्को ने गुंतवणूक केली होती. त्याचाच भाग म्हणून Qyuki चा प्लॅटफोर्म सिस्कोने बनवला. या नंतर याच्या लिखाणात बराच बदल झाला आहे.


image


५. सुझान, मलाइका, बिपाशा, The Label Corp

The Label Corp ची स्थापना प्रीत सुखंतर यांनी केली होती. ज्या प्रसिद्ध व्यक्तींच्या विशेषतेला स्वतः सोबत जोडून भारतातील पहिली एडीटोरीयल ई –कॉमर्स ब्रांड बनू इच्छित होत्या. आज त्यांच्या कंपनीचे तीन ब्रांड बाजारात आहेत. सुझान खान सोबत The Home Label, मलाइका अरोरा-खान सह The Closet Label आणि बिपाशा बासू सोबत The Trunk Label.


image


६. हृतिक रोशन, दोन अज्ञात स्टार्टअप

सिनेमा क्षेत्रासोबत जोडलेल्या संबंधितांकडून मिळालेल्या माहितीनुसार हृतिक रोशन ने दोन स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केलेली आहे ज्याचा अजून पर्यंत खुलासा झालेला नाही. मात्र अंदाज आहे की यातील एक हे ऑनलाइन रिटेलर आहे तर दुसरी आताच सुरु झालेली कंपनी आहे जी खेळांचे स्टेडीयम बनवण्याच्या कामाशी संबधित आहे.


image


७. माधुरी दीक्षित नेने, 'डान्स विथ माधुरी'

माधुरी दीक्षित यांनी इंटरनेट च्या ताकदीचा योग्य वापर करत ऑनलाइन डान्स अॅकेडमी चालू केली आहे. या 'डान्स विथ माधुरी' चा हेतू आहे अशा लोकांची मदत करणे जे नृत्य आणि व्यायामाच्या माध्यमातून फिट राहू इच्छितात. नृत्य एक असे माध्यम आहे जे अधिकतर युवकांना आपल्याकडे आकर्षित करते आणि त्या यासाठी युट्यूब चा वापर करतात.


image


८. सनी लिओनि, IMBesharam.com

सनी लिओनि या एका प्रौढांसाठी असलेल्या ऑनलाइन स्टोर IMBesharam.com च्या प्रचारक आहेत. याला सप्टेंबर २०१२ मध्ये बाजारात उतरवण्यात आले होते. या दुकानात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रौढ व्यक्तीं करिता खेळणी, अंतरवस्त्रे, कपडे, पादत्राणे, आणि अन्य गोष्टी मिळतात.


image


९. डिनो मोरया, Coolmaal.net

डिनो मोरया Coolmaal.net च्या माध्यमातून इ-कॉमर्स वेबसाईट सोबत जोडले गेले. जी चित्रपटांच्या प्रचाराच्या गरजेवर जोर देते. यांनी आता पर्यंत बॉडीगार्ड, जिंदगी ना मिलेगी दोबारा या सारख्या अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे.

१०. शिल्पा शेट्टी, Grouphomebuyers.com

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा हे सह संस्थापक आहेत एका प्रॉपर्टी वेबसाइट Grouphomebuyers.com चे. या वेबसाईट चा असा दावा आहे कि यांनी आता पर्यंत २०० कुटुंबाना कमी खर्चात प्रॉपर्टी शोधून ती खरेदी करण्यात मदत केली आहे. Grouphomebuyers.com लवकरच देशातील मोठ्या शहरांमध्ये एक नवा निवासी प्रकल्प आणणार आहेत. या वेबसाईट च्या माध्यमातून लोक या निवासी प्रकल्पात स्वस्तात खरेदी करू शकतात.

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : सुयोग सुर्वे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags