'इन्व्हेस्ट कर्नाटक २०१६'मधील गुंतवणूक आणि संधी

'इन्व्हेस्ट कर्नाटक २०१६'मधील गुंतवणूक आणि संधी

Thursday February 04, 2016,

3 min Read

हे वर्ष कर्नाटक राज्याकरिता सुगीचे वर्ष ठरणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी 'इन्व्हेस्ट कर्नाटक २०१६' कार्यक्रमाच्या उद्घाटनादिवशी राज्याने काही महत्वाचे प्रकल्प आणि मोठ्या गुंतवणूकीची कमाई केली आहे. तीन दिवसाच्या जागतिक गुंतवणूकदारांच्या बैठकीद्वारे एक लाख कोटींचा निधी मिळवण्याची कर्नाटक राज्याची योजना आहे. 'जेथे भविष्य घडविले जाते', या घोषवाक्याखाली कर्नाटक राज्याने हा उपक्रम राबवला आहे. बंगळूरू येथे नुकतीच 'इन्व्हेस्ट कर्नाटक' बैठक पार पडली. त्यात काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या, त्या खालीलप्रमाणे,

 आदित्य बिर्ला उद्योगसमूहाने टेलिकॉम, पोशाख आणि किरकोळ व्यवसायात अतिरिक्त दोन हजार कोटींची गुंतवणूक केली.

 अनिल धीरुभाई अंबानी समूह अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानाकरिता धीरुभाई अंबानी केंद्राची स्थापना करणार आहे.

 उर्जा क्षेत्रात अदानी समूहाने ११ हजार ५०० कोटींची गुंतवणूक करण्याचे योजिले आहे.

 येत्या तीन चार वर्षात ३५ हजार कोटींची गुंतवणूक कर्नाटक राज्यात करण्याचे जेएसडब्ल्यूने वचन दिले आहे.

 रॉबर्ट बोस्च यांनी २०१६ साली एक हजार कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

 विप्रो माहिती तंत्रज्ञान व्यवसायाने कर्नाटक राज्यात २५ हजार कर्मचाऱ्यांची वाढ केली आहे.

 रस्ता वाहतूक मंत्रालय राज्यात चार हजार किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग बांधणार आहे. डिसेंबर २०१६ पूर्वी कर्नाटक राज्यात रस्त्यांच्या विकासाकरिता ६० हजार कोटींची गुंतवणूक करण्याची त्यांनी घोषणा केली आहे.

 २०१७ साली राष्ट्रीय महामार्गांकरिता ४० हजार कोटींची अतिरिक्त गुंतवणूक आणि बंदर विकासाकरिता २०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

 कर्नाटक राज्य सरकारकडे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फार्मासिट्युकल एज्युकेशन आणि रिसर्च केंद्र उभारण्यासाठीचा प्रस्ताव आहे.

 १.३ दशलक्ष टन युरीया उत्पादनाचा प्रकल्प उत्तर कर्नाटकमध्ये उभारण्याचा त्यांचा विचार आहे. तसेच प्लास्टिक इंजिनीयरींग आणि टेक्नॉलॉजीकरिता बंगळूरू येथे संशोधन आणि विकास केंद्र उभारण्याची त्यांची योजना आहे.

image


'औद्योगिकीकरण किंवा विनाश', या एम.विश्वेश्वरय्या यांच्या मुद्द्यांचा हवाला देताना कर्नाटकचे औद्योगिक मंत्री आर. वी. देशपांडे यांनी सांगितले की, हे ते घोषवाक्य आहे, ज्यावर राज्य काम करत आहे. गुंतवणूकदारांना त्यांनी 'इन्व्हेंट, इनोव्हेट आणि इन्व्हेस्ट इन कर्नाटक', असे आवाहन केले असून, भविष्य हे येथेच आणि आताच घडवले जाणार आहे, असे सांगितले. गेल्या महिन्यात झालेल्या इन्व्हेस्ट कर्नाटक बैठकीच्या पूर्वचिन्हांनुसार मुख्यमंत्री सिद्धरामैय्या सांगतात की, 'राज्याचे औद्योगिक धोरण २०१४-१९'चे लक्ष्य हे वार्षिक वाढ ही १२ टक्क्यांनी करण्याचे आहे. तसेच येत्या पाच वर्षांमध्ये पाच लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आणणे आणि १५ लाख लोकांना रोजगार देण्याची त्यांची योजना आहे. त्यांच्या मते 'गेल्या दोन वर्षात आम्ही ४५०हून अधिक प्रकल्पांना मंजूरी दिली असून, जवळपास १.२१ लाख कोटींची गुंतवणूक त्याद्वारे आणली आहे. तसेच त्यामुळे जवळपास २.४४ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र याहूनही अधिक काम करण्याची आवश्यकता आहे.'

image


कॉर्पोरेट जगतातील तज्ज्ञ, उद्योजक, आंतरराष्ट्रीय मान्यवर आणि राजकारणी या कार्य़क्रमाला उपस्थित होते. केंद्रीय वित्तमंत्री, कॉर्पोरेट व्यवहार आणि माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते या कार्य़क्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जाईच्या फुलाने राज्याचा सुगंध हा दूरवर पसरवला आहे. फलोत्पादनाच्या या उत्पादनात व्यवसायाचे मोठे सामर्थ्य आहे. वातावरणाबद्दल बोलताना 'इन्व्हेस्ट कर्नाटक'करिता दहा कारणे असून, राज्याची राजधानी बंगळूरू येथील वातावरण कशाप्रकारे हेवा वाटणारे असून, काम करण्यासाठी तसेच राहण्यासाठी ही सर्वोत्तम जागा असल्याचे राज्यसरकारने आपल्या भाषणात अधोरेखित केले. प्रत्येक वक्त्याच्या भाषणात याचाच प्रतिसाद उमटत होता.

image


image


विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, राज्याच्या राजधानीत आरोग्यवर्धक वातावरण असून, कोणत्याही व्यवसायाला पोषक असे वातावरण येथे आहे. येथे तुम्ही बीईएमएलसारखे अवजड अभियांत्रिकी उद्योग सुरू करा किंवा इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्ससारख्या उच्चशिक्षण संस्था सुरू करा. मद्य उत्पादनात आणि मद्याकरिता द्राक्ष उत्पादन करणे, यात कर्नाटक राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र पायाभूत सुविधांच्या गोंधळात शहराने स्वतःचे स्थान निर्माण केले. नारायण मूर्ती आणि अझिम प्रेमजी यांच्या मते, शहराला सध्या पायाभूत सुविधांची पूर्तता करणे आवश्यक असून, तेथील जीवनमान राहण्यास योग्य बनवणे, गरजेचे आहे. येत्या दोन दिवसात तुम्ही त्या कार्यक्रमाला भेट देऊ शकता. शेती, उर्जा, बायोटेक, पर्यटन, अवकाश, माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील जवळपास ३००हून अधिक एक्झिबिटर्स तेथे उपस्थित असून, राज्याचा विकास आणि वाढ तुम्हाला तेथे पाहावयास मिळू शकते.

image


लेखक – दिप्ती नायर

अनुवाद – रंजिता परब