संपादने
Marathi

लघुकर्ज उभारुन गरजूंच्या जीवनात आनंदाचे रंग भरणारी ‘रंग दे’!

sachin joshi
5th Nov 2015
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

आपल्या दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक लोकांना भेटतो ज्याचं पोट हातावर चालतं, उदा. भाजी विक्रेते, फळ विक्रेते...हे लोक आपल्याकडील पैशातून घाऊक व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करतात आणि घरोघरी जाऊन तो विकतात. पण या लोकांना रोज भांडवल लागतं. त्यामुळे त्यांना नेहमी कर्ज घेण्याची वेळ येते. पण या लोकांना लागणारं लघु कर्ज कोण देणार हा प्रश्न असतो. सामाजिक बांधिलकी म्हणून काही लोक मदत करतात, पण त्यांच्यापुढे दररोज येणारी ही समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरुपी उपाय आवश्यक आहे. हा उपाय शोधला आहे स्मिता रामकृष्ण आणि रामकृष्ण एन.के. यांनी...त्यांनी गरजू लोक आणि दाते यांना एकत्र आणून लोकसहभागातून अर्थपुरवठा करणारं व्यासपीठ ‘रंग दे’ स्थापन केलंय.


image


‘रंग दे’ची सुरूवात २००८ मध्ये झाली. दलालांना टाळून गरजवंताला थेट कर्जपुरवठा केला तर व्याज कमी होऊ शकेल आणि भारतातील गरीबी कमी करण्यासाठी मदत होईल असा त्यांचा हेतू होता. अर्थशास्त्रातील पदवी आणि समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर स्मिता यांनी अनेक स्वयंसेवी संस्थांमध्ये विविध पदांवर काम केलंय. हे काम करत असताना समाजातून अशा संस्थांना मदत करण्याची वृत्ती कमी होत असल्याचं त्यांना जाणवलं. त्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा विचार त्यांनी केला.

देशातील १४ राज्यांमध्ये ‘रंग दे’संस्था काम करते. गुंतवणूकीसाठी लोकसहभाग वाढावा याकरता त्यांनी शंभर रुपयांचं लघुकर्ज देण्याचीही परवानगी दिली. कर्जदात्यांना काही संशय असल्यास कमी रकमेचं कर्ज देऊन त्यांना प्रयोग करता येईल आणि मग रंग देच्या या मॉडेलवर त्यांचा विश्वास बसेल तसंच त्यांचा दृष्टीकोनही बदलेल हा स्मिता यांचा हेतू होता. यात कोणताही कर्जदाता ऑनलाईन एकाच कर्जदाराला कर्ज देऊ शकतो. एकदा कर्जदाराची निवड झाली की त्याला कर्जाची रक्कम पोहोचवण्याची सोय रंग देचे कार्यकर्ते करतात, तसंच ते कर्ज वेळेत फेडलं जाईल याचीही काळजी ते घेतात. संस्थेचा खर्च चालावा यासाठी कर्जदारांनी फेडलेल्या रकमेतून अल्प अशी एक टक्का रक्कम ते कापून घेतात.


image


लोकसहभागातून अर्थपुरवठ्याची ही संकल्पना भारतात अजूनही बाल्यावस्थेत आहे. रंग दे संस्थेने मात्र चांगली सुरूवात केली आहे. भारतात या संकल्पनेचा प्रसार न होण्यामागचं कारण म्हणजे घोटाळे, अशा योजनांमध्ये झालेले गैरव्यवहार तसंच कोणावरही विश्वास न ठेवण्याची मानसिकता असल्याचं स्मिता सांगतात. अशा समाजसेवी संस्थांवर लोकांचा विश्वास रहावा यासाठी रंग दे संस्थेने आपला सर्व व्यवहार खुला आणि पारदर्शक ठेवलाय. “ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला तेव्हा लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं”, असं स्मिता सांगतात. पण अपयश येण्याची शक्यता आम्ही गृहीत धरल्यानं आम्हाला पुढे हीच मानसिकता उपयुक्त ठरली आणि एवढी प्रगती होईल अशी अपेक्षा नव्हती, असंही त्या सांगतात.

या पाच वर्षात अनेक आव्हानांचा सामना करावा लागल्याचं स्मिता सांगतात. या कामातील यशाचं श्रेय त्या सह संस्थापक राम यांनाही देतात. आपल्या महत्त्वाकांक्षेला जर आपण नियोजन आणि विचारपूर्वक कृतीची जोड दिली तर आपण यशोशिखरावर पोहोचू शकतो असा सल्लाही स्मिता देतात.

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags