Marathi

नव्या स्टार्टअपसाठी सरकारची धडाकेबाज इकोसिस्टम

Team YS Marathi
25th Jan 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

धडाडीच्या तरुणाईला नव्या कल्पनांच्या जोडीने ‘नोक-या मागणारे नको तर नोक-या देणारे व्हा’ या महत्वकांक्षेच्या जोरावर सरकारने दिल्लीमध्ये ‘स्टार्टअप’ योजनेचे उद्घाटन केले. यामध्ये नोकरशाही वर्गाच्या एका पॅनल ने सकारात्मक वातावरणाच्या सुनिश्चिततेसाठी स्टार्टअप इंडिया मिशनचे आयोजन केले. येणाऱ्या दिवसात स्टार्टअप्सच्या माध्यमातून नवीन रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात अशी सरकारची अपेक्षा आहे. सरकारला वाटते की एखादा व्यवसाय फक्त नवीन कल्पनेच्या जोरावर उभारू शकत नाही तर कोणत्याही व्यवसायाचा आलेख हा एखाद्या चक्रव्युहापेक्षा कमी नसतो आणि म्हणूनच यासाठी सरकार नियमांमध्ये सवलत, लवचिक करप्रणाली व वेळेत रजिस्ट्रेशन या सारख्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे.


image


इलेक्ट्राॅनिक्स आणि आईटी सचिव जे.एस.दीपक सांगतात की’’ कोणत्याही स्टार्टअपला वेगवेगळ्या स्तरावर अडचणींना सामोरे जावे लागते जसे व्यवसायाच्या प्रारंभाची संमती, अनुकूल कररचना, डिजिटल इंडियाच्या बरोबर करार व नियम, निधी इत्यादी. यांवर कॉर्पोरेटर व्यावसायिक सचिव तपन रे सांगतात की, ‘’आपल्याला कंपन्यांमध्ये कौशल्यपूर्वक नोंदणी करणे गरजेचे आहे अजूनही आपल्याला कंपनीला परिपूर्ण रूप देण्याअगोदर ३९ नियमांचे पालन करावे लागते,’’आता परिस्थितीच्या सकारात्मक बदलामुळे २४ तासाच्या आत कंपनी नावनोंदणीच्या प्रक्रिया पूर्ण करू शकेल.

लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी ऑगस्टमध्ये सांगितले होते की, त्यांच्या मंत्रालयाने ६५२ जिल्यातील स्किल मॅपिंग प्रोजेक्टच्या अंतर्गत इंडस्ट्रीयल प्रोफाईल तयार केले आहे. कलराज मिश्र यांच्या मते ही माहिती कोणत्याही नव्या उद्यमाच्या उभारणीसाठी फायदेशीर ठरू शकते आणि कोणीही आपल्या गरजेनुसार चांगल्या जागेची निवड करू शकतो.

लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयामधील सचिव डॉक्टर अनूप.के.पुजारी सांगतात की,’’आपल्याला तोपर्यंत काळजीचे कारण नाही जोपर्यंत आपण ती स्वतःहून ओढवून घेत नाही. यासाठी आपल्याला गरज आहे ती आपल्या समस्या पडताळून पाहण्याची, मग उत्तर आपल्या समोर असेल.’’

स्टार्टअपला बाजारातील क्लिष्ट प्रणालीपासून वाचवण्यासाठी आपल्या कठीण नियमांना ढील देत सेबी यांनी जून मध्ये घोषणा केली की, ते नव्या स्टार्टअपला आईपीओ मध्ये आणण्यासाठी तसेच गुंतवणूकदारांना ऑन लाईन संवाद साधण्याची सुविधा प्राप्त करून देईल.

नवीन सुधारित कार्यप्रणालीच्या अंतर्गत सेबी यांनी नवीन स्टार्टअपसाठी एकांगी भांडवल गोळा करण्याचे व्यासपीठ प्रदान केले आहे. ज्यासाठी ते बाजारात जास्त भांडवलदार संस्थेतून निधी गोळा करू शकेल.

सेबीचे सदस्य प्रशांत सरन यांच्या मतानुसार ‘’आमच्याकडे स्टार्टअपसाठी एक विस्तृत योजना आहे. सेबी एका खाजगी इक्विटी निधीद्वारे समर्थित एक मंच आहे’’ जेव्हा आढावा घेण्यासाठी नवीन उद्यमिनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाबाबत काय व्यवस्था आहे म्हणून विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, सध्यातरी ७० तांत्रिक उद्योजक विकास (इन्क्युबेटर) यांची आम्हाला साथ आहे. यांच्या मदतीने आम्ही शाळा,कॉलेज, आईआईटी आणि इतर अनेक जागांवर आपले स्थान सुनिश्चित करू शकतो. तसेच अनेक आव्हानांच्या जोडीने चांगल्या प्रदर्शनाची योजना आखत आहे. यामुळे आम्हाला आमची योजना किती प्रभावी आहे याची कल्पना येईल.

भारत सरकार स्टार्टअपला बळ देण्यासाठी प्रभावशाली इकोसिस्टमच्या प्रयत्नात आहे. या महत्वपूर्ण संधीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात अनुकूल नीतीचा अवलंब करून जागृती केली पाहिजे. कारण अजूनपर्यंत टीयर २ आणि टीयर ३ शहरात राहणारे उद्यमी या गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत की सरकार त्यांच्यासाठी अनेक सकारात्मक संधी घेऊन आली आहे.

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags