संपादने
Marathi

अजय चतुर्वेदी : कथा देशाचं आश्वासक मूल्य ठरलेल्या एका सिटीबॅंकरची

देशातल्या सुक्ष्म अर्थसहाय्याच्या क्षेत्रात नवक्रांती करणारा तरूण... म्हणजे अजय चतुर्वेदी

ujwala suresh thamake
26th Aug 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

व्हॉर्टन् अँन्ड पेन इजिनिअरींगमधून पदवी घेतल्यानंतर अजय चतुर्वेदी सिटी बॅंकेत अधिकार पदावर नोकरी करीत होता. अजयला चांगला पगारही मिळत होता. एके दिवशी त्याने आपली बॅग भरून हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्याला दोन आठवड्यांची सुट्टी मिळाल्यानंतर ही सक्तीची सफर होती. कदाचित जीवनाचं गवसलेलं उत्तर असंही नंतर याला म्हणता येईल. कारण त्यानंतर तो सहा महिने हिमालयात राहिला.


अजय चतुर्वेदी , संस्थापक हार्वा

अजय चतुर्वेदी , संस्थापक हार्वा


तो त्याच्या कामाबाबत समाधानी नव्हता आणि त्याच्या या आत्मपरिक्षणामुळं त्याला त्याचा मार्ग सापडला. अजय सांगतो "पिलानी इथून बीआयटीएस पदवी घेतल्यानंतर मी पहिल्या नोकरीत दोन वर्षांपेक्षा अधिक काळ नव्हतो. १९९० मध्ये बाजारात तेजी आली होती. त्यामुळं माझी व्यापारातली भांडवली बाजू माझ्या लक्षात आली होती. पण व्हॉर्टन् अँन्ड पेन इजिनिअरींगमध्ये गेल्यानंतर माझ्या ख-या प्रवासाला सुरूवात झाली. माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला तिथेच मिळाली."

हिमालयात केदारनाथ इथं गेल्यानंतर जीवन बदलून टाकणारा अनुभव त्याला आला. अखेर २०१० मध्ये त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि तो ग्रामीण भारताला सक्षम करण्यासाठी काही योजना तयार करू लागला. जीवनाचं ध्येयच बदलून गेलेल्या अजयनं मग हार्वा ही संस्था स्थापन केली.

सरकार रोजगाराच्या कोणत्याही संधी निर्माण न करता लोकांना केवळ प्रशिक्षित करण्याच्या मागे लागलंय असा त्याचा ठाम समज झाला होता. उदाहरणादाखल तो सांगतो, राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना प्रशिक्षित केलं जातं पण योग्य संधी नसल्यानं अखेर त्यांना आया, घरकाम करणारी, चौकीदार, ड्रायव्हर या पलिकडे जाता येत नाही. “तुम्ही जोपर्यंत स्वतः सहभागी होत नाही, तोपर्यंत दुस-यावर टीका करू शकत नाही. म्हणूनच विचारवंत लोकांनी ग्रामीण भारतातील समस्या समजून घेणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही या क्षेत्रात अधिक चांगले काम करू इच्छितो.”

हार्वा म्हणजे हार्नेसिंग व्यॅल्यू म्हणजे योग्य हमी दर किंवा बांधील किंमत. ग्रामीण भारतात जे लोक कौशल्य विकासाचं काम करतात, बीपीओमध्ये तसंच सामायिक शेती आणि सुक्ष्म अर्थसहाय्य या क्षेत्रात काम करतात; अशांना मदत करणं हा उद्देश आहे. गेल्या तीन वर्षांत हार्वा या संस्थेनं सातत्यानं आणि पद्धतशीरपणे आपलं काम चालू ठेवलंय. कोणत्याही फायद्याशिवाय फक्त आणि फक्त कौशल्यावर भर दिला जातो. खरंतर सुरूवातीला तळागाळात काम करणं अवघड असतं, तरीही हार्वाच्या प्रयत्नांना आता लोकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय.


छिंदवाडा, मध्य प्रदेश  येथील हार्वाचा एक्सपीओ

छिंदवाडा, मध्य प्रदेश येथील हार्वाचा एक्सपीओसुक्ष्म अर्थसहाय्य हा खरं तर नेहमीच एक नियोजनाचा भाग होता. यासाठी अजय आणि त्यांच्या सहका-यांनी हेल्प म्हणजे हार्वा कर्मचारी कर्ज योजना राबवली होती. मात्र सध्या ती मागे घेत आता हार्वा सुरक्षा ही योजना पुढे आणलीय. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातल्या लोकांना बजाज अलायन्झच्या मदतीनं सुक्ष्म विमा पुरवली जाते. अजय सांगतो, "सध्या देशात हार्वाच्या माध्यमातून वीस डीजीटल हटस् म्हणजे एक्सपीओ, (बीपीओ, एलपीओ,केपीओ) कार्यरत आहेत त्यापैकी पाच हार्वाचे आहेत तर अऩ्य फ्रेंचायझी आहेत. देशातल्या १४ राज्यात हे कार्यरत असून यात ७० टक्के महिला काम करतात. प्रत्येक एक्सपीओ हा त्या त्या भागातील ३ ते ४ गावांसाठी काम करतो. शेतकरी, विद्यार्थी अथवा विमा एजंट म्हणून काम करणा-या सुमारे १००० लोकांना हार्वाच्या माध्यमातून मदत केली जाते; ज्यांचं उत्पन्न दीड हजार रूपये ते चौदा हजार रूपये आहे.”

भविष्यात वाढीच्या दृष्टीने विचार करता हार्वा भागीदारीतही प्रकल्प राबवू इच्छिते, यात फक्त फ्रेंचायझीधारकाला फ्रेंचायझीकडून पैसे दिले जात नाहीत. हा बदल याचसाठी आहे की, हार्वा ही सर्व बाबींसाठी जबाबदार राहते. मधल्या पातळीवरील व्यवस्थापन लवकरात लवकर मजबूत करण्याचा अजयचा मानस आहे. तर लांब पल्ल्याचा विचार करता देश पातळीवर हा प्रकल्प राबवणं आणि अन्य देशांतही त्य़ाचे मॉडेल सुरू करणं.

हार्वा एक्सपीओ आणि अन्य केंद्र उभारताना कमकुवत पायाभूत सुविधा आणि दळण वळणाची अपूरी साधनं ही अजयच्या पुढची आव्हानं होती. त्याहून कठिण होतं ते लोकांची मानसिकता बदलून त्यांना हार्वाची गरज आणि उपयुक्तता समजावून देणं. अन्य बीपीओच्या तुलनेत अत्यंत कमी घसारा दर हे हार्वाचं वेगळेपण आहे. याबाबत बोलताना अजय सांगतो, "संधीमधूनच निष्ठा जन्माला येते (अगदी पांढरपेशी नोकरीत सुद्धा), जी संधी हार्वा लोकांना उपलब्ध करून देते. आम्ही सुक्ष्म विमा योजनेसाठी ७ टक्के प्रिमिअम देतो. नैसर्गिक मूल्य शाबूत ठेवणं हा आमचा उद्देश असतो.”


हार्वाच्या एक्सपीओत काम करणा-या महिला

हार्वाच्या एक्सपीओत काम करणा-या महिला


अजयच्या या कामाचं जगभरातून कौतुक करण्यात आलंय. यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेच्या मानाच्या यंग ग्लोबल लिडर २०१३ या पुरस्काराचाही समावेश आहे. अँमस्टरडॅम स्कूल ऑफ क्रिएटीव्ह लिडरशीप या संस्थेनं जगभरातून निवडलेल्या ५० सर्जनशील युवकांमध्ये अजयचा समावेश होता. एक उद्योजक म्हणून त्याच्या या प्रवासाबद्दल आणि प्रेरणेबद्दल अजय सांगतो, "एका विशिष्ट बिंदुनंतर तुमची निराशा तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही, मग तुमच्या ध्येयाकडे तुम्ही पळू लागता. फेसबूकने जे गारूड करोडो लोकांवर केलंय, मला तेच ग्रामीण भारतासाठी करायचं आहे. आम्हाला आपल्या अर्थव्यवस्थेतील उत्पादकांसाठी काम करायचंय केवळ सवलती मागणाऱ्या ग्राहकांसाठी नाही. हे कठीण आहे, पण अशक्य नाही. कारण यासाठी एक आवश्यक अवकाश आहे आणि गरजही."

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags