संपादने
Marathi

"मी जन्माने तर जीनियस होतेच पण इडियट बनण्याचा निर्णय माझा होता, मला माझ्या निर्णयावर गर्व आहे"

Team YS Marathi
11th Apr 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

प्रत्येक मनुष्याच्या आपल्या काही गरजा, इच्छा व स्वप्न असतात ज्याला तो साकारण्याचा प्रयत्न करीत असतो. आपले स्वप्न सत्यात परिवर्तीत करण्यासाठी तो अखेरपर्यंत संघर्ष करतो. स्वप्न बघणे ही आपली वैयक्तिक गोष्ट आहे. बऱ्याचवेळा मनुष्य आपल्या अगदी जवळच्या माणसाची सुद्धा इच्छा पूर्ण करतो. पण दुसऱ्यांच्या गरजा, इच्छा व स्वप्नाला पूर्ण करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची जाणीवच जर कुणाचे स्वप्न व छंद असेल तर त्याला तुम्ही काय म्हणाल? ते पण अशा वयात जेव्हा तरुण आपल्या इच्छांची गगनभरारी घेण्यासाठी उत्सुक असतात. पुढे जाण्याची धडपड, गोष्टी झटपट मिळवण्याची लालसा, उंची गाठण्याचे ध्येय या सगळयांमध्ये निराळी असलेली ही भोपाळची मुलगी. एकदम मनमौजी, मनाचे ऐकणारी, जगाची पर्वा न करणारी. आम्ही बोलत आहोत २४ वर्षीय त्या तरुण वाईल्ड लाईफ फोटोग्राफर व ट्रॅव्हल ब्लॉगर निकिता कोठारीविषयी. जिने जेनेटिक इंजिनिअरींगचे शिक्षण घेतल्यानंतर त्या क्षेत्राला साजेशे काम करण्याऐवजी फोटोग्राफी, लेखन व समाजसेवेचा मार्ग अनुसरला. जी खूप हिंडते, फिरते, लिहिते, व निसर्गाच्या मनमोहक क्षणाला आपल्या कॅमेरात बंदिस्त करते. तिला स्वत:पेक्षा जास्त काळजी त्यांची आहे जे गरीब, वंचित व अभावग्रस्त आहेत आणि जे आधुनिक समाजात राहून सुख-सुविधांपासून कोसो दूर आहेत. ज्यांच्या गरजा, इच्छा, स्वप्न नेहमीच अपूर्ण राहतात आणि अतिशय कठीण काळात सुद्धा संपन्न समाजाकडून त्यांना कुणाचीच मदत, प्रेम व आपलेपणा मिळत नाही. पण आता निकिता कोठारीच्या रूपाने त्यांना एक अशी साथीदार मिळाली आहे जी अशा लोकांना समजून घेते, त्यांच्याशी प्रेमाने वागून त्यांना आपले मानते, त्यांच्या आनंदासाठीच काम करते. निकिताच्या इमानदार प्रयत्नांनी काही मुलांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले व आज तोच समाज निकिताच्या या सकारात्मक प्रारंभाला आशेच्या नजरेने पाहत आहे.

image


म्हणजे सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होतील

निकिता तिच्या एका प्रोजेक्ट(प्रकल्प) अंतर्गत अशा गरीब व वंचित समाजातील मुलांच्या स्वप्नांना, गरजांना व इच्छांना पूर्ण करते ज्यांना आर्थिक किंवा सामाजिक अडचणींमुळे त्यांच्या पालकांद्वारे दुर्लक्षित केले जाते. या प्रोजेक्टद्वारे त्या सरकारी व स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित अशा शाळांवर लक्ष केंद्रित करते जिथे वंचित समाजातील मुले शिकतात. ती अशा मुलांना एका पांढऱ्या कागदावर त्यांच्या छोट्याछोट्या इच्छा व गरजा लिहिण्यास सांगते ज्या ते पूर्ण करू इच्छिता आणि निकिता त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. काही दिवसांपूर्वीच परवरीश नामक एका संस्थेद्वारे संचालित शाळेतील मुलांनी आपल्या भिन्नभिन्न इच्छा व्यक्त केल्या. कुणी शाळेत जाण्यासाठी सायकलची इच्छा, तर कुणी जीवनातील प्रत्येक आनंदाच्या क्षणाला कॅमेरात मध्ये बंदिस्त करण्याची इच्छा, कुणाला डान्स, अभिनय, मोठ्या शाळेत शिकण्याची इच्छा तर कुणाला कॉम्प्युटर- व्हिडीओगेम खेळण्याची, तर कुणी आपले फाटलेले बूट, कपडे, मोजे बदलण्यासारख्या इच्छा नमूद केल्या होत्या. याचप्रकारे मुलांनी बॅग, घड्याळ, घुंगरू, पैजण, बांगड्या, पुस्तके, खेळणी इ. इच्छा व्यक्त केल्या होत्या. ही मुले शहरातील वेगवेगळ्या झोपडपट्टीत राहतात. ज्यांचे पालक इच्छा पूर्ण करणे तर दूरच पण त्यांच्या नित्य गरजाच मोठ्या मुश्किलीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. निकिता अशा सगळ्या मुलांबरोबर वेळ घालवतात, त्यांना समजून घेतात व त्यांच्या इच्छा पूर्ण करतात.

imageकाही लोकांचा एक असा समूह आहे जो मुलभूत गरजा व इच्छा मारलेल्या मुलांच्या इच्छापूर्तीसाठी त्यांना पैसे व इच्छित वस्तू उपलब्ध करवतात. निकिता कोठारी वैश्विक संस्था वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सहयोगी संघटन वर्ल्ड शेपर्स कम्युनिटीबरोबर मिळून काम करते. ही एक वैश्विक संस्था आहे जी जगभरातील तरुणांना एकत्रित करते, ज्यांच्यात नेतृत्व क्षमता, समाज बदलण्याचे कौशल्य व योग्यता आहे. तरुणांना संघटीत करून ही संस्था स्थानिक स्तरावर पण कार्य करते. निकिता ग्लोबल शेपर्स कम्युनिटी भोपाल हबची सदस्य आहे. मुलांद्वारे जाणून घेतलेल्या त्यांच्या इच्छा हे लोक सोशल नेटवर्क साईट व ग्लोबल शेपर्स कम्युनिटी साईटवर शेअर करतात तर काही लोक ई-कॉमर्स मार्केटिंग द्वारे सरळ सामान पाठवतात. निकिता एक असा फोरम बनवू इच्छिते जिथे श्रीमंत व सक्षम लोक आपल्या मुलांची जुनी पुस्तकं, खेळणी, कपडे व इतरही वस्तू दान करून किंवा त्या वस्तू निम्म्या किंमतीत विकू शकतील ज्यामुळे या मुलांच्या गरजा सहज पूर्ण होतील.

image


समाजातील भेद मिटवण्याचे लक्ष्य

"आमचे लक्ष्य असा सुदृढ समाज बनवण्याचा आहे जिथे मुलांमध्ये गरीब श्रीमंतीचा कोणताही भेदभाव नसेल. गरीब मुलांच्या मुलभूत गरजा पूर्ण करून त्यांना जीवनात पुढे जाण्याची समान संधी मिळाली पाहिजे. त्यांनी स्वतःला उपेक्षित समजू नये. ही जबाबदारी आपली सगळ्यांची असली पाहिजे." निकिता सांगते की, आपण पैसे किंवा सामान देऊनच मुलांची मदत करू शकतो असे नाही पण जर आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचे कौशल्य असेल तर आपण ते मुलांना शिकवू शकतो, जे त्यांना भविष्यात उपयोगी पडेल. समाजातील प्रत्येक संपन्न माणसाने आपल्या जवळपासच्या एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलला तर एक दिवस नक्कीच समाजात परिवर्तन होईल. सामाजिक कार्याची तसेच दुसऱ्यांचे दु:ख समजून घेण्याची प्रेरणा निकिताला घरातूनच मिळाली आहे. पेशाने व्यावसायिक असलेल्या वडिलांच्या कारखान्यात अनेक मजूर काम करायचे. वडिल व आईचे मजुरांप्रती असलेली वागणूक ही उदार होती ते आपल्या कर्मचा-यांच्या समस्या निवारण करून त्यांच्या कुटुंबाच्या व मुलांच्या गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष्य द्यायचे. या सगळ्या गोष्टींमुळेच निकिताच्या मनात लहानपणापासून गरिबांबद्दल सहानुभूती निर्माण झाली व अशा मुलांचे आयुष्य मार्गी लावण्याकडे तिचा कल सुरु झाला.

image


जीनियस बाय बर्थ .....इडियट बाय चॉइस

निकिताने चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठातून जेनेटिक इंजिनीअरची पदवी पहिल्या श्रेणीतून उत्तीर्ण केली. तिने पहिल्याच प्रयत्नात गेट व आयसीएआरची परीक्षा उत्तीर्ण करून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले, ज्यामध्ये तिला सुवर्णपदक प्राप्त झाले. तिच्याकडे नोकरी व्यतिरिक्त शिक्षणाच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध होत्या. परंतु निकिताच्या मनात वेगळ्या क्षेत्राचा विचार होता. निकिता सांगते की, "भारतात यशस्वी विद्यार्थ्यांची गणना ही आयआयटी व आयआयएमची परीक्षा उत्तीर्ण करून तगड्या पगाराची नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात गेल्यानेच होते. काही जण पीएचडीला पण या मापदंडात तोलतात."

image


पण निकिताने थ्री इडीयटच्या फरहान कुरेशी यांचा मार्ग निवडला. ज्यांनी फक्त आपल्या मनाचे ऐकले. जीवनात फक्त तेच केले जे त्याला योग्य वाटले, मग त्या निर्णयाने कितीही बोटे आपल्याकडे निर्देशली गेली तरीही. गंमतीत निकिता सांगते,"मी जन्माने तर जीनियस होतेच पण इडियट बनण्याचा निर्णय माझा होता, व मला माझ्या निर्णयावर गर्व आहे."

निकिता एक यशस्वी वाईल्डलाईफ फोटोग्राफर, ट्रॅव्हल लाँग राइटर, फ्रीलांस रिसर्च व एक सामाजिक कार्यकर्ती आहे. प्रथम तिला पण कुटुंबाकडून विरोध सहन करावा लागला पण आज तेच तिच्या कामाची प्रशंसा करतात.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

चाकोरीबाहेर पडण्याची हिंमत दाखविणाऱ्या डेंटल सर्जनची आगळीवेगळी कहाणी 

ध्येय हेच सारे जग एक वर्गखोली आणि एका खोलीत पूर्ण विद्यापिठ, स्वप्न : देशाला शंभरटक्के साक्षर करण्याचे”

तगड्या पगाराच्या नोकरीला रामराम ठोकत गावाचा विकास साधणाऱ्या छवी राजावत    

लेखक : हुसैन ताबिश

अनुवाद : किरण ठाकरे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags