संपादने
Marathi

आरोग्यवर्धक स्वादाची मेजवानी ! ‘स्नॅक्स एक्सपर्टस्’

Janhavi Rege
16th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
image


हल्ली बाजारात अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. तळेलेले, चमचमीत, मसालेदार पदार्थ खाण्यास कुरकुरीत आणि चवदार जरी वाटत असले तरी आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. हे पदार्थ जास्त काळ टिकावे म्हणून त्यात मोठ्या प्रमाणात प्रिझर्वेटीव्हज् देखील घातले जातात. वेळी- अवेळी, बाहेर असताना भूक लागल्यावर अनेकजण सर्रासपणे अशा पदार्थांवर ताव मारताना दिसतात आणि विविध आजारांना आमंत्रण देतात. नेमकी हीच बाब हेरून चेन्नई इथल्या तीन आहार खव्वयांनी पौष्टिक, आरोग्यदायी अल्पोपहार पुरवणारी ‘स्नॅक्स एक्सपर्टस्’ नावाची संस्था सुरु केली. 

दिवसेंदिवस नवनवीन आजर बळावत चालल्याचे पाहता लोकही आरोग्याच्या बाबतीत अत्यंत जागरूक झालेले आहेत. पारंपारिक तेलकट पदार्थांची जागा आता तेलविरहीत, साखर विरहीत, कमी उष्मांक असलेल्या पौष्टिक पदार्थांनी घेतलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून पोषक आहार पुरवणाऱ्या संस्था ठिकठिकाणी पहावयास मिळतात. यापैकीच एक म्हणजे ‘स्नॅक्स एक्सपर्टस्’.

 स्नॅक्स एक्सपर्टस् चा सोपा सिद्धांत

चहा पिताना किवा गप्पाटप्पा रंगात आल्यावर जंक फूड किती प्रमाणात खाल्ले जाते हे बरेचदा आपले आपल्यालाच कळत नाही., असेच एकदा चहाचा आनंद लुटताना, अरुण प्रकाश, अरुल मुरुगन आणि मेरी शामला या तिघांना एक नाविण्यपूर्ण कल्पना सुचली आणि त्यातूनच स्नॅक्स एक्सपर्टस्चा जन्म झाला आणि स्नॅक्स एक्सपर्टमार्फत पुरवले जाणारे पोषक न्याहारीचे ऑनलाईन दुकान फक्त चेन्नई पुरतेच मर्यादित राहिले नाही तर संपूर्ण भारतभर पोषक पदार्थ पुरवू लागले.

सुरवातीला पेशाने व्यवस्थापन सल्लागार असणाऱ्या अरुण यांनी बाजारात उपलब्ध असणाऱ्या आरोग्यदायी पौष्टिक पदार्थांची उपलब्धता तपासली. बाजारात ठिकठिकाणी त्यांनी अशा पदार्थांचा शोध घेतला, मात्र त्याच्या हाती काहीच लागले नाही.

“ घरी तयार केलेले पदार्थ आणि विशेषतः आपल्या आईने बनवलेले पदार्थ आपण जसे बिनधास्त खातो आणि ते खात असताना आपल्या मनात कोणतीही शंका येत नाही कारण या घरगुती पदार्थांबद्दल आपल्याला खात्री असते. अशाच प्रकारचे घरगुती स्वरूपाचे, अल्पोपहारासाठी उपयुक्त असे आरोग्यदायी पदार्थ बनवून बाजारात उपलब्ध करून द्यावे या हेतूने आम्ही तिघे तयारीला लागलो.” अरुण यांनी सांगितले.

२०१४ मध्ये सुचलेली ही कल्पना काही महिन्यातच प्रत्यक्षात अंमलात आणली गेली. तिघांनीही स्वतःची नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ हेच काम केले. तामिळनाडूत दिंडीगुल कंपनीत क्वालिटी अॅशुरन्सचे काम करणारा अरुल मुरुगन सुद्धा नोकरी सोडून चेन्नाईला स्थलांतरित झाला आणि नंतर ऑनलाईन स्नॅक्स एक्सपर्टस् दुकान सुरु झाले.


image


सुका फराळ बनवण्यामागाचे उदिष्ट:

सुरुवातीला ह्या त्रिकुटाने फ्रुट प्लेट ,भाजलेल्या डाळी, फ्रुट सलाड देण्याचे ठरवले. पण अश्या नाशिवंत पदार्थांच्या देवाणघेवाणी बाबतीत गोष्टी किचकट होत आहे हे लक्षात घेऊन त्यांनी सुक्या फराळावर लक्ष्य केंद्रित केले. " आम्हाला असे पदार्थ द्यायचे होते की जे कमीतकमी ३०-४० दिवस साठवुन ठेवता येतील." अरुण यांनी सांगितले.

संस्थेने असे २० ते २५ पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली, ज्यातील बहुतेक हे बेक्ड स्नॅक्स होते, आहारतज्ज रंजीनी रामन यांच्या मदतीने विविध पाककृती ठरवून हळुहळू हे पदार्थ तयार करण्यात आले आणि त्यानंतर अनेक आरोग्यादायी नवनवीन पदार्थांची त्यात भर पडत गेली.

स्नॅक्स एक्सपर्टस् कडे आज ४० प्रकारचे वैविध्यपूर्ण पदार्थ असून यामध्ये नाचणी शेव, ओट्स, ड्राय फ्रुट्स लाडू, बिनसाखरेच्या ब्राउनीज , फणसाचे फ्रीटर्स आणि विविध अशा केकच्या प्रकारांचा समावेश आहे. ह्या संस्थेने स्वतःचे पदार्थ बनवण्यासाठी तमिळनाडूतील जवळ जवळ डझनभर खानावळींशी संबंध प्रस्थापित केले आहेत.

खास कसे बनले स्नॅक्स एक्सपर्टस् ?

" स्नॅक्स एक्सपर्टस् साठी ग्राहक हा एखाद्या राजाप्रमाणे असतो. ग्राहकांनी दिलेल्या अभिप्रायानुसार आम्ही सतत नवनवीन पदार्थ बनवत राहतो. जर काही पदार्थ चवदार नसतील किंवा ग्राहक पसंत करत नसतील तर आम्ही पाककृती बदलतो. आणि बदललेल्या पाककृतीनुसार केलेला पदार्थ जर लोकांना आवडला नाही तर मात्र आम्ही पूर्णतः नवीन पदार्थ बाजारात आणतो, “अरुण म्हणाले.

७५० ग्रॅम वजनाचा अल्पोपहाराचा एक डबा ६९९ रुपयाला उपलब्ध आहे. ग्राहकाच्या आवडीनूसार बनवलेले हे डब्बे कुरियर सेवेमार्फत देशभर पोहचवले जातात. पण जर मागणी चेन्नाईतून असली तर संस्थापक स्वतःहून हे डबे पोहचवतात.

स्नॅक्स मार्केट संशोधन :

पीएस मार्केटच्या संशोधनानुसार , २०१४ मध्ये जागतिक अल्पोपहार पदार्थांचे बाजारभाव १११.१ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके होते तर २०१५ आणि २०२०पर्यंत अल्पोपहाराच्या बाजारभावामध्ये ७.१ टक्के, म्हणजेच १६६.६ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

आशिया-पसिफ़िक भागामध्ये मुख्यत्वे जागतिक लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या चीन आणि भारताकडूनच अल्पोपहार पदार्थांची मागणी जास्त असून यात दिवसेगणिक मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पौष्टिक, आरोग्यदायी पदार्थ खाण्याकडे लोकांचा कल वाढला असल्याचे यावरून स्पष्ट होते.

आरोग्यदायी पदार्थांची वाढती मागणी पाहता भारतामध्ये असे अनेक नवनवीन लघुउद्योग पुढे येत आहे. त्यापैकी ‘द ग्रीन स्नॅक्स कंपनी’, 'स्नॅक्ससोर' आणि 'स्पून्जोय' या संस्थांनी तर यशाची शिखरे गाठली आहेत.

स्नॅक्स एक्सपर्टस् टीम

स्नॅक्स एक्सपर्टस् टीम


सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना

नवीन लघुद्योग, हे विपणनासाठी (मार्केटिंग) जास्त खर्च न करता काही अंशी सोशल मीडियावर खर्च करून ५०० पेक्षा अधिक देशांमध्ये जाऊन पोहोचले आहेत.

आय आय. टी. बॉम्बे इंटरप्रेनियरशिप सेल तर्फे आयोजित केलेल्या ' द टेन मिनिट मिलियन’ ह्या फंडींग इवेंटमध्ये स्नॅक्स एक्सपर्टस् टीमने १०लाख रुपये जिंकले. नंतरच्या फेरीत त्यांनी प्रसिद्ध गुंतवणूकदार अजीत खुराना, टाटा नाबी, वी. सी. कथिक आणि रवी गुरुराज ह्याच्याकडून सुमारे २० लाख रुपयाचा निधी गोळा केला.

स्वादिष्ट तसेच आरोग्यदायी नाश्त्याचे पदार्थ खाण्याची सवयच एकप्रकारे आम्हाला समाजात रुजवायची आहे. लहान मुले तसेच तरुण वर्गामध्ये देखील निरोगी आयुष्य जगण्यासाठी पौष्टिक व आरोग्यदायी पदार्थ खाण्याबाबत जागरुकता निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. असे अरुण यांनी सांगितले. अरुण यांच्या बारा जणांच्या टिममार्फत शाळाकॉलेजातून संपूर्ण देशभर ‘हेल्थी स्नॅकिंगची 'ची मोहीम राबवली जाणार असल्याचेही अरुण यांनी सांगितले.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags