संपादने
Marathi

महिला, ग्रामस्थांना बीपीओ प्रणालीसाठी सज्ज करणारे 'ऑट्रा टेक्नोलॉजीज्'

Chandrakant Yadav
9th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

जेव्हा तुम्ही बीपीओ उद्योगाबाबत (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग फर्म) बोलता वा विचार करता तेव्हा सामान्यपणे तुमच्या डोळ्यासमोर गुडगाव किंवा बंगळुरूसारख्या शहरी भागांत असलेल्या चमकदार काचेच्या मोठाल्या इमारती आणि त्यातून विविध पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणांचे चित्र तरळून जाते. आता तुमचेही खरेच आहे कारण हेच चित्र बहुतांश बीपीओंना लागूही पडते, पण आता भारतासह अन्य देशांतून आउटसोर्सिंगशी संबंधित अनेक स्टार्टअप आणि उद्योगांचा एक असा गट विकसित होतो आहे, जो ग्रामीण भागांत आणि निमशहरी भागांमध्ये आपला जम बसवू इच्छितो. ग्रामीण आणि निमशहरी भागातील युवकांमध्ये कौशल्याचा विकास करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याकडे या गटांचा कल आहे.

बीपीओची ही नवी जातकुळी आज ज्याला ‘इम्पॅक्ट सोर्सिंग’ म्हटले जाते, अशा मंडळींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते. ‘रॉकफॅलर फाउंडेशन’ इम्पॅक्ट सोर्सिंगची व्याख्या काहीशी अशीच करते : इम्पॅक्ट सोर्सिंग घरगुती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात ग्राहकाला उच्च गुणवत्ता आणि माहितीआधारित सेवा प्रदान करण्यासाठी बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (बीपीओ) केंद्रांमधून प्रमुख कार्यकर्त्यांच्या रूपात कायमस्वरूपी रोजगारांच्या मर्यादित संधींसह अन्य लोकांना रोजगार उपलब्ध करून देते.

OTRA Technologies (ऑट्रा टेक्नोलॉजीज्) ची स्थापना २०१० मध्ये ग्रामीण भागात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी तिथल्या स्थानिक रहिवाशांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केली गेली. आयटी निगडित सेवा, व्यापार प्रक्रिया, लिगल प्रोसेस आउटसोर्सिंग आणि बाजाराचे विश्लेषण तसेच संशोधनाशी संबंधित सेवा ऑट्राकडून ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात. सध्या यांच्याकडे ६३ कर्मचारी आहेत. ४० हून जास्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अद्याप सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे यात महिला बहुसंख्याक आहेत.

image


कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर हे ३५ हजार लोकसंख्येचे एक शहर आहे. शहरातील साक्षरतेचे प्रमाण राष्ट्रीय साक्षरतेपेक्षा कितीतरीपटीने उत्तम आहे. शहराच्या २३ किलोमीटर परिसरात २२ महाविद्यालये आहेत. पैकी ११ केवळ ४ किलोमीटरच्या वर्तुळात आहेत. शेती हा इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. ऊस हे मुख्य पीक आहे.

सुरवातीच्या काळात ऑट्राच्या टिममध्ये सीईओ आणि सहसंस्थापक विग्नेश चव्हाण, सहसंस्थापक आणि संचालक अमितसेन एस. जब्बानवर, सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक गोमतेश एस. जब्बानवर आणि सहसंस्थापक तसेच संचालक आनंद सी रस्तापूर सहभागी होते. मुख्य कार्यालय म्हणून बंगळुरूची निवड ठरलेली होती, पण नंतर लक्षात आले, की संकेश्वरच अधिक योग्य राहील. गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता आपल्या उत्पादनांची गुंतवणूक करायला इच्छुक कंपन्या आणि ग्रामीण भागातील लोक यांच्यातली दरी संपवण्याचे काम त्यांना करायचे होते. ग्रामीण भागातील पुरुष मंडळी कामाच्या शोधासाठी शहरांकडेच बघत असतात. बरेच जण गावही त्यासाठी सोडतात. महिलांनाही कामाची गरज असते, पण त्या गाव सोडू शकत नाहीत. कामाशिवाय राहातात. ऑट्रात एकुण कर्मचाऱ्यांपैकी ६५ टक्के कर्मचारी महिला आहेत.

ऑट्राचे सीईओ आणि सहसंस्थापक विग्नेश चव्हाण सांगतात, ‘‘ग्रामीण बीपीओच्या संकल्पनेत प्रत्येकासाठीच विजय/विजय/विजय अशी स्थिती आहे. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यात बीपीओ मदत करते. पिरॅमिडच्या सगळ्यात तळाच्या भागापर्यंतही विकासाची गंगा या माध्यमातून झिरपते आहे.’’

सद्यस्थितीत ऑट्रा आपल्या ग्राहकांना फॉर्म नमुने, डेटा एन्ट्री, स्कॅनिंग, वेब डिझायनिंगशी संबंधित सुविधा उपलब्ध करून देत आहे. महिला सशक्तीकरणासाठीही ऑट्रा आपले योगदान देत आहे. शालेय विद्यार्थ्यांना विनामूल्य संगणक प्रशिक्षणही ऑट्राकडून उपलब्ध करून दिले जाते.

अशाप्रकारे ऑट्रा ग्रामीण परिसरांतून राहणाऱ्या युवकांना विविध आस्थापनेत काम करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे कार्य करते. हे प्रशिक्षण ४५ ते ६० दिवसांपर्यंत चालते. इंग्रजी, संज्ञापन कौशल्य, मूलभूत संगणक प्रशिक्षण, एमएस वर्ल्ड, एक्सेल, टायपिंग, नेतृत्व विकास, प्रक्रिया, व्यक्तिमत्व विकास आणि बीपीओ उद्योग तसेच कॉर्पोरेट संस्कृतीसंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाचा स्तर असा असतो, की प्रशिक्षणार्थ्यांसाठी संधींचे दरवाजे आपोआप उघडू लागतात.

ऑट्रा सध्या बँकिंग आणि आर्थिक क्षेत्र, विमा कंपन्या, प्रतिलेखन कंपन्या आणि स्थानिक सरकारी विभागांसह कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देते आहे. भविष्यात बेळगाव आणि बेळगाव लगतच्या भागांमध्ये आपल्या सेवेचा विस्तार करण्याची ऑट्राची योजना आहे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags