संपादने
Marathi

मुंबईतील उपहारगृह, जेथे सांकेतिक भाषेत घेतली जाते जेवणाची ऑर्डर, सहाच महिन्यात मिळाला जोमॅटो ‘हाइयेस्ट रेटेड रेस्तरां इन मुंबई’ चा खिताब !

27th Feb 2016
Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share

कधी तुम्ही अशा उपहारगृहात गेला आहात का, जेथे तुम्हाला जेवण मागविण्यासाठी बोलून नव्हे तर, सांकेतिक भाषेत हातवारे करून जेवण मागवावे लागते आणि उपहारगृहातील वाढपी देखील त्याला योग्य समजून त्यांनी मागविलेले जेवण तुमच्यासमोर हजर करतात. असाच काहीसा प्रयत्न मुंबईत प्रशांत इस्सर आणि अनुज गोयल यांनी केला आहे. जे अनेक वर्षे विदेशात राहिल्यानंतर भारतात परतले, तेव्हा त्यांनी आपल्या व्यवसायात अशा लोकांना सामील केले जे बोलू किंवा ऐकू शकत नाहीत. मात्र, ते सामान्य लोकांपेक्षा चांगले समजू शकतात, त्यांच्यापेक्षा चांगले काम देखील करू शकतात आणि विशेषबाब ही आहे की, ते कामाचा ताण असूनही चेह-यावर नेहमी हास्य ठेवतात. मुंबईमध्ये पवईच्या हिरानंदानी गार्डन मध्ये ‘मिर्च एंड माइम’ कदाचित देशातील पहिले असे उपहारगृह आहे, जेथे काम करणा-या सर्व महिला आणि पुरुष वाढपी मूकबधीर आहेत. 

image


लाचार लोकांसाठी काहीतरी करून दाखविण्याची इच्छाच मुंबईत राहणा-या प्रशांत इस्सर आणि अनुज गोयल यांना पुन्हा आपल्या देशात येण्यासाठी पुरेशी होती. दोघांनी वेगवगेळ्या वेळी इंग्लंडच्या हेन्री शाळेतून एमबीए केले होते. अनुज यांनी व्यवसाय आणि व्यवस्थापन या विषयांमध्ये एमबीएचे शिक्षण घेतले होते. तर प्रशांत यांनी २००८मध्ये उपहारगृहाशी संबंधित एमबीएचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. एमबीए नंतर अनुज आफ्रिकेला गेले, तर प्रशांत लंडन मध्येच रहात होते. एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशांत यांनी आपला व्यवसाय सुरु करण्याबाबत विचार केला आणि वर्ष २०११ मध्ये ते पार्क ग्रुप ऑफ हॉटेलच्या एमडी सोबत भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी अनेक हॉटेलसाठी काम केले, मात्र थोड्या कालावधीनंतर त्यांना वाटायला लागले की, ते त्यांच्या लक्ष्यापासून भटकत आहेत. प्रशांत यांनी ‘युवर स्टोरी’ला सांगितले की, “त्यावेळी मी विचार केला की, मी हे काय करत आहे. कारण माझे लक्ष्य आपला व्यवसाय सुरु करण्याचे होते आणि मी दुस-यांसाठी काम करत आहे. ज्यानंतर मी कंसलटेंसी आणि हॉटेलची योजना बनविणे सुरु केले.”

प्रशांत यांचे म्हणणे आहे की, त्या दरम्यान लिंक्ड इन मार्फत त्यांची भेट अनुज यांच्याशी झाली, त्यांना देखील आपला व्यवसाय उघडायचा होता. भेटल्यानंतर बातचीत दरम्यान वाटले की, एमबीएचे शिक्षण करत असतानाच नैतिकतेचे धडे देखील गिरविले होते. ज्यात त्यांना सांगितले गेले होते की, कुठल्याही व्यवसायाला केल्याने केवळ आपलेच नाही तर, समाजाचे देखील भले झाले पाहिजे आणि दुसरी बाब जी या लोकांना आवडली होती, ती ही की क्षमता आणि कौशल्यापेक्षा अधिक आपल्या कामासाठी प्रतिबद्धता आणि प्रामाणिकपणा असला पाहिजे. 

image


त्याच दरम्यान प्रशांत आणि अनुज यांची भेट शिशिर गोरले आणि राजेश्वर रेड्डी यांच्याशी झाली. हे दोघे पूर्वीपासूनच मुंबईत ‘इंडिया बाईट’ नावाची एक यशस्वी कंपनी चालवत होते. त्यांनी फेसबुकवर टोरांटोमध्ये एक साइन उपहारगृह पाहिले होते. असेच उपहारगृह मुंबईत उघडण्याची इच्छा शिशिर आणि रेड्डी यांनी त्यांच्यासमोर ठेवली. प्रशांत आणि अनुज यांचे म्हणणे आहे की, त्यांना या कल्पना आवडल्या, कारण प्रशांत यांनी आपल्या २१वर्षाच्या कारकिर्दीत भारत आणि ब्रिटन दोन्ही ठिकाणावर जवळपास १७ते १८ उपहारगृह उघडले होते, जे खूप यशस्वी होते. मात्र मूक बधीरांसोबत काम करण्याचा त्यांना कुठलाही अनुभव नव्हता.

प्रशांत आणि अनुज यांनी या कामाला सुरु करण्यापूर्वी मूक बधिर लोकांच्या आई- वडिलांची भेट घेतली आणि त्यांना समजाविले की, त्यांची मुले देखील चांगले काम करू शकतात. 

image


प्रशांत यांचे म्हणणे आहे की,“मला आणि अनुज दोघांना हेच वाटले की, जर आम्हाला व्यवसायात अशा लोकांना सामील करायचे आहे, तर सर्वात पहिले आम्हाला देखील सांकेतिक भाषा शिकावी लागेल. ज्यानंतर आम्ही दोघांनी सांकेतिक भाषा शिकली आणि त्यानंतर मुक बधीर मुलांशी संवाद साधला, तेव्हा आम्हाला माहित पडले की, हे लोक देखील काम करू इच्छितात. इतकेच नव्हे संवाद साधताना आम्हाला हे देखील माहित पडले की, अशी मूक- बधीर मुले सामान्य मुलांच्या तुलनेत बुद्धीने जास्त गतिशील आणि मेहनती असतात.”

प्रशांत आणि अनुज यांनी त्यानंतर आपल्या उपहारगृहाबाबत विचार केला आणि या मुकबधीर लोकांना प्रशिक्षण दिले. त्यांच्यासाठी आठ आठवड्यांचा एक विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला. ज्याला चार भागात वाटण्यात आले. पहिल्या भागात या लोकांना सांगण्यात आले की, आयुष्य कसे चालते आणि कसे काम करतो. कारण यापैकी अनेकांनी कधी कामच केले नव्हते. दुस-या भागात या लोकांच्या नोकरीच्या गरजेबाबत समजाविण्यात आले आणि तिसऱ्या भागात या लोकांना ‘मोड्यूल्स’मध्ये आदरातिथ्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ज्यानंतर मूकबधीर महिला आणि पुरुष वाढपी यांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘मिर्च एंड माइप’ला प्रशांत आणि अनुज यांनी केवळ आपल्या नातेवाईकांसाठी उघडले. जे येथे येऊन मोफतमध्ये जेवणाचा आस्वाद घेऊ शकतील. यादरम्यान सर्विसचे सर्व काम वाढपीच पहायचे. नातेवाईकांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिक्रियेनंतर २०१५मध्ये त्यांनी आपले उपहारगृह ‘मिर्ची एंड माइम’ सुरु केले. 

image


प्रशांत सांगतात की, “त्यांनी सामान्य वाढप्यांच्या तुलनेत इतके चांगले काम केले की, त्यांच्या उपहारगृहाच्या सुरुवातीच्या सहा महिन्याच्या आतच जोमॅटोचा ‘‘हाइयेस्ट रेटेड रेस्तरां इन मुंबई’चा खिताब मिळाला. ज्यात ८००रिव्यू सोबत आम्हाला ४.९ अशी श्रेणी मिळाली.”

त्यांच्याकडे काम करणा-या मूक बधिर वाढीप्यांची प्रशंसा करताना प्रशांत सांगतात की, हे लोक आपल्या कामाच्या बाबतीत खूप काळजी घेतात आणि आदरआतिथ्याचे तिन्ही गुण त्यांच्यात असतात. जसे की, हे नेहमी हसतात, आपल्या कामाबाबत निष्काळजीपणा करत नाहीत, कारण हे ऐकू शकत नाहीत. आणि तिसरे हे की, हे दुस-यांच्या भावनांना जाणतात. असे असेल तर एखाद्या ग्राहकाला याहून अधिक चांगली सर्विस अजून कुठे मिळू शकते की, वाढपी हसत त्यांच्या ‘मूड’ला ओळखून लक्षपूर्वक त्यांना सर्विस देतील. त्यांच्याकडे एकूण २४महिला आणि पुरुष वाढपी काम करतात आणि त्यांचे वयमान सरासरी २२ ते ३५वर्षापर्यंतच्या मधील आहे. या उपहारगृहात एकत्र ९० लोकांच्या बसण्याची जागा आहे. 

image


प्रशांत यांचे म्हणणे आहे की, उपहारगृहाच्या व्यवसायात जेथे जवळपास ६०टक्के लोक काम सोडून जातात, तेथे त्यांची संख्या २ते ३टक्के आहे, कारण हे लोक लवकर कुणावर विश्वास करत नाहीत आणि त्यांचा विश्वास जिंकल्यावर हे, तुमची साथ कधीच सोडत नाहीत यामुळेच हे लोक त्यांना ३५टक्के जास्त वेतन देतात. त्यांनी आपल्या कर्मचा-यांच्या टी शर्टच्या मागे एक स्लोगन लिहिले आहे – “आय नो साइन लँग्वेज, व्हॉट इज युवर सुपरपॉवर”. त्याचा उद्देश हा आहे की, कुठलाही व्यक्ती त्यांना दयेच्या भावनेने बघू नये, हे देखील सामान्य लोकांप्रमाणे आहेत. प्रशांत यांचे म्हणणे आहे की, “प्रत्यक्षात अपंग तर आम्ही आहोत, जे ऐकू बोलू शकतात, जर यांना वाटले तर हे लोक एका क्षणात आमची मस्करी बनवू शकतात आणि आम्हाला माहित देखील पडणार नाही.” रात्री १०वाजेपर्यंत काम करणा-या महिला वाढपी यांना या लोकांनी यांना घरापर्यंत सुरक्षित सोडण्याची व्यवस्था केली आहे, तर पुरुष वाढपी यांना जवळच्या बस किंवा रेल्वे स्टेशनवर सोडतात.

त्याव्यतिरिक्त त्यांचे म्हणणे आहे की, एप्रिलमध्ये त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी जे आपले एक वर्ष पूर्ण करतील, त्यांना आपल्या कंपनीचे समभागदेखील देतील. कंपनीत एकूण ९०टक्के गुंतवणूक प्रशांत, शिशिर आणि रेड्डी यांनी केली आहे आणि १० टक्के त्यांनी मित्रांकडून घेतले आहेत. प्रशांत आणि अनुज हे सह-संस्थापक आणि शिशिर व रेड्डी याचे गुंतवणूकदार आहेत. भविष्याच्या योजनेबाबत प्रशांत यांचे म्हणणे आहे की, ते पुढील ३ ते ५ वर्षाच्या आत देशात १८आणि दुबई, सिंगापूर आणि लंडन मध्ये एक एक उपहारगृह उघडतील. जेथे त्यांचा कर्मचारी वर्ग मूक बधिरच असेल. अशा प्रकारच्या जवळपास ६००मूक बधिर लोकांना रोजगार उपलब्ध करून देतील. आपल्या योजनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिक गुंतवणूक करावी लागेल, ज्यासाठी त्यांची चर्चा अनेक कंपन्यांशी होत आहे.

वेबसाईट : www.mirchiandmime.com

'द व्हिक्टोरीया मेमोरीयल स्कूल फॉर द ब्लाईंड'च्या विद्यार्थ्यांची थक्क करणारी मसाज कला !

‘मतिमंद’ मुलांचे स्थान उंचाविणारे ‘आधार’

अंध कार्तिकची किर्ती, दृष्टीला ओलांडून जणू दृष्टिकोन दिगंतराला…

लेखक: हरिश

अनुवाद : किशोर आपटे

Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags