संपादने
Marathi

सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून मनामनांना जोडण्याचे ‘ब्रिग्ग’ चे लक्ष्य

Team YS Marathi
22nd Nov 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

सोशल मिडिया नेटवर्कने अर्थात सामाजिक माध्यमांनी सुरुवातीच्या काळात जुन्या शालेय मित्रांशी किंवा कालौघात संपर्काबाहेर गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांशी नव्याने संपर्क प्रस्थापित करण्यात निश्चितच मदत केली. काही काळानंतर मात्र या माध्यमांमुळे रोजच्या जीवनातील संवादच हरविल्याचे अनेकांना वाटू लागेल. वास्तव जगातील हा हरविलेला संवाद पुन्हा सुरु करण्याचे लक्ष्य समोर ठेवत, तीन मित्रांनी सुरुवात केलेला एक आगळावेगळा उपक्रम म्हणजेच ब्रिग्ग (Brigge)... विशेष म्हणजे हेदेखील एक ऍपच असले, तरी विविध उपक्रमांसाठी एक सोशल नेटवर्क अर्थात सामाजिक जाळे म्हणून हे ऍप काम करते...

समविचारी लोकांना त्यांच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी एकत्र आणणे हे ब्रिग्गचे प्रमुख उद्दीष्ट आहे. ब्रिग्ग हे एक खुले व्यासपीठ असून, कोणीही यामाध्यमातून काही कार्ये किंवा उपक्रम सुरु करु शकते आणि इतरांना यामाध्यमातून त्यासंबंधीची माहिती मिळू शकते आणि तेदेखील त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. मुख्य म्हणजे लोक यामाध्यमातून एकत्र येऊन एकमेकांच्या आवडीनिवडी, त्यांना अवगत असलेले माहिती वा ज्ञान, फोटोग्राफी एकमेकांमध्ये शेअर करतात. सेंद्रीय शेतीसारख्या विषयांसह इतर कितीतरी विषयांवर चर्चा करतात, समाजसेवेचे उपक्रम राबवतात, स्पाईकबॉल खेळतात, एकत्र जमून फुटबॉलचे सामने पाहतात आणि इतर अनेक गोष्टी करु शकतात... थोडक्यात काय तर समविचारी लोकांना एकत्र आणण्याचे हे काम ब्रिग्ग सहज शक्य करते...

प्रारंभ आणि कल्पनाशक्ती

ब्रिग्गच्या कल्पनेचे जनकत्व जाते ते संपत, प्रसन्ना आणि मुरली या तीन मित्रांकडे... हे तिघेही खूपच उत्साही आणि सक्रीय होते, मात्र योग्य वेळी योग्य संगत मिळत नसल्याची जाणीव त्यांना प्रकर्षाने होऊ लागली होती. खास करुन त्यांच्या आवडीची कामे करण्यासाठी त्यांना बऱ्याचदा सारख्या विचारांच्या लोकांची संगत मिळू शकत नव्हती. “ जर आमची मित्रमंडळी व्यस्त असतील, तर आमच्या आवडीच्या उपक्रमात भाग घेण्यासाठी समविचारी लोक मिळण्याचा दुसरा काही मार्गच नसे. ही अडचण आम्हाला आमच्यासाठी तर दूर करायची होतीच पण त्याचबरोबरच आमच्या आसपासच्या लोकांसाठीही यावर उपाय शोधण्याची आमची इच्छा होती,” ब्रिग्गचे सहसंस्थापक संपत सांगतात. त्यातूनच या तिघांनी एकत्र येत ब्रिग्गची स्थापना केली.

image


संपत यांच्या मते कंपनी उभारताना सुरुवातीच्या काळात दोन प्रमुख आव्हानांचा सामना करावा लागला, एक म्हणजे निधीची कमतरता आणि दुसरे म्हणजे चांगली अभियांत्रिकी प्रतिभा..... “ आज असलेली आमची ही विलक्षण टीम उभारण्यासाठी आम्हाला खूप कष्ट तर घ्यावे लागेलच, पण त्याचबरोबर चिकाटीही दाखवावी लागली,” संपत सांगतात..

या तीन मित्रांपैकी प्रसन्न यांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ काम केले असून, टीमचे नेतृत्व करण्याचा, संस्था विलिनीकरणाचा आणि प्रक्रीया आणि प्रणाली सुधारण्याचा त्यांना गाढा अनुभव आहे. तर संपत हे उत्पादन व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असून, भारतात परतण्यापूर्वी तीन वर्षे त्यांनी अमेरिकेतील वॉलमार्टमध्ये काम केले आहे. त्यानंतर त्यांनी चैनईमधील इन्डीक्स (Indix) या तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपसाठी काही उत्पादनांचे व्यवस्थापन केले आहे. कंपनीचे तिसरे सहसंस्थापक मुरली हे एक रंगमंच कलाकार आणि विनोदवीर असून एक उत्तम कथाकारही आहेत.

टीम बांधणीचा विचार करताना, त्यांनी एक निर्णय विचारपूर्वक घेतला होता, तो म्हणजे आपल्या मित्रमंडळींच्या गटातूनच किंवा मित्रांच्या मित्रांमधूनच कंपनीसाठी लोकांची निवड करणे. तसेच त्यांच्या दृष्टीने त्यांच्या टीमसाठी कौशल्यांइतकेच या संस्कृतीत चपखलपणे बसणे आणि वृत्ती या दोन गोष्टीही अतिशय महत्वाच्या होत्या. “ बांधिलकी ही आतूनच येते, या गोष्टीवर आमचा ठाम विश्वास आहे. आम्ही आमची दिशा आणि प्राधान्य आमच्या कर्मचाऱ्यांसमोर स्पष्ट करतो आणि त्यानंतर हे काम किती मुदतीत पुर्ण करायचे, याचा निर्णय आम्ही कर्मचाऱ्यांवरच सोडतो,” संपत सांगतात.

ऍपचे कार्य

चार आठवड्यांपासून कंपनीने हे ऍन्ड्रोईड ऍप प्लेस्टोअरच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले असून आतापर्यंत सुमारे दोन हजार लोकांनी यामध्ये साईन अप केल्याचे आणि विविध उपक्रम तयार करुन अनेक रंजक गोष्टी एकत्र येऊन करत असल्याचे दिसत आहेत. “ लोक यासाठी खूप उत्साही दिसत असून या संकल्पनेसाठी आणि ऍपसाठी त्यांच्याकडून आम्हाला खूपच सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ब्रिग्ग वेगाने वाढत आहे आणि लोकांचा आपल्या मोकळ्या वेळेकडे किंवा फुरसितीच्या क्षणांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यास यातून नक्कीच मदत मिळू शकेल, असा आम्हाला विश्वास आहे,” संपत सांगतात.

त्यांच्या मते जरी यासारखी इतर ऍप्स बाजारात असली तरी ही संकल्पना खऱ्या अर्थाने नवीन आहे, कारण इतर सोशल नेटवर्कींग पोर्टल्सप्रमाणे वापरकर्त्यांना हे केवळ ऍपमध्येच गुंतवून किंवा अडकवून ठेवत नाही, तर लोकांना बाहेर आणून वास्तव जगातील संवाद परत आणण्याची ब्रिग्गची इच्छा आहे. “ चैनईमध्ये लोकांनी खूपच चांगल्या प्रकारे ब्रिग्गचा अंगीकार करण्यास सुरुवात केली आहे आणि हळूहळू बंगळुरू आणि इतर शहरांमध्येही हे होताना आम्हाला दिसत आहे,” संपत सांगतात.

“ एडब्ल्युएस क्लाऊडमध्ये आमची प्रणाली आहे. जॅंगो (Django) रचनेमध्ये पोस्टग्रेएसक्युएल (PostgreSQL) या डेटाबेससह बॅकएन्ड बांधलेले आहे. ट्रॅफिकमध्ये अचानक वाढ झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी उच्च उपलब्धतेच्या दृष्टीने प्रणालीची बांधणी केली असून, ती ऑटो-स्केलिंग करण्यास सक्षम आहे. निरोगी प्रणालीसाठी क्रॅशलिटीक्स (Crashlytics) आणि न्यू रेलिक (New Relic), इनस्पिंग (Insping) यासारखी विविध साधने तर नियोजन आणि संपर्कासाठी जेआयआरए (JIRA) आणि (Slack) यासारखी साधने आम्ही वापरतो,” संपत सांगतात.

निधी उभारणी

कंपनीला नुकताच चैनई एन्जल्सकडून निधी मिळालेला आहे. कल्पनेच्या टप्प्यावर असतानाच चैनई एन्जल्सने निधी दिलेली ही पहिलीच कंपनी असल्याचा त्यांचा दावा आहे. प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या ऍन्ड्रोईड ऍपच्या माध्यमातून पहिल्यांदा मोबाईलच्या व्यासपीठावरुन हे सुरु करण्याचा निर्णय ब्रिग्गने घेतला असून आयओएस (iOS) आणि वेब वर्जनवर काम सुरु आहे.

सवडीच्या वेळाचा सदुपयोग करणारे अनेक कार्यक्रम देणारे वन स्टॉप शॉप अर्थात एक परिपूर्ण व्यासपीठ बनण्याचे ब्रिग्गचे लक्ष्य आहे. संपत सांगतात की, भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याचे आवडीचे काम करण्यासाठी ब्रिग्गच्या माध्यमातून संगत उपलब्ध करुन देण्याची त्यांची इच्छा आहे. “ इतर देशांमध्येही विस्तार करण्याची आमची योजना आहे आणि त्यांच्यासाठी नवनवीन गोष्टी सुरु करण्याची आणि त्यांचे आयुष्य अधिक परिपूर्ण करण्याची आमची इच्छा आहे,” संपत सांगतात..

http://www.brigge.com


लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags