संपादने
Marathi

रणजित सावरकर यांच्या पुढाकाराने धसई होणार नोटबंदी नंतरचे भारतातील पहिले रोखमुक्त गाव!

Team YS Marathi
28th Nov 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

८ नोव्हे. २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाच्या धोरणातील सर्वात कठोर निर्णयाची घोषणा केली, त्याचा मितितार्थ कँशलेस इंडिया इतकाच होता. त्या दिशेने जाताना आता अनेकांनी प्लास्टिकमनी स्विकारण्यास किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे जाण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. रोखमुक्त व्यवहाराच्या दिशेने केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी नोटाबंदीनंतर निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती दूर करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या आदिवासी विभागातील धसई गावातील व्यवहार रोखमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. अशाप्रकारे नोटबंदी नंतर रोखमुक्त होणारे धसई हे भारतातील पहिलेच गाव ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आभिमान वाटेल अशा प्रकारे पंतप्रधानांच्या निर्णयाला कृतीने समर्थन मिळणार आहे.

image


हे गाव १ डिसेंबर २०१६ पासून संपूर्णतः रोख मुक्त होत आहे. गावाची लोकसंख्या १०००० असून इथे जवळ पास १०० व्यावसायिक आहेत. आसपासची साधारण २५ खेडी व्यवहारांसाठी धसई वर अवलंबून आहेत. रोख मुक्तीचा लाभ धसई आणि आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पन्नास हजार लोकांना होणार असून, बँकेतून रोकड काढण्याच्या त्रासातून मुक्तता होईल. 

१०० पैकी सुमारे ३४ व्यापाऱ्यांचे कार्ड स्वाईप मशीन ३० नोव्हेंबर पर्यंत कार्यान्वित होत आहेत. अन्य व्यापारी ह्या मशीन्स घेण्याकरिता आवश्यक ती कारवाई पूर्ण करीत आहेत. येथील प्रत्येक कुटुंबाकडे जन-धन खाते असून डेबिट कार्डही आहे. त्यामुळे १ डिसेंबर पासून ह्या भागातील लोक आपल्या सर्व गरजांकरिता हे कार्ड वापरू शकतील अगदी वडापाव पाव पासून भाजी पाला , धान्य, औषधे, खते आणि इतर सर्व गरजांसाठी डेबिटकार्ड वापरता येईल. हे कार्ड केशकर्तनालये, दवाखाने, मोटार गॅरेजेस पासून अगदी शेती कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने घेण्यासाठी डेबिट कार्ड वापरता येईल. थोडक्यात, सांगायचे तर डेबिट कार्ड असलेल्या कोणालाही धसई गावात रोख रक्कम वापरण्याची गरज नाही. रणजित सावरकर यांना या कामात धसई गावातल्या गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक नवतेज सिंग यांनी तातडीने व्यापाऱ्यांची खाती उघडून त्यांना कार्ड स्वाईप मशीन देण्यासाठी सर्व सहकार्य केले.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags