संपादने
Marathi

महाराष्ट्रातील २५ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

Team YS Marathi
6th Sep 2017
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

महाराष्ट्रातील २५ शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले . दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्यावतीने ‘शिक्षक दिना’ निमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह आणि डॉ. सत्यपाल सिंह, सचिव अनिल स्वरूप यावेळी उपस्थित होते.


image


उल्लेखनीय योगदानासाठी यावर्षी देशभरातील एकूण 319 शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2016-17’ प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील एकूण 25 शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले. यात 17 प्राथमिक शिक्षकांपैकी 2 शिक्षकांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. 8 माध्यमिक शिक्षकांपैकी एका शिक्षकास विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. पदक, प्रमाणपत्र आणि 50 हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


image


17 प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नागोराव तायडे, महानगर पालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र.2, घाटकोपर(प.) (मुंबई), उज्ज्वला नांदखिले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साडेसतरा नळी, ता.हवेली (पुणे), शोभा माने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचणी, ता. तासगांव(सांगली), तृप्ती हतिसकर, महानगर पालिका प्राथमिक शाळा, प्रभादेवी (मुंबई), सुरेश शिंगणे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पिंपळगांव चिलमखा, पो. उंबरखेड, ता. देऊळगांव राजा(बुलडाणा), संजिव बागुल,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सांभवे, पो. माळे ता.मुळशी (पुणे), राजेशकुमार फाटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोंगरगांव, पंचायत समिती लाखनी (भंडारा), ज्योती बेलावळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केवनीदिवे, पो. काल्हेर, ता. भिवंडी (ठाणे), अर्जुन ताकटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अहेरगांव, ता. निफाड(नाशिक), रुख्मिणी कोळेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वांगी-2, ता. करमाळा (सोलापूर), रामकिशन सुरवसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागोबावाडी, ता.औसा (लातूर), प्रदीप शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिलापूर, ता.जि.(नाशिक),अमीन चव्हाण, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, निंभा, पो. देऊरवाडा, ता. दिग्रस (यवतमाळ), उर्मिला भोसले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महालदारपुरी, ता.वाशी (उस्मानाबाद), गोपाल सुर्यवंशी ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गंजुरवाडी, ता.जि.(लातूर) या शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


image


प्राथमिक शिक्षकांच्या विशेष श्रेणी अंतर्गत अर्चना दळवी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाहुली, ता.हवेली (पुणे), सुरेश धारव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निफाड क्र.2 ता. निफाड (नाशिक) यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. उपरोक्त पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक हे सहायक शिक्षक आहेत.


image


8 माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

माध्यमिक शाळांच्या शिक्षकांमध्ये तीन मुख्याध्यापक व पाच सहायक शिक्षकांना सन्मानीत करण्यात आले. या शिक्षकांमध्ये नंदा राऊत, मोतीलाल कोठारी विद्यालय, कडा, ता.आष्टी (बीड), स्मिता करंदीकर, अहिल्यादेवी मुलींची उच्च माध्यमिक शाळा, होळकरवाडा, शनिवार पेठ, पुणे (पुणे), नंदकुमार सागर (मुख्याध्यापक), जिजामाता उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय,जेजुरी, ता. पुरंदर (पुणे), शर्मिला पाटील, अं‍बिका विद्यालय, केडगांव, ता.जि.(अहमदनगर), सुनील पंडीत (मुख्याध्यापक), प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नवीपेठ ,अहमदनगर (अहमदनगर), कमलाकर राऊत, योगेश्वरी नुतन विद्यालय, परळी रोड, अंबाजोगाई (बीड), संजय नारलवार (मुख्याध्यापक), प्रियंका उच्च माध्यमिक शाळा, कानेरी, ता. जि. (गडचिरोली) यांचा समावेश आहे.

माध्यमिक शिक्षकांच्या विशेष श्रेणी अंतर्गत डॉ. मिनल सांगोळे, मुक-बधिर शाळा, उत्तर अंबाझरी रोड, शंकरनगर नागपूर, (नागपूर) यांना यावेळी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags