परदेशात शिक्षणासाठी अवघ्या जगाची एक खिडकी!

परदेशात शिक्षणासाठी अवघ्या जगाची एक खिडकी!

Sunday November 29, 2015,

4 min Read

हा लेख म्हणजे सिटीस्पार्क मालिकेतील एक भाग आहे. या लेखाचे प्रायोजक आहे… Verisign

दामिनी महाजन आणि अर्जुन कृष्णा यांना शिकायला म्हणून परदेशात जायचे होते, पण कुठल्याही प्रकारची मदत वा मार्गदर्शन त्यांना मिळाले नाही. शिष्यवृत्तीच्या नेमक्या काय काय संधी आहेत. जगभरात कुठल्या कुठल्या देशांत अशा कुठल्या कुठल्या शैक्षणिक संस्था आहेत, ज्या या दोघांना अपेक्षित असलेले ज्ञान संपादन करण्यासाठी चपखल आहेत, अशी काही म्हणून माहिती नेमकेपणाने उपलब्ध करून घेता आली नाही. तेव्हाच मनात आले होते, अशी माहिती उपलब्ध करून देणारा एकच एक स्त्रोत असता तर कित्ती म्हणून छान झाले असते. उच्च शिक्षणासाठी जावू इच्छिणारी मुले मग काय करत असतील, कुठून माहिती मिळवत असतील, असे नाना प्रश्न त्यांच्या मनात आले.

image


अपेक्षित अभ्यासक्रमासाठी, पदवीसाठी नेमके कॉलेज अन् नेमके विद्यापीठ शोधणे, शुल्क किती, निवासाचा खर्च किती, ही सगळी माहिती मिळवणे किती अवघड आहे, हे लक्षात आले. या सगळ्या प्रक्रियेत दामिनी आणि अर्जुन यांना आपले समदु:खी उदंड असल्याचेही ओघानेच कळले. या अवघड आणि वेदनादायी अनुभवातून जाणारे काही आपण एकटेच नाही. ज्याला उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे आहे असा भारतातला प्रत्येक विद्यार्थी याच समस्यांचा आणि विवंचनांचा सामना करतोय. ज्याचा अनुभव याबाबतीत अल्हाददायक आहे असा एकही असा विद्यार्थी त्यांना भेटला नाही. जो भेटला तो याबाबतीतले रडगाणेच गात होता.

खुप शोधाशोध केल्यानंतर दामिनी आणि अर्जुन यांना अखेर शेफिल्ड युनिव्हर्सिटीत अपेक्षित जैव प्रक्रिया अभियांत्रिकीत पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवता आला. ब्रिटन सरकारकडून संपूर्णपणे अनुदानित शिष्यवृत्तीचा लाभही घेता आला. २०१२ ची ही घटना. विमानप्रवासाचे भाडे, शिक्षण शुल्क आणि राहण्या-खाण्याचा खर्चही ब्रिटन सरकारच्या या शिष्यवृत्तीतूनच भागला. दामिनी आणि अर्जुन आजही त्याबद्दल आवर्जून कृतज्ञता व्यक्त करतात.

२०१३ मध्ये दामिनी आणि अर्जुन यांनी याबाबतीतील आपापल्या ज्ञानाचा एकत्रित वापर करण्याचे ठरवले. मित्र आणि सहकारी विद्यार्थ्यांकडून जे काही शिकायला मिळाले, त्याचाही वापर करत इतरांना मदत द्यायचे ठरवले. उच्च शिक्षण परदेशात घ्यायचेय, कुठे प्रवेश घ्यावा, कुठे-कुठली शिष्यवृत्ती मिळते, अशी सगळी-सगळी माहिती गरजू विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायचे, असे ठरविले. मग या सगळ्यांनी ‘फेसबुक’वर ‘सोशल मिडिया ग्रुप’ स्थापन केला आणि या माध्यमातून परदेशातील शिक्षणाच्या संधींबाबत माहितीचे आदानप्रदान सुरू झाले. पुढे दोघांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दोघांनी स्थापन केलेला ग्रुप आताशा चांगलाच लोकप्रिय झालेला होता. तब्बल दीड लाख युजर्स त्याला प्राप्त झालेले होते.

image


‘स्टार्टअप’मध्ये रूपांतर

फेसबुकवर उदंड फॉलोअर मिळाल्याने पदव्युत्तर पदवीनंतर दामिनी आणि अर्जुन यांचा आत्मविश्वास दुणावलेला होताच. फेसबुकवरील फॉलोअर्सची सगळी ऑनलाइन जमात हेच आपले स्थिर भांडवल आहे, हेही त्यांच्या लक्षात आलेले होते. शिक्षणपूरक उद्योगात पडण्याचे मग त्यांनी ठरवून टाकले. जगभरातल्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकेल, अशी कंपनी सुरू करण्याचा निर्णय झाला.

दामिनी सांगतात, ‘‘जगभरातील विद्यार्थ्यांवर आमचा फोकस असल्यामुळे आमचे स्वाभाविकपणे एक डॉट कॉम डोमेन नाव कंपनीसाठी ठरवून झाले होते.’’ ‘वुई मेक स्कॉलर्स डॉट कॉम’ (WeMakeScholars.com) हे नाव कंपनीसाठी फायनल झाले. WeMakeScholars.com (WMS) आज जगभर नावाजलेले, नाणावलेले नाव आहे. कुठे कुठली शिष्यवृत्ती उपलब्ध आहे, कुठे कुठली ‘इंटर्नशिप’ची संधी उपलब्ध आहे, यासंदर्भात माहिती हवी असल्यास WeMakeScholars.com हे जागतिक पातळीवरील व्यासपीठ म्हणून आता मान्यता पावलेले आहे. अर्थात अजूनही कंपनीचे ‘रिव्हेन्यू मॉडेल’ नेमकेपणाने ठरलेले नाही. मुळात केवळ नफा कमवणे हा या डिजिटल पोर्टलचा उद्देश नाहीच. उच्च शिक्षणासंदर्भातली भरवशाची आणि पारदर्शक माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी, जेणेकरून त्यांची ससेहोलपट होऊ नये, हाच मुख्य उद्देश आहे.

अर्जुन सांगतात, की ‘‘योग्य लोक आणि योग्य संधींशी संलग्न व्हा’’ हेच त्यांच्या या उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. या एका वाक्यात त्यांच्या उद्दिष्टाचे मर्म सामावलेले आहे. उदयोन्मुख विद्वत्जनांसाठी अवघ्या जगाची कवाडे खुली करणारे WeMakeScholars.com हे एक दालन आहे.

दामिनी म्हणतात, ‘‘केवळ सोशल मिडिया कम्युनिटी चालवणे हे आमच्यासाठी खरंच अवघड होऊन बसलेले होते. डाटा युझर-फ्रेंडली नव्हता. संबंधित शिष्यवृत्तीचा वेध घेण्यात त्यामुळे युजरला अडचणीचे ठरत असे. म्हणून मला वाटते, की WeMakeScholars.com या नव्या माध्यमात आमच्या उपक्रमाचे रूपांतर करणे हा आमचा अत्यंत रास्त असा निर्णय होता. आमच्या फेसबुक युजर्सचा तयार आधार तर या नव्या उपक्रमाला मिळालाच, शिवाय चांगल्या परिणामांमुळे युजर्सची संख्या आणखी वाढत गेली आणि जागतिक विद्यार्थी समुदायाला आम्ही वेगळे काही देऊ शकलो.’’

image


फर्क देख लो!

जवळपास २०० देशांतील विद्यार्थी WeMakeScholars.com चा वापर करत आहेत. WeMakeScholars.com ला गेल्या ५ महिन्यांत २ दशलक्ष पेज व्ह्यू मिळालेले आहेत. पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून आठ जणांचा चमू आहे. देशोदेशीच्या हौशी ब्लॉगर्सकडून ब्लॉगलेखनाच्या माध्यमातून या उपक्रमाला पाठबळ मिळते आहे. WeMakeScholars.com blog कमालीचा लोकप्रिय ठरतोय. विद्यार्थ्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण माहितीचा इथे खजिनाच आहे. विशिष्ट अभ्यासक्रमासंबंधीचे, विद्यापीठांसंदर्भातले आणि देशांबाबतचे अनुभव संबंधित विद्यार्थ्यांनी या ब्लॉगच्या माध्यमातून मोकळेपणाने मांडलेले असतात. ते साहजिकच इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरतात.

‘‘जग बदलायचे असेल तर शिक्षण हे त्यासाठी प्रचंड शक्तीचे आयुध आहे’’, हे नेल्सन मंडेलांचे वाक्य आहे. मंडेलांचा हा विचार म्हणजे ‘वुईमेकस्कॉलर्स’साठी मार्गदर्शक तत्व आहे. ‘वुईमेकस्कॉलर्स’चा युवा चमू नवी कौशल्ये आत्मसात करतो आहे. वेबसाइटचा फॉर्मेट अधिकाधिक युजर फ्रेंडली करण्यासाठी त्यांची सतत धडपड असते. स्वत:चे बिझनेस मॉडेल तयार करण्याला या टीमचे प्राधान्य आहे. विविध विद्यापीठांशी तसेच महाविद्यालयांशी टाय-अप करणेही त्यात आलेच.

‘डॉट कॉम’कडे वळणे ही गोष्ट ‘वुईमेकस्कॉलर्स’ला जागतिक विद्यार्थी समुदायासाठी वेगळे काही करून दाखवण्यास पूरक ठरली. तुमच्याकडेही एखादी अशीच वेगळी आणि मोठी कल्पना असेल तर तिला कृतीची जोड द्या… आणि वळा ‘डॉट कॉम’कडे!


लेखक : सारिका नायर

अनुवाद : चंद्रकांत यादव