संपादने
Marathi

अनेक भाषा-कलांची स्वामिनी : रेवती आवसरला

26th Oct 2015
Add to
Shares
11
Comments
Share This
Add to
Shares
11
Comments
Share

ही यशोगाथा तनिष्क प्रायोजित मिया वुमेन सिरिजचा एक भाग आहे, कर्तृत्ववान स्त्रियांच्या प्रेरणादायी कहाण्या लोकांसमोर आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे.' ती' च्या कथेचे पूर्ण संपादकीय नियंत्रण (एडीटोरीयल कंट्रोल) या सगळ्या पोस्टवर आहे.

रेवती आवसरला....दक्षिण भारतात जन्मलेली रेवती लहानाची मोठी झाली ती दक्षिण फ्लोरिडा आणि दक्षिण फ्रान्समध्ये... जगभरात भ्रमंती केलेल्या रेवतीची कहाणी खरे तर एखाद्या कांदबरीचीच आठवण करुन देते. प्रखर स्वावलंबी, कायम स्वतःच्या मनाचे ऐकणाऱ्या अशा एका खऱ्या अर्थाने आजच्या स्त्रीची ही कहाणी... जाणून घेऊ या...

रेवती आवसरला जन्माने भारतीय असली तरी ‘अवघे विश्वची माझे घरे’ हे ती खऱ्या अर्थाने जगते आहे. दक्षिण भारतात जन्मलेल्या रेवती यांचे शालेय शिक्षण झाले ते फ्लोरिडा आणि मोनॅकोमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण झाले व्हेरमॉंटमध्ये.... अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, फ्रेंच आणि मंडारीन हे महाविद्यालयात रेवतीच्या अभ्यासाचे विषय होते. कॉर्पोरेट लॉ हा काही आपल्या खऱ्याखुऱ्या आवडीचा विषय नाही, याची जाणीव रेवतीला झाली ती न्यूयॉर्कमधील क्रॅवेथ, (Swaine) स्वाईन ऐन्ड मुर एलएलपी मध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर.... त्यामुळेच कायद्याचे शिक्षण घेण्याचा आपला पहिला निर्णय बदलून रेवतीने परराष्ट्र सेवेचे शिक्षण घेण्याचे ठरविले आणि त्यानुसार जॉर्जटाऊन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फॉरेन सर्विस मधून २००९ मध्ये तिने मास्टर्स ऑफ सायन्स इन फॉरीन सर्विस ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

जॉर्जटाऊनला असताना जागतिक कॉर्पोरेट अर्थकारणवर रेवतीने आपले लक्ष केंद्रीत केले होते आणि त्यातही त्यांना खास रस होता तो उगवत्या बाजारपेठांमधील अर्थसहाय्य उपलब्धतता आणि लघु आणि मध्यम व्यवसायांच्या वृद्धीवर... अमेरीकेच्या माजी सेक्रेटरी ऑफ स्टेट मेंडलिन अलब्राईट यांच्या द अल्ब्राईट स्टोनब्रीज ग्रुप एलएलपी या सल्लागार कंपनीत तसेच अमेरिकेच्या डीपार्टमेंट ऑफ ट्रेजरी’ज इंटरनॅशनल अफेअर्स ग्रुपमध्येत्यांनी उमेदवारी (इंटर्नशीप) केली. या दिवसांमध्ये युरोपचे साकलिक अर्थशास्त्रीय धोरण अर्थात युरोपियन मॅक्रो इकॉनॉमिक्स पॉलिसी या विषयाकडे खास लक्ष दिले.

image


पदवीनंतर त्यांनी वॉशिंग्टनमधील डिलॉईट कन्सल्टींग’ज स्ट्रॅटेजी ऐन्ड ऑपरेशन्स ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. येथेच त्यांना उगवत्या बाजारपेठांमध्ये दाखल होता आले आणि आफ्रिका, दक्षिण आफ्रिका आणि आशियामधील सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन अर्थात पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट आणि फार्मास्युटीकल सप्लाय चेन वर काम करणे शक्य झाले...

२०१४ मध्ये रेवती यांना कामात काही बदल करण्याची, काही नविन करुन पहाण्याची आवश्यकता वाटू लागली. अर्थातच यामागे उदयन्मुख बाजारपेठांमधील अनुभव पडताळून पहाण्याचाही हेतू होताच. “ त्यामुळे मग मी रॉकेट इंटरनेट गॅम्बएचशी (Rocket Internet GmbH) जोडले गेले आणि झांबियामध्ये कायमू (Kaymu) हे इ-कॉमर्स संकेतस्थळ सुरु केले आणि आज मी येथे आहे,” रेवती सांगतात.

कुटुंबिय आणि मित्रमैत्रीणींमध्ये रेवती ओळखली जाते ती ‘रेव’ या टोपण नावाने... तर या रेवच्या मते, “वयाच्या पंचवीशीपासूनच मला वीस पेक्षा जास्त सदस्य असलेल्या टिम्स हाताळण्याची सवय आहे आणि अर्थातच ही संधी मला दिल्याबद्दल मी माझ्या वरीष्ठांची नेहमीच आभारी राहीन. आजपर्यंत विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली हे मला खूपच महत्वाचे वाटते. सार्वजनिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात काम करण्याबरोबरच स्टार्टअप क्षेत्रातही मी काम केले आणि कामातील हे वैविध्य मला मनापासून प्रिय आहे.”

रेवतीने आतापर्यंत सुमारे ७० देशांमध्ये प्रवास केला आहे तर गेल्या केवळ एकाच वर्षात तिला २२ देशांना भेट देण्याची संधी मिळाली. अर्थात या भ्रमंतीमागे कारणे मात्र वेगवेगळी होती – कधी कामानिमित्त, कधी संशोधनासाठी तर कधी केवळ मौजमजा करण्याच्या निमित्ताने रेवती जगभरत फिरत असते. तिने आजपर्यंत नेपाळ, फ्रान्स, स्पेन, युके, इटली, अमेरीका, झांबिया, बोट्स्वाना, दक्षिण आफ्रीका, झिब्बावे, मलावी, चीन आणि जपान इत्यादी अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे. तसेच मुळातच साहसी प्रवृत्ती असल्याने, जगावेगळ्या अनेक साहसी गोष्टीही केल्या आहेत. चीली अर्जेंटीनामधील पॅटॅगोनिया पर्वतावर केलेले गिर्यारोहण असो किंवा आपले काम पूर्ण करण्यासाठीच म्हणून लायबेरीया - आयवरी कोस्टच्या सीमाभागातील कुंटणखान्यात आणि निर्वासितांच्या छावण्यांमध्ये केलेला मुक्काम असो... यासारखी चित्रविचित्र साहसे करण्यात त्या माहीरच म्हणावी लागेल. “ माझे आयुष्य खरे तर खूपच ‘क्रेझी’ आहे आणि त्यापैकी सर्वात जास्त क्रेझी काही असेल तर ते म्हणजे, आपल्या आयुष्याचा उदद्देश्य काही तरी वेगळा आहे, हा माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकून चांगल्या पगाराची स्थिर नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरु करण्याचा... तेसुद्धा आफ्रिकेमध्ये... आणि त्यामागे ‘मला योग्य वाटले’ यापेक्षा कोणतेही दुसरे कारण नसताना...” रेवती सांगते.

रेवती यांनी अनेक संस्कृती जवळून पाहिल्या आहेत. मात्र रेवतीयांच्या मते जगाची लोकसंख्या कितीही वाढत असली तरी खरे म्हणजे जग हे एक लहानशी जागा आहे. “ लोक सगळीकडे सारखेच असतात, ते प्रेम करतात, खातातपितात, त्यांना मुले होतात आणि ते मुलांसाठी बचतही करतात. शेवटी आपण सगळी माणसेच आहोत ना! मी आजपर्यंत जिथेजिथे गेले आहे, तिथे तिथे मला हेच पहायला मिळाले आहे. मात्र आपल्या कुटुंबाचे, संस्कृतीचे आणि धर्माचे रक्षण करण्याच्याबाबत मात्र वैविध्य आढळून येते. मात्र त्याव्यतिरिक्त प्रदेश कोणताही असो, आपण सगळे सारखेच आहोत. माणसाचा जन्मच विचार करण्यासाठी, शिकण्यासाठी, संरक्षण आणि प्रेम करण्यासाठी झालेला आहे,” रेवती म्हणते. “ एका लहान पण एकमेकांशी घट्ट नाते आणि बांधिलकी असलेल्या समाजात मी लहानाची मोठी झाले. त्यामुळे माझ्यासाठी माझी टिम नेहमीच महत्त्वाची असते. लहानपणापासूनच मी लहान शहरांमध्ये राहिली आहे. तसेच माझ्या शाळेतील वर्गांमधील विद्यार्थीसंख्याही खूप कमीच असे, मात्र माझे वर्गमित्र

हे जगाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले असत. पण त्यामध्ये काही तरी असे होते, ज्यामुळे राष्ट्रीय, वांशिक किंवा धार्मिक बंधनांना झुगारुन आमच्यामध्ये एक वेगळीच एकीची भावना असे. जगात फारच थोड्या जागा अशा आहेत, जेथे नोर्वेजियन ग्रेड स्कूल विद्यार्थी डाळ रोटी खायला तुमच्या घरी येतो किंवा थंडीतील स्नॅक म्हणून तुम्ही रेनडीयर सुप पिता,” रेवती सांगतात.

image


“स्टार्टअप संस्थांमध्ये खरे तर पुरुषप्रधान संस्कृती नाही,” रेवती सांगतात. “माझ्या मते तर महिला या पुरुषांपेक्षा जास्त काळ स्टार्टअपमध्ये आहेत, खास करुन आफ्रिकेमध्ये जिथे बायका आपली स्वतःची संसाधने विकून आपल्या गरजा भागवत आल्या आहेत. विकसित देशांमध्ये मात्र स्टार्टअपचा गर्भितार्थच खूप वेगळा आहे, त्यामुळे असे म्हणता येईल की तेथे पुरुषप्रधान संस्कृती दिसते. यामागील मुख्य कारण म्हणजे ते भांडवल उभारणीबाबत खूपच चांगले असतात. पण हे जास्त काळ चालणार नाही,” रेवती आत्मविश्वासाने सांगते.

रेवती अतिशय स्वावलंबी आहे आणि ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते. तिचे कुटुंबच तिची सर्वात मोठी ताकद आहे. “ माझे आईवडील जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये राहीले असल्याने, असे म्हणता येईल की, आमचे संपूर्ण कुटुंबच प्रवाशांचे आहे. त्यामुळे जिथे माझे आईवडील आहेत तेच माझे घर असते. ते जगात कुठेही असले, तरी कायम माझ्या पाठीशी असतात. फोन, सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही सतत संपर्कात असतो आणि मला कोणत्याही प्रकारचा सल्ला लागला, तरी मी त्यांच्याकडेच जाते,” रेवती सांगते.

“ माझ्या मते तर स्त्री-पुरुष भेदभाव मुळीच महत्वाचा नाही. गोऱ्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या बाजारपेठांमध्येही मला कधीही भारतीय महिला असल्याचा कोणताच तोटा सहन करावा लागला नाही किंवा कशापासूनही वंचित असल्याचेही वाटले नाही. उलट मला वाटते सुरुवातीचे अडथळे पार केल्यानंतर महिलांसाठी परिस्थिती पुरुषांपेक्षा जास्त अनुकुल असते,” रेवती सांगतात.

त्यांच्या मते, “ आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लागणारी निष्ठा, निग्रह आणि कौशल्ये असल्यास, महिला सगळे काही मिळवू शकतात. हे सोपे नाही आणि सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती पहाता, खास करुन भारतीय महिलांसाठी तर निश्चितच सोपे नाही.” मात्र तरीही रेवती यांना विश्वास आहे की धोरणी असल्यास आणि मुख्य म्हणजे आपला उद्द्देश निश्चित असल्यास सगळ्यांना सगळे काही मिळू शकते.

कामाशिवाय रेवती यांना अनेक विषयात रस आहे. त्यांना ब्रिटीश विनोदपट, तद्दन व्यावसायिक नाटके आणि मर्डर मिस्टरी पहायला आवडतात. तसेच संगीत नाटकांची विशेष आवड नसली, तरीही नाटक मात्र आवडते. त्याचबरोबर त्या टेनिस खेळतात. तसेच हायकिंगही करतात. तर सकाळी पाच किलोमीटर रोज धावणे हा त्यांच्या जीवनाचाच एक भाग आहे.

त्याचबरोबर फॅशन हा देखील रेवती यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. “क्लासिक लाईन्स आणि मर्यादित ऍक्सेसरीज मला आवडतात. तसेच स्टाईलमध्ये मला सातत्य आवडते,” रेवती सांगतात. रेवतीच्या संग्रहात गुढग्यापर्यंतच्या पॅटर्न ड्रेसेस, स्कार्फस्, स्किनी जिन्स, कार्डीगन्स, टॉप्स आणि चांगले बुट यांचा समावेश असतो. “ तुम्हाला मी नेहमीच अशा पोषाखात दिसेन आणि त्याच्याबरोबर माझे घड्याळ, लव ब्रेसलेट, एमराल्डची अंगठी आणि कानातले असते. माझ्या बॅग्ज मात्र सतत बदलत रहातात... बॅग्ज माझी कमजोरी आहे,” त्या सांगतात. आईकडून ही आवड आपल्यात आल्याचे त्या सांगतात.

हिरवा आणि करडा हे रेवती यांचे आवडते रंग... “हिरवा आणि करडा या दोन्ही रंगांबाबत मला सर्वाधिक आवडणारी गोष्ट म्हणजे, हे दोन्ही रंग हवामानातील आणि निसर्गातील केवळ चांगल्याच गोष्टी समोर आणत नाहीत तर सर्जनताही समोर आणतात. मला हे खूप आवडते की करडा रंग तुम्हाला मधोमध आणून सोडतो आणि कोणता रस्ता निवडयाचा हे तुमच्यावर असते. पांढरी बाजू निवडायची की काळी... आणि त्यानंतर इतर सर्व रंग त्यामध्ये आणखी भर घालू शकतात. माझी करड्या रंगाची आवड लोकांना विचित्र आवडते,” रेवती सांगतात.

लहानपणापासून केलेले प्रवास पहाता, सहाजिकच त्यांना अनेक भाषा येतात. त्यांचे फ्रेंच आणि इंग्रजी उत्तम आहे. तसेच त्या मॅंडरीन बोलू शकतात. तर तेलगू भाषा त्यांना समजते..

लोकांना आनंदी ठेवायला रेवती यांना आवडते आणि गरजवंतांना मदत करत करायलाही... त्याचबरोबर तिला कला आणि वाचण्याचा छंद आहे. “ मला चांगले आणि वाईट असे सर्वच साहित्य सारख्याच प्रकारे खेचून घेऊ शकते. कारण त्यातून मी काहीतरी शिकत असते. कलेबाबत म्हणाल, तर माझे वडिल एक संग्राहक होते आणि त्यामुळे लहानपणापासूनच मी त्यांच्याबरोबर विविध लिलाव प्रक्रियांना आणि प्रदर्शनांना जात असे आणि त्यामुळे फ्रेंच आणि भारतीय कलांची मला चांगली जाण आली. एखाद्या कलाकृतीची निर्मिती करण्यासाठी त्यामागे असलेली विचारप्रक्रिया अद्भूत असते,” रेवती आवर्जून सांगतात.

Add to
Shares
11
Comments
Share This
Add to
Shares
11
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags