संपादने
Marathi

छोट्या शहरातील उद्योजकाची गगनभरारी, जगभरात ३०० पेक्षा जास्त प्रकल्पांचा विस्तार

8th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

कितीतरी लहान उद्योजक अनेक छोट्या शहरांमध्ये मेहनत करत असून, त्यांचे मुख्य लक्ष्य आपल्या मूळ शहरातून यशप्राप्ती करणे, हे आहे. महाराष्ट्रातील पंकज छाजेड यांनी देखील आपल्या छोट्याश्या जन्मगावात काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी भारतातील एका अग्रणी विश्लेषण (अनालिसिस) कंपनीचे स्वप्न पाहिले, जे ग्रामीण आणि सुशिक्षित तरुणांना सक्षम बनवू शकेल. आज त्यांचे स्टार्टअप एसडीएलसीने (SDLC) यशस्वीरित्या तीन वर्षे पूर्ण केली आहेत. यांचे जगभरात ३०० पेक्षा जास्त प्रकल्प असून, त्यांच्याकडे २५ लोकांचा एक मजबूत संघ आहे.


image


एसडीएलसी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड एक सर्विस प्रोव्हायडर आहे, जो एक व्यापार विश्लेषण (बिजनेस अनालिसिस), युजर एक्सप्रिएन्स आणि युजर इंटरफेस सर्विस देतो. यात सॉफ्टवेयर तयार करण्याची गरज असते. आयसीटी आणि जेबीआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी असलेले पंकज छाजेड यांनी याची स्थापना केली. पहिल्या वर्षी स्टार्टअपला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यात, हरहुन्नरी लोकांना नियुक्त करण्यात आणि सह-संस्थापक शोधण्यात स्टार्टअप अयशस्वी ठरले. मात्र पंकज यांनी हार मानली नाही. आपल्या जन्मस्थानी काही वेगळे करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली. एसडीएलसी आता नफ्यात असून, आता ती कंपनी चांगला महसूल निर्माण करते. तसेच विकासाला गती देण्यासाठी कुशल गुंतवणुकीच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही कंपनी सध्या पूर्वीपेक्षा जास्त ग्राहक आकर्षित करत असून, व्यापार विश्लेषण आणि UI/UX डोमेनमध्ये नवे प्रोडक्ट्स देऊ करते. अंतर्गत व्यापार विश्लेषण (इन हाऊस बिझनेस अनालिसिस) क्षमता असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि स्वतंत्र सल्लागार यांचे स्पर्धक आहेत. त्यांचे ध्येय त्या कंपन्यांना बीए सपोर्ट प्रोव्हाईड करणे आहे, ज्यांच्याकडे व्यापार विश्लेषणाची कौशल्ये नाहीत.


image


एसडीएलसीची वैशिष्ट्ये

• कॉस्ट कॉम्पिटीवनेस - छोट्या शहरातून सुरुवात केली असल्याने संसधान खर्च (रिसोर्स कॉस्ट), पायाभूत सुविधांचा खर्च (इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट) आणि ऑपरेशन कॉस्ट कमी करण्यात मदत मिळाली असून, याचा फायदा ग्राहकांना मिळतो.

• डोमेन नॉलेज - त्यांचे डोमेन एक्स्पर्टाइज बिजनेस अनालिसिस UI आणि UX आहेत.

• २४*७ उपलब्धता आणि पायाभूत सुविधा - भलेही ही कंपनी छोट्या शहरात स्थापन करण्यात आली आहे. मात्र तरीही त्यांच्याकडे चांगल्या पायाभूत सुविधा आहेत. प्रशस्त कार्यालय, हाय स्पीड इंटरनेट कनेक्टीव्हिटी, विचारविनिमय कक्ष आणि २४*७ उपलब्धता यामुळे त्यांना भरपूर मदत मिळते.

• वितरण करण्याची गुणवत्ता - त्यांच्याकडे वेळेत वितरण करण्याची उत्तम क्षमता आहे.

• सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटला सपोर्ट करण्याची सेवा - सॉफ्टवेअर डेवलपमेंटशी संबंधित सर्व सेवा ते पुरवतात.

त्यांच्या मुख्य ग्राहकांमध्ये सॉफ्टवेअर डेवलपमेंट कंपन्या आणि प्रोडक्ट कंपन्या आहेत. याशिवाय असे अनेक उद्योजक यांचे ग्राहक आहेत जे आपल्या कल्पनेला प्रोटोटाईप आणि मॉकअप डिझाईनच्या स्वरुपात कॉन्सेप्चुअलाईज करू इच्छितात. त्यांचा ९० टक्के महसूल अमेरिका आणि ब्रिटेन येथून येतो. सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटला सपोर्ट करणारी सुविधा देखील ते पुरवतात. ज्यात रिक्वायरमेंट अनालिसिस, व्यापर विश्लेषण, कार्यात्मक आणि तांत्रिक दस्तऐवजीकरण (फंक्शनल आणि टेक्निकल डॉक्युमेंटेशन), उत्पादन विश्लेषण, यूजर इंटरफेस आणि यूजर एक्स्पेरिन्स डिझाइन, प्रोटोटाइपिंग आणि फंक्शनल टेस्टिंग यांचा समावेश आहे.


image


माहिती तंत्रज्ञान कंपन्या, उत्पादन कंपन्या आणि स्टार्टअप्स त्यांना ते लक्ष्य करतात. या ग्राहकांना व्यापर विश्लेषण कौशल्यांची आवश्यकता असते. मात्र ही कौशल्ये असणारी व्यक्ती सहसा उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते पूर्णकालीन व्यापार विश्लेषकाची नियुक्ती करत नाहीत. या व्यतिरिक्त ते या सेवांचा आउटसोर्स करतात. सध्या एसडीएलसी भारतीय कंपन्यांना लक्ष्य करत नाही. मात्र नजीकच्या काळात भारतीय कंपन्यांनादेखील लक्ष्य करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांचा जवळपास १०० टक्के व्यवसाय परदेशातून येतो. ते जागतिक ग्राहकांना सेवा पुरवत असून, त्यांचा अधिकतम व्यवसाय हा सारख्याच ग्राहकांकडून पुनर्प्रकल्पाद्वारे होतो. संकेतस्थळे आणि समूह संपर्क माध्यमांच्या मदतीने ग्राहकांपर्यंत पोहोचणे, काही कठीण काम नाही. भारतीय ग्राहक मिळवण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी वेळेत हे ग्राहक मिळतात. मात्र आता ते प्रगतीचा वेग अधिक वाढवण्यासाठी भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची आणि अधिक विस्तार करण्याची योजना आखत आहेत.

ग्राहकांचा फायदा

• ग्राहकांना सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटची किंमत कमी करण्यात मदत करणे

• वास्तविक सॉफ्टवेयरच्या निर्मितीपूर्वी ग्राहक डेमो प्रोटोटाईप पाहू शकतात.

• ग्राहकांना टेक्नॉलॉजी डोमेन आणि बिजनेस डोमेनमधील अंतर समजण्यात मदत होते.

• जटिल व्यवसाय प्रक्रिया, डॉक्युमेंटींग रिक्वायरमेंट यांना सहजसोपे बनवून डेवलपमेंट लाइफ सायकलच्या कार्य़कुशलतेमध्ये सुधारणा करणे

• मेथड्स, टूल्स, टेक्निक्स आणि चेकलिस्टचा वापर करून उत्पादनातील धोका कमी करणे

पंकज यांच्या मते, ʻएक उद्योग चालविण्यात कधीही उद्योगाचे स्थान अडसर ठरत नाही. यासाठी आपल्याला जर कोणत्या गोष्टीची गरज असेल, तर ती म्हणजे ध्येय, मिशन आणि ते काम पूर्ण करण्यासाठी दृढ इच्छाशक्ती. सुरुवातीच्या काळात टीम तयार करणे आणि ग्राहक मिळवणे, आव्हानात्मक काम होते.ʼ पहिल्या वर्षी त्यांचे लक्ष फक्त काही ग्राहक मिळवण्यावर आणि प्रकल्प सुरू करण्यावर होते. सुरुवातीला त्यांनी स्वतंत्र सल्लागार म्हणून काम केले. त्यानंतर कालांतराने त्यांनी आसपासच्या परिसरातून अभियंत्यांची भरती करणे सुरू केले. त्यांच्याकडे आता एक संघ असून, तो प्रकल्प हाताळतो. ग्राहकांना सेवा पुरवण्याचे काम करतो. लहान शहराने या संघाला एकसंध राहण्यास आणि मजबूत बनण्यास मदत केली. कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत सतत अद्ययावत ठेवण्यासाठी त्यांनी त्यांच्या संघात सेंटर ऑफ एक्सिलेन्स (COE) बनविले आहे. कर्मचाऱ्यांच्या सर्वांगिण विकासाकरिता हे एक चांगले पाऊल आहे.

लहान शहरांमध्ये उद्योग सुरू करुन तो प्रस्थापित कऱणे, आव्हानात्मक असल्याचा सर्वसामान्यांचा समज आहे. मात्र पंकज यांना वाटते की, लहान शहरांमध्ये टीम तयार करणे, हे काही कठीण कार्य नाही. थोडेसे वेगळे निश्चितच आहे. इंटरनेट पेनिट्रेशनची जलदगती विकेंद्रीकरणाला चालना देत आहे. ओपन सोर्स टूल्स आणि क्लाऊड कॉम्प्युटींगने एक जलदगतीने वाढणाऱ्या कंपन्या कुठूनही सुरू करणे, शक्य केले आहे. समूह संपर्क माध्यमाने उद्योजकांना कोणत्याही ठिकाणी असलेल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याकरिता एक सुलभ मार्गदेखील तयार केला आहे.

लहान शहरांमध्ये स्टार्टअपसाठी गुंतवणुकदार शोधणे, हरहुन्नरी लोकांची नियुक्ती करणे आणि यशस्वी होण्याकरिता योग्य औद्योगिक संसाधन शोधणे, कठीण असते. मात्र पंकज यांच्या मते, जर कोणामध्ये काहीतरी करण्याची हिंमत असेल, तर हे देखील करणे शक्य आहे.

बाजारातील बदलत्या गरजांनुसार संस्थांकरिता व्यापार विश्लेषण करणे, निकडीचे बनले आहे. यूजर एक्सप्रिएन्स/इंटरफेस याचे एक मूळ कारण आहे. व्यापार विश्लेषण दस्तऐवजीकरणाच्या फार पुढे गेले आहे. आता ते वायरफ्रेमिंग आणि प्रोटोटाइपच्या माध्यमातून रिक्वायरमेंटसचे व्हिज्युअल सादरीकरण झालेले आहे.

टीम प्रोडक्ट साईडमध्ये अधिक जास्त व्यापार विश्लेषणाची मागणी होत असून, येथे उत्पादनाला वापरकर्त्याच्या गरजा लक्षात घेऊन बनविण्यात येते. तसेच उत्पादन वापरकर्त्याकरिता सहजसोपे असावे, याची काळजीदेखील घेतली जाते. सध्याचा कल पाहता पंकज आणि त्यांची टीम आपल्या काही सेवांना उत्पादनाच्या स्वरुपात विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे सध्या SaaS उत्कृष्ट उत्पादन myalma.in असून, जे एक अधिकृत वेब संबंधित उत्पादन आहे. सेवा क्षेत्रातील बदलांबद्दल बोलताना पंकज सांगतात की, मी हे नाकारत नाही की, सध्याचा कल हा उत्पादन बनविणे आणि त्यांना कार्यान्वित करणे हा आहे. उत्पादनांना सहजरित्या मापता येऊ शकते. मात्र सेवा क्षेत्रातील संसाधन संलग्न गरजा पाहता स्केल करण्यासाठी वेळ लागतो. मात्र मला नक्की माहित आहे की, सेवा संबंधित स्टार्टअपच्या तुलनेत उत्पादनांची आयुमर्यादा लहान असते. जर भारतात उत्पादनामध्ये वाढ होत असेल तर नक्कीच सेवा संबंधित कंपन्यांसाठी अनेक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.ग्रामीण अथवा लहान शहरांमधुन कशाप्रकारे एक विश्वस्तरीय सेवा संबंधित स्टार्टअप सुरू करता येऊ शकतो, याचे पंकज हे एक उत्तम उदाहरण आहेत.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags