संपादने
Marathi

लहान वयात मोठी भरारी

ती समुद्रात संचार करते...जमिनीवर फुटबॉल खेळते...आणि ती आकाशात देखील विहार करणार…

11th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

मनाने निश्चय केला तर डोंगरसुद्धा छोटा वाटू लागतो ... खडतर रस्त्यांवरून चालण्याची इच्छा असेल तर काहीही अवघड नाही आणि अशाच अवघड रस्त्यावरुन प्रवास करत कर्तृत्व मिळवणा-या लोकांचे जगभरातून कौतुक केले जाते. अशांच्या यादीत बसण्याचा मान मिळालाय तो 21 वर्षांच्या नम्रता पुरोहितला. कमी वयात मोठी भरारी घेऊन तिने सर्वांसमोर एक आदर्श ठेवलाय.


नम्रता पुरोहित

नम्रता पुरोहित


15 वर्षांची असताना घोडय़ावरून पडल्याने नम्रताच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. अगदी लहानपणापासून डान्स आणि विविध खेळांमध्ये पारंगत असलेल्या नम्रताला डॉक्टरांनी डान्स, खेळांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. तो अपघात खरं तर माझ्यासाठी एक धक्काच होता, कारण मी त्यावेळेस स्क्वॉशमध्ये विविध स्पर्धा जिंकल्या होत्या. अपघातामुळे अचानक खेळणं आणि डान्स बंद झाल्याने खेळातलं करिअर संपतंय की काय असं वाटत असतानाच वडिलांमार्फत चालवल्या जात असलेल्या केंद्रात पिलाटीज अर्थात एका नव्या व्यायाम प्रकाराकडे तिने आपला मोर्चा वळवला. मनाचा निश्चय करून पायांमधली ताकद परत आणण्यासाठी ती जिममध्ये जाऊन विविध व्यायाम प्रकार करायची. अशाच वेळी तिची ओळख पिलाटीज या व्यायामप्रकाराशी झाली. या व्यायामप्रकारामुळे स्वत.मध्ये झालेला बदल तिच्या लक्षात आला आणि तिने आपलं स्क्वॉश खेळणंसुद्धा पुन्हा सुरू केलं.

हा हळूहळू लोकप्रियतेकडे जाणारा एक व्यायाम प्रकार आहे. दररोजच्या व्यायामाचा कंटाळा असणा-यांना हल्ली यासारखे व्यायामप्रकार खुणावू लागले आहेत. पुढे हाच व्यायामप्रकार शिकवण्याचा आणि देशभर प्रसिद्ध करणायाचा निश्चिय नम्रताने केला आणि बघता बघता आज देशातली सर्वात लहान वयातली ‘पिलाटीज इन्स्ट्रक्टर बनली.

पिलाटीज या व्यायाम प्रकाराबद्दल बोलताना ती सांगते की, हा व्यायामप्रकार तुमच्या शरीराच्या लहान स्नायूंवर काम करतो, म्हणूनच एकाप्रकारे मानसिक शांती मिळवून देणारा हा व्यायाम प्रकार आहे. नम्रता राज्य स्तरावरील क्वाएश, फुटबॉलर, स्कूबाचालक तर आहेच शिवाय एक नामवंत उद्योजकदेखील आहे. तिला विमान देखील चालवण्यास शिकायचे आहे. अपघातातून सावरल्यावर शरीराच्या दुखापतग्रस्त भागाची हालचाल पूर्ववत करण्यासाठी पिलाटीजचा वापर होत असून खेळाडू आणि कलाकारांसाठी हा व्यायाम उत्तम असल्याचे तिचे मत आहे.

या क्षेत्रात काम करणे एक आव्हान असल्याचे तिचे म्हणणे आहे. लोकांना याबद्दलची माहिती पटवून देणे गरजेचे आहे. याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. अजूनही हा व्यायाम प्रकार भारतात नवीन असल्याने लोकांमध्ये तो तितकासा प्रसिद्ध नाही. पण लोकांमध्ये याबाबत उत्सुकता नक्की आहे . आतापर्यंत लोकांची अशी धारणा होती की हा केवळ महिलांसाठी व्यायामप्रकार आहे. मात्र आता लोकांचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून पुरूषही या व्यायामप्रकाराकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघत आहेत. या व्यायामप्रकारचा अवलंब केल्यास शरीर अधिक सदृढ़ बनत असल्याचा तिचा दावा आहे.. सध्या व्यायामप्रकाराबद्दलची क्रेझ झपाट्याने वाढत आहे.


image


नम्रताने ज्या वयात यश संपादन केले त्या वयात मुले कॉलेजमध्ये शिक्षण आणि मौजमस्ती मध्ये रमली जातात त्याच वयात नम्रता दररोज 6 ते 7 तास क्लासमध्ये काम करते आणि बाकीचा वेळ आपल्या उद्योगाकडे लक्ष देण्यासाठी देते. नम्रताने क्रिकेट, फुटबॉल स्क्वॉशमधल्या बड्या खेळाडूंना ट्रेनिंग दिले. त्यासोबत तिने मुंबईच्या फ़ुटबॉल टीमला पिलाटीज व्यायामाचे धड़ेही दिले. इतकंच नाही तर, २०११ पासून मिस इंडिया स्पर्धेच्या स्पर्धकांना पिलाटीज शिकवण्याची जबाबदारीही नम्रतावर आहे.


नम्रता सर्वात तरुण स्टॉट पिलाटीज ट्रेनर आहे. तिला आतापर्यन्त प्रेरणा मिळाली ती तिच्या वडिलांकडूनच. नम्रताचा मुंबईत आणखी पिलाटीज केंद्रे उघडण्यावर भर असून देशातील प्रमुख शहरात अशी केंद्रे सुरु करण्याचा तिचा मानस आहे. एवढे असूनही ती आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करणार नाही. फिटनेस आणि अर्थशात्रात ती आपले ज्ञान आणखी वाढविणार आहे. नम्रताला लेखनाची मोठी आवड़ असून तिने फिटनेसवर पुस्तक लिहिले असून लवकरच या पुस्तकाचे प्रकाशन देखील करणार आहे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags