संपादने
Marathi

राम्या ‘द टॅप’ : मोजक्या रेषांची बोलकी भाषा !

Chandrakant Yadav
25th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

‘‘मला वाटते मी फार नशीबवान आहे. माझ्या डोक्यात जे आले ते करण्यापासून मला अगदी बालपणापासूनच कुणी रोखले नाही. विशेष म्हणजे माझ्या आवडी निवडीही क्षणा-क्षणाला बदलत असत. कधी मला प्राणीसंग्रहालयाची देखरेख करायची असे तर कधी मला रद्दी रिसायकल करावीशी वाटे. आणि मला जे जे म्हणून वाटत असे ते ते सगळे मी हमखास करत असे. हो... आणि जे जे मी करत असे ते ते अगदी मनापासून… गंभीरपणे. वरवर मी काहीच केले नाही. नवनव्या गोष्टींनी माझा उत्साह दिवसेंदिवस वाढत गेला. रंजक आणि गमतीदार अनुभवही आले’’, हे आत्मकथन आहे… ‘द टॅप’च्या संस्थापिका राम्या श्रीराम यांचे.

राम्या यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘टॅप’ म्हणजे... ‘‘माझ्या कल्पक बुद्धीतून आणि विचारातून निघालेल्या कथांचे घरटेच आहे."

‘द टॅप’मध्ये कॉमिक्सच्या माध्यमातून गोष्टी सांगितल्या जातात. राम्या यांच्या कल्पनांचे घोडे यात चौखूर उधळलेले असतात. सचित्र गोष्टी राम्या अशा सराईतपणे रचतात की, भाषेच्या ओघात उद्भवणाऱ्या अडथळ्यांसाठी या गोष्टींमध्ये काही जागाच शिल्लक राहात नाही. वाचक प्रेक्षकही असतो आणि कथेतून जणू तो तरंगत जातो अन्‌ किनाऱ्याला लागतो.


image


फेसबुकवरून कलाप्रवास...

आपण कॉमिक्सच्या माध्यमातून गोष्टी सांगू. कॉमिक्स हेच आपल्या अभिव्यक्तीचे माध्यम असेल असा राम्याने कधी विचारही केलेला नव्हता. लॅपटॉप टचपॅडच्या माध्यमातून आपल्या मित्रांची चित्रे बनवून ती फेसबुकवर अपलोड करण्याच्या खेळातून राम्या यांच्या या नव्या खेळाचा जन्म झाला. राम्याने चितारलेले एका मित्राचे चित्र पाहून एकाने त्यांना कॉमिक स्ट्रिप बनवण्यास सांगितले. यातनं काही मानधनही मिळणार होते, हे विशेष!

राम्या सांगतात, ‘‘जेव्हा मला पहले कस्टम कॉमिक बनवण्याची ऑर्डर मिळाली, तेव्हा मला वाटले की अरे हा छंद एका मोठ्या धंद्याचे रूप घेऊ शकतो. मग मी अधिक कष्ट उपसू लागले. अधिक वेळ देऊ लागले. रेषांवरला माझा ताबा वाढवू लागले. थोडक्यात कामासंदर्भात गंभीर बनले. वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्ती लढवू लागले. फॉर्मेट्‌सवर काम केले. दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार करणे आणि त्याला शेवटी चित्रांनी सजलेल्या गोष्टीत गुंफणे या सगळ्याच प्रक्रियेचा आनंद मी घेऊ लागले.’’

राम्या यांचे शिक्षण वगैरे हैदराबादला झाले. शाळेत अभ्यास अन्‌ खेळांपेक्षा राम्याचे मन कला, शिल्प, संगीत आणि नृत्य अशा इतर बाबींतूनच रमत असे. पीटी क्लास आणि पियानो क्लास यातून राम्या नेहमीच पियानो निवडत असे. सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य घरून असण्याशिवाय राम्याला शाळा सुटल्यानंतर आपण काय करावे, हा प्रश्न पडत असे. शालेय शिक्षण आटोपल्यावर तर अजिबात उमगत नव्हते कुठे ॲडमिशन घ्यावी म्हणून? अखेर वेल्लूरच्या 'वेल्लूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'तून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

इंजिनिअर झाली संपादिका

पदवी मिळवल्यानंतरही पुढल्या आयुष्याचा मार्ग ठरलेला नव्हता. कितीतरी महाविद्यालयांतून, कंपन्यांतून विनंतीअर्ज केले. प्रवेश परीक्षाही दिल्या…. आणि शेवटी एका प्रकाशन व्यवसायात संपादिका म्हणून त्यांनी कामाला सुरवात केली. पाच वर्षे तिथे त्यांनी काम केले. 

प्रकाशन गृहात काम केल्याने राम्या यांना स्वत:संदर्भातल्या अनेक गोष्टी समजून घेण्यात मोठी मदत झाली. त्या म्हणतात, ‘‘मी कार्यालयात पुस्तकांचे संपादन करायचे आणि घरी आले, की कॉमिक्स बनवू लागायचे. कार्यालयात मी शालेय पुस्तकांतील चुकाही दुरुस्त करत असे आणि घरी परतले, की हिंडण्या -फिरण्याशी निगडित गोष्टी लिहू लागे. यातूनच मला कळले, की चित्रकला आणि लेखन या दोन्ही कला माझ्या ठायी एकाच वेळी आहेत. आता मला माझे लक्ष्य कळलेले होते आणि पुढे होता-होता सगळेच घडत गेले.’’

image


राम्या यांनी आपल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘द टॅप’ची सुरवात केली.

‘‘क्लायंट मिटिंग्ज्‌मध्ये बसल्या-बसल्या मी कॉमिक्स बनवण्याबाबत विचार करत असे. मला वाटे ‘द टॅप’ला जर आपण आणखी थोडा जास्त वेळ दिला तर कसे होईल. ते अधिक चांगले होईल, असे उत्तर माझेच मी मला देई. आणि मग मी ठरवून टाकले.’’

आता त्या आपला पूर्ण वेळ ‘द टॅप’ला देऊ लागल्या. कुटुंबीय आणि मित्रांनी यात मोलाची मदत केली, असे राम्या प्रांजळपणे सांगतात. खरं तर त्या ‘वन वुमेन आर्मी’ आहेत, पण त्यांना तसे कुणी म्हटलेले आवडत नाही. राम्या खळखळून हसत सांगतात, ‘‘ असं कसं, माझ्या घरचे लोक आणि माझे मित्र माझ्या कलेबाबत अगदी बेंबीच्या देठापासून प्रचार करतात. मार्केटिंग करतात. एक्सेल शीट्‌स बनवण्यातही माझी मदत करतात. लोकांपर्यंत माझी कला पोहोचवतात. कलेतील बारकाव्यांबद्दल मला सांगतात. मग माझ्या सैन्यात मी एकटी कशी?’’

इतकं सगळं उपलब्ध होऊनही राम्या यांना वेळोवळी व्यवसायाशी निगडित असलेल्या आव्हानांचा सामना करावाच लागला. राम्या यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘‘मला नाही म्हणायला येतच नाही. आधीतर प्रत्येक कामाला मी हो म्हणून देत असे. कितीतरी वेळा मला अगदी तुटपुंजा मोबदल्यात काम यामुळे करावे लागलेले आहे. पण नंतर त्यांच्याही लक्षात आले की हे असे पुढे फार चालायचे नाही. जेव्हा एखादे काम तुम्ही झोकून करू लागता तेव्हा त्या कामाबद्दल तुमच्यात उत्साह देखील असतो आणि एक जिद्दही असते. पण त्या कामासाठी लागणाऱ्या पैशांसह आपल्या प्रयत्नांचा आणि कष्टाचाही हिशेब ठेवायलाच हवा.’’

राम्या यांना कामे सोपवता येत नाहीत. विकताही येत नाहीत. त्या हे सगळे आता कुठे शिकताहेत. राम्या यांना धोरण वगैरे आखणे काही खास पसंत नाही. उद्यमातील बारकावे शिकण्यासाठी म्हणून त्यांनी कुठला कोर्स वगैरेही केलेला नाही.

त्या म्हणतात, ‘‘मला संधी तशा बऱ्याच मिळाल्या. प्रत्येक संधीने मला काही तरी दिलेच आहे. मी लहान-मोठ्या प्रत्येक कामाला महत्त्व देत आलेले आहे. प्रत्येक निर्णयामागे माझा विचार हाच असतो, की शेवटी माझ्या व्यवसायात गमावण्यासारखे काय आहे. या प्रश्नाचे उत्तर जितके स्वच्छ असते तितकीच माझ्या यशाची शक्यताही स्पष्ट असते.

सृजनशीलतेला जिथे वाव आहे, अशा प्रोजेक्टस्‌वर काम करायला एक व्यावसायिक म्हणून राम्या यांना आवडते. एका विशिष्ट दिनचर्येत स्वत:ला बांधून घेऊन काम करायला त्यांना आवडत नाही. ती त्यांची पद्धतही नाही. बऱ्याचदा तर त्यांना अन्य चाकरमान्यांप्रमाणेच मित्रांसोबत चहा-कॉफी घ्यायला जाणे भावते. सुटी घेऊन कुठेतरी बाहेर फिरून येऊ असे वाटते.

एक व्यावसायिक म्हणून वेळेबरहुकूम चालणे एक चांगली सवय असते. ती पाळत असतानाच एक व्यक्ती म्हणूनही आपल्या काही इच्छा असतातच. म्हणून मग त्यांनी स्वत:साठी काही नियम बनवलेले आहेत आणि काही अपवादही.

राम्या म्हणतात, ‘‘मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की तुम्हाला आवडीची गोष्ट जोवर मिळत नाही तोवर तुम्हाला प्रयत्न चालू ठेवायला हवेत. तुम्ही उगीच तडजोड करायला नको. तुमचे हितशत्रू तर टपूनच बसलेले असतात, की अशी तडजोड तुम्ही केव्हा करता म्हणून. ही गोष्ट तर मी गाठीलाच बांधून घेतलेली आहे आणि त्यामुळे माझे आयुष्य अधिक सोपे आणि सहज बनलेले आहे. गुंतागुंत अशी त्यात नाहीच.’’

भविष्याने जणू राम्यांच्या स्वागतासाठी आताच पायघड्या घालायला सुरवात केलेली आहे. कितीतरी प्रोजेक्टस्‌, कितीतरी आव्हाने, कितीतरी चित्रे आणि कितीतरी गोष्टी त्यांची वाट बघत आहेत.

राम्या स्वत:ही सांगतात, ‘‘मलाही ‘दी टॅप’च्या उत्पादनांचे प्रकार वाढवायचे आहेत. ऑनलाइन स्टोअर सुरू करायचे आहे.’’

राम्याचे सृजन… त्यांनी काढलेली ही काही चित्रे

image


Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags