संपादने
Marathi

पैसे कमविण्याचे स्वातंत्र्य ही स्टार्टअपबाबतची सर्वात चांगली गोष्ट आहे – मिशा गुडीबंदा, संस्थापक, स्काय गुडीज

Team YS Marathi
23rd Apr 2016
Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share

जेव्हा मिशा आणि अमित गुडीबंदा यांनी २००६ मध्ये आपल्या पहिल्या-वहिल्या उपक्रमाला सुरुवात केली, तेव्हा एक कल्पना प्रत्यक्षात उतरविताना त्या व्यवसायाच्या प्रमुखपदी असल्याने ते खूप उत्साहात होते. “येत्या काळात डिझाईन आणि टेक्नॉलॉजी याचे कॉम्बिनेशन असलेल्या सेवेत आर्थिक फायदा मिळवून देण्याची क्षमता असेल या विश्वासावर २००६ मध्ये स्काय डिझाईनची सुरुवात झाली,” असं ते मुलाखतीदरम्यान सांगतात. गेल्या दशकभरात स्काय डिझाईनने फिल्म्स आणि कॉर्पोरेट्सच्या क्षेत्रात एका नव्या कार्यक्षेत्रातील काम केले आहे.

पण जसजसे या कामाद्वारे सिद्ध करण्यासारखे काही राहिले नाही तेव्हा या दोघांनाही वाटले की त्यांना जे काम करायचे होते ते हे नाही. मिशा सांगते, “स्काय डिझाईन चांगलं चाललं असताना आणि व्यवसाय वाढत असताना आम्हाला लोकांना खरोखर काहीतरी चांगलं देणारं आणि आम्हालाही आनंद देणारं असं काहीतरी करावंसं वाटू लागलं. २०१३ मध्ये आम्ही ब्रेक घेतला, ज्याची आम्हाला नितांत गरज होती आणि आम्हाला नेमकं काय बनवायचं आहे याबाबत विचार केला.” ई-कॉमर्सच्या राज्यात मार्केटला गिळंकृत करणाऱ्या वाढत्या व्यक्तिनिरपेक्ष मास-मार्केट उत्पादनांचा उतारा करेल अशा प्रकारचे काहीतरी निर्माण करण्याची कल्पना आम्हाला सर्वात जास्त भावली.


मिशा आणि अमित गुडीबंदा  

मिशा आणि अमित गुडीबंदा  


मिशा सांगते, “मास-मॅन्युफॅक्चर्डपेक्षा डीआयव्हाय (डू इट युवरसेल्फ कीट्स) आणि गिफ्ट देता येण्याजोग्या हाताने बनविलेल्या वस्तूंशी लोकांची भावनिक जवळीक असते हे लक्षात घेऊन आम्ही सुरुवातीला अशा वस्तू बनवायला सुरुवात केली. या वस्तू आनंदाची भावना, प्रेम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहकार्याची भावना निर्माण करतात. आम्ही पेपर आणि हॅण्ड पेंटेंट आर्ट या आमच्या दोन अत्यंत आवडीच्या वस्तूंपासून काही डीआयव्हाय तयार केले, जे आम्ही आमच्या इटसी शॉपवरच्या यादीत समाविष्ट केले.”


image


लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात हे पाहणे आणि हळूहळू यामध्ये स्थिरावणे हा त्यामागचा उद्देश होता. पेपर क्राफ्ट्सशी स्पर्धा करत जेव्हा तुम्ही कित्येक चमचमत्या, खूप सुंदर, टिकाऊ वस्तूंच्या स्पर्धेत उभे असता तेव्हा तो सर्वात धोक्याचा व्यवसाय असतो. पण आम्हाला सुरुवातीपासून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मिशा सांगते,

“आमचे काम इतर अनेक साईट्ससह इट्सी ब्लॉग, डिझनीज बॅबल, बझफीड आणि धीस इज कोलोजलवरही झळकणार असल्याने आम्ही खूप रोमांचित झालो होतो. आम्हाला जगभरातील ग्राहकांकडून आमचं काम आवडल्याचं सांगणाऱ्या आणि अधिक मागणी करणाऱ्या प्रतिक्रिया आणि मेसेजेस मिळाले. आश्रमातील रुग्ण त्यांना भेटायला येणाऱ्यांसाठी आमचे डिआय़व्हायज तयार करु लागले, आमची खेळणी वापरुन ऑटिस्टिक आणि अपंग मुलांच्या मोटर स्किल्समध्ये सुधारणा झाली आणि पालक व मुलांनी एकत्र डीआयव्हायजची मजा घेतल्याने त्या कुटुंबांकडे खूप चांगल्या आठवणी तयार झाल्या.”

“त्यामुळे आम्ही स्काय गुडीज नावाने एक संलग्न ब्रॅण्ड सुरु केला. आम्ही आमचे बचत केलेले पैसे आधीच कापलेल्या आणि घडी घातलेल्या फिजीकल डीआयव्हायचे उत्पादन घेण्यासाठी वापरले. कात्री किंवा सुरीच्या वापराविना कुणालाही या वस्तू बनविण्याचा आनंद घेता यावा ही यामागची कल्पना होती. लोकांना आपल्याकडे आकृष्ट करुन घेतील, त्यांच्या भावनांशी नाते जोडू शकतील आणि लोकांना आनंद मिळवून देतील अशा सुंदर, परवडणाऱ्या किंमतीमधील भेटवस्तूंची दुनिया निर्माण करणे हा स्काय गुडीजचा दृष्टीकोन आहे,” असं मिशा सांगते.

मिशा आणि अमित नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ डिझाईनमध्ये वर्गमित्र होते. ते वेगवेगळ्या स्कूल ऑफ डिझाईनचे विद्यार्थी- तो प्रोडक्ट डिझाईनर आणि ती ग्राफीक डिझाईनर. सौंदर्यशास्त्राविषयीची तीव्र आवड दोघांनाही होती आणि दोघेही आपल्या कामाबद्दल वेडे होते. मैत्रीपासून सुरुवात झालेल्या त्यांच्या नात्याने पुढे सहकारी, जीवनसाथी, पालक आणि अर्थात सहसंस्थापक असा प्रवास केला. स्काय गुडीज हे त्यांनी एकत्र केलेल्या प्रवासाचे परमोच्च टोक आहे.


image


स्काय गुडीज ओरिजनल डिझाईन पेपर प्रोडक्ट्स आणि क्राफ्ट्स विकतात. “आम्ही उपयोगी वस्तू बनविण्यासाठी वेगवेगळ्या स्वरुपात दुमडता येतील असे पेपर क्राफ्ट किट्स डिझाईन करतो; ज्यायोगे ‘वस्तू तयार करण्याला’ आम्ही उत्पादनाच्या अनुभवाचा एक भाग बनवतो. आमची उत्पादनं हाताने रेखाटलेल्या क्लिष्ट इलुस्ट्रेशन्सने आच्छादित केलेली असतात. आम्हाला वाटतं की कला दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनावी आणि सहज जोपासता यावी.”

“आमच्या कलात्मक वस्तू भारतीय स्ट्रीट आर्ट आणि ट्रक आर्ट फॉर्म्सपासून प्रेरित आहेत आणि अनेक उत्पादनं विन्टेज प्रतीच्या आमच्या प्रेमातून तयार झाली आहेत. आम्ही पूर्व-कात्रण आणि पूर्व-घडी असलेली किट्स पुरवतो, जेणेकरुन वस्तू तयार करणे ही केवळ पेपर कटर्स आणि क्राफ्ट लवर्स यांच्यासाठीची सिमीत ऍक्टिव्हिटी न रहाता, लहानमोठ्या प्रत्येकाला करता येणारे काम व्हावे. वह्या, गिफ्ट बॉक्सेस, प्लॅनर्स आणि लेबल्स यासारख्या इतरही वस्तू आम्ही उत्पादित करतो, पण सर्व वस्तू उत्पादित करताना उद्देश्य एकच असते आणि ते म्हणजे वस्तूच्या मालकाला आनंद मिळवून देणे, या वस्तू वापरताना दर दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे,” असं मिशा सांगते.

मुंबईस्थित स्काय गुडीजच्या नावातील स्काय या शब्दाशी त्याच्या संस्थापकांच्या विशेष आठवणी जोडलेल्या आहेत. “लोकांनी गच्च भरलेल्या मुंबईच्या लोकलमधून प्रवास करत आम्ही आमच्या करिअरची सुरुवात केली. जोपर्यंत खिडकीमधून आकाशाचं ओझरतं का होईना पण दर्शन होत असायचं, तोपर्यंत त्या गर्दीतून होणारा प्रवासही सुसह्य असायचा. आमच्यासाठी ‘स्काय’ स्वातंत्र आणि आमच्यासाठी असलेली अमर्यादित जागा प्रतित करायचं,” मिशा सांगते. गुडीजचा अर्थ गुडीज ऑन सेल असाही घेता येऊ शकतो, त्याचबरोबर त्याचा संबंध या दोघांची मित्रमंडळी त्यांना गुडीबंदा या त्यांच्या लांबलचक आडनावाऐवजी ज्या नावाने संबोधत त्याच्याशीही लावता येईल.


image


स्काय गुडीजने दोन वर्षात प्रभावी वाढ अनुभवली आहे. विशेष म्हणजे स्काय गुडीज अस्तित्वात येण्यापूर्वी भारतासाठी डीआयव्हाय क्राफ्ट्स मार्केट हे जवळपास नवखे होते. मिशा सांगते, “रिस्क शिवाय उपलब्धी असू शकत नाही. आम्हाला धोक्यांची कल्पना होती, पण आमचा दृष्टीकोनही स्पष्ट होता आणि आम्ही पाहिलं की जे आमच्या डोक्यात आहे ते भारतीय बाजारात कुठेही उपलब्ध नाही आणि काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारातही. जेव्हा की परदेशात आमच्या उत्पादनांची पहिल्या दिवसापासून प्रशंसा झाली. सुरुवातीला भारतीय बाजारात डीआयव्हाय गिफ्ट्ससाठी जागा निर्माण करणं कठीण गेलं.”

मिशाला वाटतं की सध्याच्या हायपर डिजीटाईज युगामुळे त्यांचं काम खूप सोपं झालं आहे. “आपल्यावर अधिराज्य गाजवत असलेलं डिजीटल जग जास्त प्रायोगिक आणि भौतिक गोष्टींची मागणी करत आहे. जेणेकरुन लोकांना त्यांच्या अति डिजीटाईज झालेल्या आयुष्यात ब्रेक मिळेल; झटपट आनंद, अन्डू आणि रिस्टार्ट याची सवय जडलेली मुले अपयशाशी सामना करायला शिकतील; मेहनत घेऊन हाताने बनविलेल्या भेटवस्तूंच्या माध्यमातून लोक एकमेकांशी जोडले जातील.”


image


कंपनीने नुकतेच मुंबईमध्ये त्यांचे पहिले दुकान सुरु केले आहे. मिशा सांगते, “एका वर्टिकलमधून मिळणाऱ्या महसूलाच्या आधारे दुसरे वर्टिकल उभारतो आहे. जसजसे आम्ही विक्रीसाठीचे नवनवीन मार्ग अवलंबत आहोत आणि आमची प्रोडक्ट रेंज विस्तारत आहोत तसतशी महसूलात वाढ होत आहे. ही नैसर्गिक वाढ आहे आणि जोपर्यंत आम्ही आमची सर्व वर्टिकल्स योजल्याप्रमाणे स्थापन करत नाही तोपर्यंत आम्ही याच मार्गावर काही काळ कायम राहणार आहोत.”

या दाम्पत्याला गुंतवणूकीच्या अनेक ऑफर्स आल्या. मात्र त्यांनी आजवर त्या मार्गावर न जाण्याचाच पर्याय निवडला. मिशा सांगते, “जरी या ऑफर्स आकर्षक असल्या तरी आमचे प्रोडक्ट आणि तत्वज्ञान समजू शकणाऱ्या लोकांकडून आम्ही त्यावेळी पैसा घेऊ जेव्हा आम्हाला माहिती असेल की कंपनी आणि स्काय गुडीज हा ब्रॅण्ड आम्हाला पाहिजे तसा स्थापन करण्यात आला आहे.”

या दाम्पत्याने स्वतःच्या जोरावर स्कायगुडीजची सुरुवात केली. “जसजशी विक्री वाढत गेली तसतसं दुसऱ्या वर्षापर्यंत व्यवसायाने शाश्वत स्तर गाठला. असं असलं तरी आम्ही आता जास्त निधी या व्यवसायात आणि व्यवसाय क्षेत्रात पूर्णपणे वेगळ्या असलेल्या दुसऱ्या एका वर्टिकलमध्ये घालत आहोत. आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच्या सुरुवातीपासूनच्या उभारणीवर काम करत आहोत आणि २०१६ च्या मध्यावर ते बाजारात आणण्याचे आमचे उद्देश्य आहे,” ती सांगते.

एखादा नवीन उपक्रम सुरु करताना येणाऱ्या सर्वात वाईट अनुभवांबदद्ल बोलताना मिशा अनेक मुद्दे मांडते, “भारतामधील व्यावसायिकांसाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे इथली कर प्रणाली आणि स्टार्टअपने पालन करावयाच्या अपेक्षित गोष्टी लक्षात घेणं. पेपर वर्क करणं हे सर्वात त्रासदायक काम असतं. एक छोटं उदाहरण म्हणजे, जर आम्हाला तीन दिवसाच्या प्रदर्शनात सहभागी व्हायचं असेल आणि आमची उत्पादनं महाराष्ट्राबाहेर विकायची असतील तर त्यासाठी बाहेरील राज्यामध्ये तात्पुरत्या स्वरुपाच्या वॅट नंबरसाठी अर्ज करावा लागतो. ही वेळ खाऊ, त्रासदायक आणि खर्चिक प्रक्रिया आहे. ज्यामुळे नवीन उद्योग विस्तार करण्यापासून परावृत्त होतात. नियम असणं जरी गरजेचं असलं तरी सुरुवातीच्या दिवसात ते लादणं हे व्यवसायाच्या वाढीसाठी हानीकारक असतं.


image


पंतप्रधान मोदींच्या स्टार्टअप प्लॅनबद्दल वाचून आम्हाला आनंद झाला होता. आम्ही आशा करतो तो लवकरच प्रत्यक्षात उतरेल.”

गुडीबंदांनुसार प्रत्येक प्रयत्न मोलाचा असतो. मिशा सांगते, “पैसा कमावण्याचे स्वातंत्र्य, ज्ञान आणि आमचे काम इतरांना आनंद देते आणि आपल्या दृष्टीकोनाशी तडजोड करुन प्रचलित मानकांनुसार उत्पादन घेण्याऐवजी उत्पादनामध्ये गुणवत्तेचा उच्च दर्जा प्राप्त करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे ही भावना खरोखरच बहुमोल आहे.”

मिशा सांगते, तिला आजवर मिळालेल्या सल्ल्यांपैकी तिला तिच्या एसी पुरवठादाराने मोठं घर घेण्यापासून परावृत्त करुन दिलेला सल्ला सर्वोत्तम होता. तो तिला म्हणाला होता एका घरापासून तुम्ही अनेक घरं घेऊ शकत नाही, मात्र एका ऑफीस पासून अनेक ऑफीसेस सुरु करु शकता. “त्यामुळे आम्ही खूप साधं रहाणीमान जगतो, छोटी कार चालवतो आणि आमच्या व्यवसायात गुंतवणूक करतो,” असं ती सांगते.

हाच सल्ला इतरांना देताना तिला आनंद होतो. त्याचबरोबर ती स्वतःच्या प्रवासातील अनुभवांवरुन सल्ला देते. ती सांगते, “चांगले उत्पादन/सेवा सुरु करा. जे खरोखरच लोकांचे जीवन समृद्ध करु शकेल. चांगली भागीदारी उभारा, ज्यामध्ये सुरुवातीपासूनच पारदर्शकता असेल. व्यावसायिक असणं तणावपूर्ण असतं. तेव्हा तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला एखादा छंद असू द्या आणि यशस्वी होईपर्यंत तो जोपासा.”

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

पंचविशीतली तरूणी उत्तरप्रदेशातल्या आडगावातली कारीगिरी पोहचवतेय राष्ट्रीय नकाशावर...

तुम्हाला हव्या तशा चपला बनवून देणारं लखनऊचं अनोखं स्टार्टअप !

वुडॉन.... लाकडी फ्रेम्सचं ग्लॅमरवुडॉन.... लाकडी फ्रेम्सचं ग्लॅमर 

लेखिका – राखी चक्रवर्ती

अनुवाद – अनुज्ञा निकम

Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags