संपादने
Marathi

युवर स्टोरी मोबाईल स्पार्क २०१६ चर्चासत्राला नवी दिल्लीत सुरुवात

Team YS Marathi
18th Nov 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

आज नवी दिल्ली येथे युवर स्टोरी मोबाईल स्पार्क २०१६ या कार्यक्रमाला सूरवात झाली. युवर स्टोरीच्या संस्थापिका श्रद्धा शर्मा आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे संयुक्त सचिव, राजीव बन्सल तसेच इतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरवात केली. राजीव बन्सल यांनी मोबाईल तंत्राची सद्यस्थिती, उपयुक्तता यासारख्या अन्य विषयावर चर्चासत्राला सुरवात केली आहे.

image


युवर स्टोरीने, ‘मोबाईल स्पार्क’ च्या माध्यमातून या क्षेत्रातील उद्भवणाऱ्या समस्या आणि उपयुक्त संशोधन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. अॅप सारख्या संकल्पनेच्या पुढे जाऊन काय नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येऊ शकतात ज्या भविष्यात भारतातील ५०० दशलक्ष ग्राहकांना विश्वसनीय सुविधा उपलब्ध करून देतील या विषयावर तज्ज्ञांशी चर्चा होणार आहेत.

image


गेल्या काही दिवसांपासून इ-कॉमर्सच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मोदी सरकारने काही धाडसी निर्णय घेतले आहे. तुमच्या हातातील मोबाईल या सर्व निर्णयात तुमचा खूप मोठा आधार आहे हे आजही बऱ्याच लोकांना माहित नाही. मोबाईलवरून इ-करन्सीच्या माध्यमातून आपण चालता-चालता अनेक आर्थिक व्यवहार करू शकतो. फिनटेक अॅपच्या माध्यमातून पेटीयम सारख्या अनेक फिनटेक स्टार्टअपना अनन्यसाधारण महत्व आले आहे. तुमच्या हातातील मोबाईल वरून केवळ संभाषण नाही तर विडीओ काॅल्लिंग, मनोरंजन, बँकिंग व्यवहार, इ-कॉमर्स आणि घर ते कार्यालयापर्यंतचे सारे व्यवहार आता करता येणे शक्य झाले आहे. पुढच्या काळात आपल्या हातातील मोबाईल म्हणजे रिलायन्सने सांगितलेले घोषवाक्य आहे ‘ कर लो दुनिया मुठ्ठी में ’ शब्दशः खरे ठरले आहे. 

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags