संपादने
Marathi

असा एक स्टार्टअप जो 'कारपूलिंग' मार्फत रस्त्यावर गाड्यांची संख्या कमी करण्यासाठी तत्पर आहे

12th Feb 2016
Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share

सोमवारच्या पहाटे रस्त्यावर तोबा गर्दी असते, लांबचा प्रवास करणा-याच्या मनात एकच विचार असतो की सकाळी अजून लवकर घरातून निघाले पाहिजे.... आणि तुम्ही जर बेंगळूरु सारख्या शहरात रहात असाल तर या गोष्टीची शक्यता दाट असेल, कारण शहरात अनेक ठिकाणी तुम्ही वाहतूक कोंडी मध्ये अडकू शकता. शहराच्या वाहतूक अहवालानुसार इथे ५६ लाखांपेक्षा जास्त वाहनांची नोंदणी आहे. अशातच वाहतूक पोलिसांच्या निर्देशंकानुसार व्हाईटफील्ड,बीटीएम लेआऊट,सिल्कबोर्ड बेलंदूर या भागातील परिस्थिती दिवसेंदिवस अजून बिकट होत चाललेली आहे.

‘जिप गो’ बस एग्रीगेटर सारखे जिफी, लिफ्टो,ब्लाकार,ओला,उबेर हे शहरांची गरज बनत चालले आहे. याशिवाय युवर स्टोरीने जेव्हा साल २०१४ मध्ये ‘पूल सर्कल’ चे संस्थापक रघु रामानुजन यांच्याशी केलेल्या चर्चेत सांगितले की, एका कारमध्ये एकच नाही तर चार लोकांना प्रवास करवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारपूलिंग हा उत्तम पर्याय सध्या तेजीत सुरु आहे. प्राइस वॉटर हाऊस कूपर यांच्या अहवालानुसार जगभरात हा बाजार जवळजवळ १५ अब्ज डॉलर पर्यंत पोहचू शकेल.


image


२०१५ चे प्रवाशी :-

रघु सांगतात की, "२०१५ च्या दरम्यान ही बाजारपेठ ८ पटीने वाढली आहे. यामध्ये ८० टक्के ग्राहक हे बी२सी मधून येतात तर २०% ग्राहक हे कॉर्पोरेट क्षेत्रातील आहे. दररोज २० हजार लोक आमच्या या प्रवाशी योजनेचा लाभ घेऊन दररोज सरासरी १७ किलोमीटरचा पल्ला गाठतात’’.

आज ‘पूल सर्कल’ ची टीम अन्सर्ट अॅण्ड यंग च्या साथीने थर्ड पार्टीसाठी कार्बन फूटप्रिंट सर्टिफिकेशनच्या मंजुरीचे काम बघत आहे. कारपूलिंगचा पर्याय हा पर्यावरणासाठी किती पूरक आहे, तसेच रस्त्यांवर कारच्या कमी संख्येने प्रदूषणावर कितपत परिणाम झाला या मुळे हे निश्चित होण्यासाठी मदत होईल. ऑक्टोबर, २०१५ मध्ये बेंगळूरुच्या वाहतुकनियंत्रण पोलिसांच्या मदतीने केलेले कारपूलिंगच्या प्रमोशनानंतर ‘पूल सर्कल’ ने इलेक्ट्रॉनिक सिटी च्या गव्हर्निंग बॉडी ईएलसीआईए म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिटीज असोशिएशनच्या साथीने कामाला सुरवात केली. यामध्ये ७० कंपन्या आणि दुस-या संस्थानांच्या सदस्यांचा सहभाग आहे आणि यामध्ये जवळजवळ १ लाख ४० हजारपेक्षा जास्त लोक काम करतात. ज्यानंतर ईएलसीआईए साठी ‘पूल सर्कल’ च्या एका नेटवर्कने लोकांना प्रोत्साहित केले की येण्याजाण्यासाठी त्यांनी कार पूलिंगचा जास्तीत जास्त वापर करावा. अशा पद्धतीने ईएलसीआईएचा कोणताही सदस्य आपल्या कॉर्पोरेट ईमेल आईडीच्या नोंदणीद्वारे ही कारपुलिंगची सुविधा उपलब्ध करू शकतो.

‘पूल सर्कल’ च्या आपल्या भागीदारीबद्दल ईएलसीआईए चे सीईओ एनएस राम हे सांगतात की, त्यांनी एका मोठ्या कारपूलिंग समुदायाचा प्रारंभ केला जिथे सुरक्षा व भागीदारीला जास्त प्राधान्य दिले आहे. ते सांगतात या भागीदारीने इलेक्ट्रॉनिक सिटीच्या कार्यपूर्तीसाठी एका अशा जागेची निवड होईल जी स्मार्ट व पर्यावरण पूरक असेल. सामान्यतः ‘पूल सर्कल’ चा वापर हा ७५ टक्के ते लोक करतात जे आपल्या गरजा मापून याकडे वळले आहे. साडेचार हजार कारपूलिंगच्या भागीदारीचा दावा ही टीम निश्चयपूर्वक करते. रघु यांना वाटते की, सहयोगाने केलेल्या प्रवासाचे अनेक फायदे आहे तेच हे अधिक काळासाठी टॅक्सी एग्रीगेटर मॉडेलच्या एकदम विरुद्ध आहे. ‘पूल सर्कल’ ची टीम इनटेलीराइड तांत्रिक विकासाशी जोडली गेली आहे. या तांत्रिकीकरणाच्या वापराने कोणत्याही एका व्यक्तीचा मार्ग जाणून त्याला वेगवेगळे पर्याय सुचवले जातात. रघु सांगतात की प्रवास जोडीने करण्याचा मनोरथ फक्त प्रवास सुरु करून आपल्या गंतव्यापर्यंतच पोह्चण्यापेक्षा आपण किती दूर मिळून प्रवास करत आहोत हे महत्वाचे आहे.

‘पूल सर्कल’ साठी हा प्रवास तितका सरळ नव्हता. सन २०१४ च्या शेवटी चर्चासत्रानंतर गुंतवणूकदर हा कमी झाला. ही येणाऱ्या नवीन वर्षाची खराब सुरवात होती, पण टीमचा स्वतः वरचा विश्वास दृढ होता, तसेच ग्राहकांच्या स्नेहामुळे आम्ही पुढची वाटचाल करत राहिलो. टीमला या गोष्टीची जाणीव झाली की आपण बाजारात दोन्ही स्तरावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. टीमने हे हेरले की लोकांच्या आचरणात बदल घडवूनच आपण कारपूलिंगमध्ये यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी लोक एकमेकांकडे बघून आकर्षित होतील असा मार्ग निवडला पाहिजे. टीमने आपल्या विस्तारासाठी उपस्थित ग्राहकांकडून त्यांच्या माहितीदारांचे नाव घेतले जेणेकरून त्यांना पण योजनेचा लाभ मिळू शकेल. यामुळे त्यांच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली.

रघु सांगतात की, जेव्हा आपण कारपूलिंग करतो तेव्हा सामाजिक आणि पर्यावरणीय घटकांवर जास्त चर्चा करतो व आर्थिक बचतेला दृष्टीआड करतो, ज्याचा विचार करण्याची जास्त गरज आहे.

रघु सांगतात की," निश्चितच आपल्या विकासाचा आलेख वाढला असता जर आपण याकडे दुर्लक्ष केले नसते तर. आता आम्ही एका अशा योजनेवर काम करत आहोत जे मोबाईल वॉलेटशी संबंधित आहे आणि कोणतीही व्यक्ती विना खर्चाने ही सुविधा उपलब्ध करू शकते’’.

बी२सी ग्राहकांसाठी हे उत्पादन सध्यातरी मोफत आहे. पण पुढच्या तीन महिन्यात ‘पूल सर्कल’ प्रवाशांकडून तसेच प्रवास करणाऱ्यांकडून कमिशन पद्धतीने काही रक्कम लागू करणार आहे. पूल सर्कल हा अॅप एनरॉईड व आईसोएस मध्ये उपलब्ध आहे. उद्यमी तसेच बी२बी ग्राहकांसाठी सुरवातीला काही शुल्क आकारले जाते त्यानंतर मासिक शुल्क नियोजित केले जाणार आहे. तसेच त्यांना प्राप्त सेवा ही कमिशनच्या किंवा सदस्यत्व शुल्काच्या आधारावर निश्चित करण्याचा अधिकार हा संघटनेवर निर्भर करतो.

रघु सांगतात की,’’आमचे लक्ष हे ग्राहकांच्या संतुष्टीवर केंद्रित आहे. यासाठीच आम्ही ग्राहकांच्या आवडीला तसेच त्यांच्या गरजेला विचारात घेतो म्हणजे आपल्या उत्पादनाला योग्य दिशा मिळू शकेल’’. ‘पूल सर्कल’ मध्ये अनोळखी असूनही प्रवाशाचा कॉर्पोरेट ईमेल आईडी आपल्याला माहित असतो. याशिवाय अनेक प्रकारचे डाटा आहे ज्याच्या आधारावर रेटिंग सिस्टम आहे जी उपयोगकर्त्याची ओळख पडताळून पाहण्यासाठी मदत करते आणि यामध्ये कोणत्याही व्यक्तिगत व खाजगी माहितीचा खुलासा होत नाही.

‘पूल सर्कल’ त्यांच्या उपयोगकर्त्याला आपल्या आवडीचे कार पूलिंग करायचे स्वातंत्र्य देतो. यामध्ये कुणी आपल्या मित्रांबरोबर, शेजाऱ्यांबरोबर तसेच सामाजिक व व्यावसायिक संबंधाच्या आधारावर कारपूल करू शकतो. एवढेच नाही तर आपल्या आवडीनुसार कारपूल करू शकतो.

बेंगळूरुमध्ये राहणारे विनयकुमार नियमितपणे ‘पूल सर्कल’चा वापर करतात आणि त्यांच्या मतानुसार त्यांचा प्रवास नेहमीच आशादायी झाला आहे. हा मंच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच आहे. तसेच ओला यांना सुद्धा एकत्रित प्रवास करण्याचे मूल्य व विश्वास पटू लागला आहे, म्हणूनच ओला यांचे मार्केटींग निर्देशक आनंद सुब्रमण्यम सांगतात की ‘सामाजिक दृष्टीकोन विचारात घेऊन भागीदारातून केलेला प्रवास आपल्याला अश्या व्यक्तीबरोबर प्रवासाची संधी देतो ज्याच्या बरोबर आपण आनंद अनुभवू शकतो’.

‘पूल सर्कल’ ची योजना विभिन्न अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या लोकांना आपल्या या मंचाचा एक भाग बनविण्याची आहे. रघु सांगतात की अनेक अपार्टमेंट मध्ये रहाणारे लोक व्हॉटस् अप द्वारे एकमेकांशी जोडलेले असतात तसेच त्यांचा स्वतःचा एक कारपूल ग्रुप आहे. ‘पूल सर्कल’ची टीम ही प्रवाशांच्या सोयीसाठी विचारविनिमय करत आहे म्हणजे या सेवेला एकमेकांची मदत मिळून उपयोगकर्त्याच्या प्रवाशाचा खर्च कमी करू शकेल.

युवर स्टोरीच्या अनुमानानुसार मागच्या काही वर्षापासून हे निदर्शनास आले आहे की राईडिंग ओ,मीबड्डी,कारपूल आणि अड्डा ही सेवा पण या क्षेत्रात सक्रीय झाली आहे. एकत्रितपणे होणारा प्रवास तसेच टॅक्सी सेवा ही योजना सध्या तेजीत पुढे चालली आहे. जिव गो आणि दुसरी शटल बस सेवा पण या क्षेत्रात आपले पाय रोवत आहे, तर अशात हा मंच आपले अस्तित्व स्थापित करू शकेल का?. ‘पूल सर्कल’ ने बेंगळूरु वाहतूक पोलिसांशी तसेच ‘लिफ्ट ओ’ चे संस्थापक विकेश अग्रवाल यांच्या बरोबर टाययप केले आहे. विकेश सांगतात की मोटर व्हेईकल अॅक्ट १९८८ मध्ये कुठेच कारपूलिंग तसेच लिफ्टने प्रवास करण्याचा उल्लेख नाही. म्हणूनच या सुविधा बंद करण्याच्या कोणत्याच सूचना या अॅक्ट मध्ये नमूद नाही. तथापि या क्षेत्रात असे अनेक व्यावसायिक कार्यरत आहे, गरज आहे ती या बाजारात गुंतवणूकीची. ‘पूल सर्कल’ ने त्यांच्या अनेक प्रतिस्पर्धी खेळाडूंचा मुकाबला केला आहे. सध्या बाजारात त्यांचा जेमतेम जरी जम बसला असला तरी येणारा काळच अपेक्षित बदल घडवेल अशी त्यांना आशा आहे.

आणखी काही व्यावसायिक कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

२३ वर्षीय युवक हैद्राबादची वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या प्रयत्नात

प्रदुषणमुक्तीसाठी शाळकरी मुलांनी पंधरा दिवसांत तयार केली सौरऊर्जाधारित कार!

दिल्लीमधील सम विषम योजना ही पर्यावरणासाठी ठरू शकते एक वरदान

लेखिका : सिंधू कश्यप

अनुवाद : किरण ठाकरे

Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags