संपादने
Marathi

'रोडीज ते फुडीज्' कवनीत साहनी यांचा रंजक प्रवास

Team YS Marathi
30th Jan 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

आजकाल शेफ सुद्धा सेलिब्रिटींच्या यादीत मोडतात. टीव्ही शो, जाहिरात, पुस्तक प्रकाशन, ब्लॉग्स आदींवर या शेफ्सचा बोलबाला आहे. यापूर्वी पडद्याआड असणाऱ्या या शेफना एक वलय प्राप्त झालंय. अर्थात व्यवस्थापन क्षेत्रात एक नवी शाखा जोडली गेली ती म्हणजे कलाकारांच्या व्यवस्थापन कार्यक्रमाप्रमाणेच शेफ सेलिब्रिटी यांचं व्यवस्थापन.

कलीनरी कम्युनिकेशनच्या कवनीत साहनी या क्षेत्रात अग्रणी मानल्या जातात. त्या या शेफ्सच्या कल्पनांना भरारी देण्याचं काम करतात आणि त्यांच्या स्वयंपाकातील कौशल्याची दखल घेतली जाईल, याची व्यवस्था करतात. त्या सामान्यांनाही या शेफ्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. मास्टर शेफ विकास खन्ना यांना मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया सीजन ६ चे पाहुणे ज्युरी म्हणून जाण्याची संधी मिळाली ती कवनीत यांच्या प्रयत्नाने. भारतातून असा प्रयत्न करणाऱ्या त्या पहिल्याच. कवनीत यांनी ती संधी ओळखली आणि त्यांनी त्या शोच्या निर्मात्यांना ई-मेल्स पाठवले. अत्यंत लोकप्रिय अशा या शोमध्ये शेफ जॉर्ज कलम्बोरीस, गेरी मेहीगन आणि मेट प्रेस्टनसारख्या शेफ्ससोबत विकास हे पाहुणे ज्युरी म्हणून त्या सीजनला झळकले. ही वेळ योग्य होती आणि खाद्यपदार्थांच्या रहस्यांवर यापूर्वी कधीच न झालेली चर्चा प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.

image


"एकीकडे नायजेला लॉसन शोच्या प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस भर पडत होती तर दुसरीकडे या शो ने भारतीय प्रेक्षकांचा खाद्यपदार्थांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. सासू-सुनेच्या मालिकांव्यातिरिक्त सुद्धा भारतीय प्राईम टाईमवर मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया हा शो तितकाच प्रसिद्ध झाला आणि त्यातच विकास खन्ना यांचं पडद्यावर असणं हा दुग्धशर्करा योग होता." कवनीत त्या आठवणी सांगत होत्या. " शेफ विकास तर या शोच्या अनुभवाने शोच्या प्रेमात पडले. त्यांनी यापूर्वी न्यूयॉर्कमधल्या अनेक शोंमध्ये काम केलं होतं. पण हा अनुभव अत्यंत वेगळा असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाचं संपूर्ण लक्ष्य हे वाढलेलं ताट हे आकर्षक दिसायला हवं यावर होतं. दिग्दर्शक , निर्माते , आणि कॅमेरा मागचे तंत्रज्ञ यांनाही खाद्यपदार्थांची माहिती होती आणि ते फक्त त्याविषयीच बोलत असत. तिथे काम करताना जाणवलं ते म्हणजे उत्साह आणि शो अत्यंत लोकप्रिय असण्यामागचं कारण उमगलं." त्या सांगत होत्या .

मेलबर्नला प्रवास करताना विमानात कवनीत सहजच चर्चा करत असताना निरनिराळ्या उत्पादनांना, शेफ्सना आणि ग्राहकांनाही एकाच व्यासपीठावर कसं आणता येईल, यावर आडाखे बांधत होत्या. तेंव्हा शेफ विकास यांनीच अगदी त्यांच्या सहज शैलीत कवनीत यांच्या स्वप्नांना पंख दिले. ते म्हणाले ," तू तुझ्या कल्पना मांडतेयस. पण मला असं वाटतंय की आता या कल्पनांना मूर्त स्वरूप यायला हवं. मी तुझ्यासोबत आहेच, तू या उद्योगव्यवसायात बदल घडवू पाहतेयस आणि मला वाटतं की सगळेच शेफ तुला पाठींबा देतील." आणि असा आकारला गेला कवनीतचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ,'द गॉरमेट हाय स्ट्रिट'

पण हे सगळ इतकं सहज नव्हतं. अगदी काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मनात प्रचंड उलथापालथ सुरु होती. कवनित यांचा प्रवास सुरु झाला तो सीएनबीसी वृत्त वाहिनीतून ट्रेनी म्हणून. त्यानंतर त्यांनी मिडीटेकमध्ये नोकरी सुरु केली . स्टार वर्ल्डच्या चाईल्ड जिनियस आणि नॅॅशनल गेओग्राफीकमध्ये छत्तीसगढवर एक डॉक्युमेंटरी, एमटीव्ही रोडिजसारखे शोज त्या करत होत्या. "शोची सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना ४० दिवसांहून अधिक काळ माझा प्रवासात जात असे , आणि आमच्या क्रूसोबत तब्बल ४००० किलोमिटर इतका प्रवास मी केला. " कवनित आठवणी सांगत होत्या. " हा शो आयुष्य बदलून टाकणारा होता. भारतात पहिल्यांदाच, लाइव शोला सहा कॅमेरे रेकोर्ड करणार होते. एडीट रूममध्ये सुद्धा रघु राम यांच्या सोबत मी खूप काही शिकले. शोशी संबंधित अनेक निर्णय मी स्वत:हून घेत होते. म्हणजे कॅमेरे कुठे असायला हवेत. अचानक काही अपघात झाला तर काय करायचे ? आणि असेच बरेचसे. आम्ही सतत कामात असू आणि क्वचित घरी जात असू ." V या वाहिनीवर त्यांना विविध कलाकारांसमवेत काम करायला मिळालं. त्यांच्या व्हॅनीटी वॅनची देखरेख आणि असंच संबधित इतर कामं. इथे त्यांनी त्यांच्या कामाचा नवा चेहरा पहिला आणि हे काम नंतर त्यांना शेफ कलाकारांचं नियोजन करण्यात उपयोगी पडलं .

image


२००६ मध्ये कवनीतचं लग्न झाल. आपल्या लहानपणापासूनच्या प्रियकरासोबत आणि त्यांच्या आयुष्यातलं एक नव पर्व सुरु झालं. त्यांचे पती कायम त्यांच्या समवेत उभे राहिले, कवनीत म्हणतात ," मला काम द्या आणि मी बहरेन . माझ्यासमोरची आव्हानं नाहीशी केलीत तर मी नष्ट होईन." त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरचा लेबल आणि स्टेशनरी उत्पादनाचा व्यवसाय सांभाळायच ठरवलं. घरात नुसतं बसून रहाणं त्यांना पचनी पडणारं नव्हत. हा व्यवसाय त्यांच्यासाठी नवखा होता, पण शिकण्याची आवड असणाऱ्या कवनीत यांनी या व्यवसायातलं गमक आत्मसात केलं आणि व्यवसायाला नवं स्वरूप देऊ केलं. एका प्रदर्शनादरम्यान त्या त्यांची उत्पादन दाखवण्यासाठी स्वत: हजर होत्या. तेव्हा टार्सुस या लंडनमधल्या एका मीडिया हाउसनं त्यांना एका शोसाठी, त्यांच्या सोबत काम करण्यासाठी विचारणा केली, मात्र पैसे न देऊ करता ! ही संधी त्यांनी स्वीकारायची ठरवली, मात्र पैसे मिळणार नव्हते म्हणून त्या काहीश्या द्विधा मनस्थितीत होत्या. पण त्यांनी तो शो केला अगदी मनापासून. या शो नंतर टार्सुस कंपनीनं भारतातल्या एका आंतरराष्ट्रीय फूड आणि ड्रिंक शोसाठी राष्ट्रीय विक्री व्यवस्थापक म्हणून कवनीतची नेमणूक केली. फूड उद्यमासोबत काम करण्याचा कवनीत यांचा पहिला अनुभव. " इथे माझा अनेक आंतरराष्ट्रीय उत्पादकांशी, वितरकांशी, आणि आयातदारांशी संबंध आला आणि इथेच मला कुठेतरी जाणवलं की या उद्यमात खूप वाव आहे. शोच्या दुसऱ्या आवृत्तीची तयारी करत असतानाच आमच्या संचालकांनी बातमी दिली की त्यांनी हा शो एका नव्या गुंतवणूकदाराला विकला आणि आता कवनीतला नोकरी सोडावी लागणार आहे. " कवनीत सांगत होत्या. कवनीतच्या हातात कंपनीनं दिलेली सोडचिट्ठी होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. बाजारात ती या शोशी आता निगडीत नसल्याची बातमी पसरली होती. नव्या कंपनीशी बोलणी करण्याबाबत अनेक निर्देशकांना रुची नव्हती आणि त्यामुळे कंपनीनं त्यांना पुन्हा येण्यासाठी नमवलं. " रिचर्ड , या कंपनीच्या ऑस्ट्रेलिया प्रवर्तकाला कवनीतच्या कल्पना अतिशय आवडल्या. " फाईन फूड इंडिया या नावाचा नवा शो सुरु झाला. इथेच कवनीत नव्या शोच्या नवीन धोरणांवर काम करत होत्या. जसं की, शेफ्सबरोबर नव्या शिकवण्या, वाइन परीक्षण कार्यक्रम, चीज आणि वाइनसारखी उत्पादनं भारतीय स्वयंपाकात कशी वापरता येतील हे ग्राहकांना समजावणं.”

"रिचर्ड ऑस्ट्रेलियाला परत गेल्यावर मात्र, भारतीय व्यवस्थापनासोबत काम करणं मला अत्यंत जड जावू लागलं. माझ्या नवनव्या कल्पना ज्यामुळे शो प्रसिद्ध होत होता त्यांना आवडेनाश्या झाल्या." त्या सांगत होत्या. 

" मी डोळ्यांवर काळी झापडं बांधलेला घोडा आहे, विचलित न होता माझ्या ध्येयापर्यंत मला पोहचायचं आहे."

आणि मग २०१३ मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि कलिनरी कम्युनिकेशनची स्थापना केली. कारण त्यांना यांच्या संकल्पना मांडायच्या होत्या ज्या ग्राहकांसाठी, उत्पादकांसाठी आणि उद्यमासाठी योग्य असतील. " मला शेफ्सना एक व्यासपीठ मिळवून द्यायचं होतं. जिथे पडद्यामागे असणारे हे कलाकार लोकांना ओळखीचे होतील. तुमच्या पानात वाढलं गेलेले अन्न हे अगदी परिपूर्ण असावं यासाठी शेफ्स अहोरात्र मेहनत करतात. त्यांना मला त्यांचा योग्य सन्मान मिळवून द्यायचा होता. " कवनीत सांगत होत्या. त्या छोटे-छोटे कार्यक्रम सुद्धा या दृष्टिनं आयोजित करतात. " आम्ही गेल्या ऑगस्ट महिन्यात तीनच दिवसात एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला खास करून व्यवसाय उद्यमातील मंडळींसाठी. ज्यामध्ये हॉटेल व्यावसायिक होते, विविध कंपन्यांचे संचालक होते,शेफ्स होते आणि त्यांच्यासाठी पक्वान्न बनवले ते खास ऑस्ट्रेलियावरून आलेल्या शेफ जॉर्ज कालोम्बरीस यांनी." आमंत्रितांपैकी सर्व पाहुणे हजर होते आणि तेही अगदी अत्यल्प वेळात त्यांना निमंत्रण देऊनही आणि या कार्यक्रमामुळे शेफ्सच्या उद्यमाचा दर्जाही कितीतरी उच्च पटीने वाढवल्याचा लौकिक त्यांना प्राप्त झाला.

image


" शेफ विकास खन्ना, मनीष मेहरोत्रा, अमृता रायचंद, सारा टोड, सारांश गोइला आदींसारखे नावाजलेले शेफ यांच्या सहकार्याने मला आता ग्राहकांना त्यांच्या शेफ्सशी थेट भेट घडवून आणायची होती. लोकांना स्वयंपाकाबाबत अधिक माहिती पुरवायची होती. त्यांच्या स्वयंपाकातील रुची मला वाढवायची होती. " कवनीतनं आपला दृष्टीकोन स्पष्ट केला. " मला असा वाटतं की खाद्यपदार्थ ही तंत्रद्यानाच्या मदतीने विकण्याची गोष्ट नाही. जोवर मी त्या पदार्थाला हात लावत नाही, त्याची चव घेत नाही तोवर मी ती विकत घेऊ शकत नाही. उत्पादक आणि ग्राहकांमधल अंतर कमी करण्यासाठी मी गॉरमेट हाय स्ट्रिट हा कार्यक्रम आखला. ज्याच्या दोन आवृत्ती झाल्या. त्या म्हणतात ," बऱ्याचदा ग्राहकांना आकर्षक वेष्टणातील खाद्यपदार्थ चाखून बघण्याची सोय नसते किंवा वेबसाइट वर नोंदणीकृत असणारे पदार्थ घरी आल्याशिवाय आपण खाऊ शकत नाही. त्यामुळेच या 'गॉरमेट फूड ' या शो दरम्यान ग्राहक त्या पदार्थांची चव घेऊ शकतात आणि उत्पादन अत्यंत सवलतीच्या दरात घरी घेऊन जाऊ शकतात . स्वयंपाकासंबंधी असणारी भीती आम्हाला दूर करायची आहे. संजीव कपूर , सारांश गोईला किंवा मनीष मेहरोत्रा सारखे शेफ्स इथे नानविध पदार्थ बनवतात आणि तुम्हालाही त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळते. वाईन मास्टर प्रशिक्षण आम्ही देतो ज्यामुळे अनेकांना वाइन आणि चीजच्या संगतीची माहिती मिळते जी अन्यथा फक्त काही विशेष निमंत्रितांसाठी उपलब्ध असते . टीआयईच्या सहकार्याने अनेक शेफ्सच्या आयुष्य पालटणाऱ्या रंजक कहाण्यासुद्धा प्रेक्षकांना ऐकायला मिळतात, ज्यात त्यांच्या कुकिंग आणि बेकिंगच्या आवडीबद्द्ल आणि करियर बद्दल ऐकायला मिळतं. अन्य कुकरी कार्यक्रमांमध्ये हॉटेल्स सहभागी होतात पण आमच्याकडे मात्र काही विशेष उपहारगृह सामील होतात जसे कि सारा टोड यांचं 'आन्त्रेस' आणि ले मेरिडियनच 'ला रिवियारा ' " त्या सांगत होत्या .

कवनीत यांना आता मुंबई आणि बेंगळूरू या ठिकाणी विस्तार करायचा आहे. त्यांना किंग मेकर असं म्हटल तर अतिशयोक्ती होणार नाही कारण त्यांनी भारतात एका नव्या व्यवसायाला सुरुवात केली. शेफ्सचं नियोजन आणि नव्या नोकरीच्या संधी !


लेखक : इंद्रजित चौधरी

अनुवाद : प्रेरणा भराडे

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags