संपादने
Marathi

धोका असलेल्या कासवांच्या रक्षणासाठी ओरिसामध्ये भारतीय तटरक्षकांनी राबविले ‘ऑपरेशन ऑलिवा’!

Team YS Marathi
14th Feb 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

भारतीय तटरक्षकांनी अलिकडेच ओरिसामध्येऑपरेशन ऑलिवा राबविले, याचा हेतू होता दुर्मिळ प्रजाती असलेल्या ओलिव रिडले कासवांना जीवदान देणे, त्यांच्या प्रजननाच्या काळात त्याच्या शिकारीला पायबंद घालून हे अभियान राबविण्यात आले. 


Image source: First News Hawk

Image source: First News Hawk


या बचाव अभियानात तीन महत्वाच्या ठिकाणी जेथे ही कासवे अंडी घालतात, लक्ष देण्यात आले. घारीयामाथा मरिन सेंचूरी, देवी नदीच्या मुखात, आणि ऋषीकुल्या बिच ही तीन ठिकाणे आहेत. वन विभाग आणि तटरक्षक दल यांच्या या संयुक्त उपक्रमातून चोविस तास बेकायदा शिकारीवर आळा घालण्यात आला आणि तस्करी करणारे तसेच विक्री करणारे लोक यांना दूर ठेवण्यात आले जेथे मोठ्या प्रमाणात ही कासवे अंडी घालण्यासाठी येत असतात. कासवांच्या अंडी घालण्याच्या हंगामाच्या समाप्ती पर्यत ही गस्त चालूच राहणार आहे.

याबाबतच्या वृत्तानुसार, ओरिसा येथील तटरक्षक दलाचे उप महासंचालक संजीव दिवान म्हणाले की, “ सुमारे ४० बोटींना पकडण्यात आले असून प्रतिबंधित समुद्रातून कासवांची वाहतूक करताना त्याना अटकाव करण्यात आला आहे. त्यात सुमारे २५० मच्छिमारांना पकडण्यात आले आहे. पकडलेल्या मच्छिमाराना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे, त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत. मागील सप्ताहात देखील १९६ मच्छिमारांना पकडण्यात आले, त्यांच्या कडून २४ बोटी जप्त करण्यात आल्या.”

तटरक्षक दलाची विमाने देखील या अभियानात सहभागी झाली आहेत, घारियामाथा येथील बेकायदा मच्छिमारी करणा-यांवर ते नजर ठेवत असतात. या शिवाय, मच्छिमारंशी संवाद करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे, त्यांना कल्पना देण्यात येत आहे की, ही मोहिम का राबविली जात आहे आणि परिस्थिती काय आहे. याबाबत सांगताना दिवान म्हणाले की, “ गस्त घालण्याचे अभियान मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आले आहे कारण कासवांच्या प्रजननाच्या काळात त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जात आहे. त्यांच्या या काळात केलेल्या शिकारीमुळे त्यांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.”

भारतीय तटरक्षक दलाच्या सक्रीयतेमुळे ऑपरेशन ऑलिवा यशस्वी होत आहे, त्यातून भारतीय समुद्राचे वैभव असलेल्या अनेक दुर्मिळ कासव प्रजातीचे रक्षण केले जात आहे.

THINK CHANGE INDIA

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags