'फासोज'द्वारे ग्राहकांना झटपट सात्विक खाण्याचे पर्याय उपलब्ध

'फासोज'द्वारे ग्राहकांना झटपट सात्विक खाण्याचे पर्याय उपलब्ध

Wednesday October 28, 2015,

3 min Read

'फासोज' हा शब्द प्रचलित होण्याआधीपासून तो एक फूड टेकचा व्यवसाय होता. २००३ मध्ये ,जयदीप बर्मन ,ह्या आय. आय. एम.-लखनौच्या माजी विद्यार्थ्याने फासो'ज् हे पुण्यामधील क्यू. एस. आर. (जलदसेवा उपहारगृह) मॉडेल सुरू केले. भारतातल्या शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणावर, दुकानातून ग्राहकांना झटपट आणि सात्विक असे खाण्याचे पर्याय उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश होता. ‘सेक़ूआ कॅपिटल” ह्या कंपनीने फासो'ज् ला पाठींबा दिला आणि दहा वर्षातच फासोज् 'ची ५० दुकाने झाली. आणि पुढे उतरोत्तर वाढच होत गेली.

image


फूड- टेकचा जन्म

२०१५ पासून अन्न तंत्रज्ञान हे क्षेत्र अधिकाधिक विकसित होऊ लागले आणि गुंतवणूकदारांना त्यात मोठ्ठ्या प्रमाणात रस वाटू लागला. मुन्चेरी आणि स्प्रिंग या कंपनींच्या प्रचंड प्रमाणातील पाश्चिमात्य गुंतवणुकीनंतर, भारतातही ग्राहकांना झटपट खाद्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या 'टिन्योवेल' अॅपची मुंबईत झपाट्याने वाढ होऊ लागली. 'स्वीगी' आॅनलाईन सेवेलाही बंगलोरमध्ये नवीनच दिशा मिळाली. विविध कंपन्यांच्या जेवण बनवण्याच्या विविध योजना, पोषक आहार पद्धती, उपहार गृहापासून घरपोच सेवा, झटपट जेवण बनवायच्या पद्धती आणि अशा बऱ्याच सुविधा उपलब्ध झाल्या.

जोमॅटोने, जेवणाची घरपोच सेवा- जोमॅटो-ऑर्डर हे वेगळं अॅपलीकेशन सुरु केलं आणि त्त्यांची नव्याने वाटचाल सुरु झाली. त्यांची घोडदौड ग्राहकांपासून उपहारगृहापर्यंत तर झालीच आणि त्यांचे स्वतंत्र असे संपर्काचे साधनही निर्माण झाले. 

फासो'ज् ने, लाईटबॉक्स तर्फे वीस लक्ष डॉलरचा निधी जमा करून आपले प्रयत्न द्विगुणीत केले आणि कामाच्या कक्षा रुंदावल्या.

नवीन दिशा

फासोजने आपल्या व्यवसायवृद्धीसाठी तंत्रज्ञानावर जोर दिला. कदाचित हीच भारतातील अशी पहिली संस्था आहे की, जिथे ट्विटरवर जेवणाची ऑर्डर घेण्यास सुरुवात झाली. फासोजचे स्वतःचे कॉल सेंटर आहे जिथे जेवणाची ऑर्डर घेतली जाते आणि आता तर त्यांची स्वतःची अशी एक स्वतंत्र अॅपलीकेशनच आहे.

हे अॅप आतापर्यंत आठ लक्ष ग्राहकांनी डाउनलोड केले आहे. आणि अल्पावधीतच ही संख्या दशलक्ष होईल अशी आशा असल्याचे जयदीप सांगतात. “त्यांची कंपनी दिवसाला, बारा हजारापेक्षाही जास्त ऑर्डर घेते. मागील महिन्यातच त्यांनी आठ लाख पदार्थांचा खप केला. ९०% पेक्षा जास्त ऑर्डर ह्या अॅपद्वारे फासोज् ला येतात आणि लवकरच कंपनी त्यांची वेबसाईट बंद करणार आहे.

image


जयदीप सांगतात की ,फासोज्'ची सगळ्यात मोठ्ठी प्रगती म्हणजे अन्नपदार्थांची विविधता आणि पदार्थांच्या संख्येमध्ये सातत्याने होणारी वाढ . सहा महिन्यांपूर्वी वेगवेगळ्या खाण्याच्या वेळा गृहीत धरून न्याहारी, दुपारचे जेवण,रात्रीचे जेवण आणि अल्पोपहार देण्यास सुरुवात झाली आणि न्याहारीची परीक्षा चाचणी करण्यात आली. आणि त्यात भरघोस यश प्राप्त झाले. पुढे प्रोत्साहीत होऊन ही योजना अखंड राबवली. फासोज्'ने विक्रेत्यांच्या मदतीने स्थानिक विविधता तर पुरविलीच पण त्यात आपल्या नाविन्यपूर्ण पदार्थानाही समाविष्ट केले. उदारणार्थ , फासोज्'ने हैद्राबाद मध्ये आपल्या ऑनलाईन अॅपलीकेशन वर उत्तम बिर्याणी तयार करणाऱ्यांनाही जोडून घेतले. तसेच चेन्नाईमध्ये 'चेट्टीनाड मसाला डोसा पोहोचवण्याची सोय केली.

जयदीप यांनी हेही सांगितले की, ‘नेटफिक्स किंवा अॅमेझॉनच्या मुखपृष्टावर त्यांच्या मेनूचा विचार होऊ शकतो, प्रत्येक माणसाला हवा असणारा विशिष्ट मेनू बनवून तो मुखपृष्टावर झळकवणेही त्यांना शक्य होईल. फासो’ ज् आपली विक्रीची साखळी अशा प्रकारे वाढवत आहे की मोबाइल अॅपवर त्यांचे स्वतःचे असे एक स्वयंपाक घरच तयार होईल."


फासोज् ची सेवा ही गुरगाव, दिल्ली, हैदराबाद, पुणे, मुंबई, चेन्नाई, बंगलोर, इंदूर, अहमदाबाद आणि बडोदा ह्या १० शहरात उपलब्ध आहे. ही सेवा आणखी १५ शहरातून कार्यरत करण्याची त्यांची योजना आहे.


image


फासोज् यावर्षी १२० कोटीपेक्षाही अधिक वार्षिक उत्त्पन्न करण्याच्या मार्गावर आहे. फासोज् मध्ये १५०० कर्मचारी कार्यरत आहे. यामध्ये अर्धवेळ काम करणाऱ्या आणि सामान वाहकांचाही समावेश आहे. अशी भक्कम टीम फासोज् बरोबर कार्यरत असल्याचे जयदीप अभिमानाने सांगतात.

"ग्राहकांना जलदगतीने सेवा देणारे फारच उत्तम असे अॅपलीकेशन आमच्याकडे आहे." जयदीप सांगतात. पुढे ते हेही सांगतात की, " यापुढे फूड पांडा, टिन्योवेल, स्वीग्गी आणि इंटरनेट किचन ह्यांचाही समुह या बाजारात असणार आहे. आम्ही काहीतरी नाविण्यपूर्ण योजनांचा विस्तार करणार आहोत. आम्ही स्थानिकांना मागणी नुसार जलदगतीने अन्नपुरवठा करणार आहोत. जिथे ऑर्डर्सपासून, जेवण बनविणे आणि बटवड्यापर्यंत सगळेच नियंत्रित केले जाईल. तुमचे खाजगी स्वयंपाक घर हे आमच्या अॅपलिकेशन मध्ये असेल. दशकापेक्षाही अधिक काळ मी फासोज मध्ये कार्यरत असल्याने बहुमूल्य असा अनुभव मला मिळाला आहे. 'ओला' ही कंपनी, अन्न पुरवठयाच्या व्यवसायामध्ये आल्यापासून बऱ्याच लाॅजिस्टीक संस्थाना निधी मिळत आहे, अन्न तंत्रज्ञान शाखाही विस्तारीत होत आहे. त्याचबरोबर बाजारपेठेत फासो’ज् ला स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळाली आहे”.