संपादने
Marathi

'ग्रे वॉटर' – स्वच्छ पाण्याची चळवळ

तुमचे पाणी वाचवणारी संस्था

D. Onkar
25th Aug 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आयआयटी रुरकीमधून पदवी पूर्ण केल्यानंतर अरुण दुबे यांनी औषध कंपनीत नोकरीला सुरुवात केली. सर्वसामान्य औषधांसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं काम त्यांच्याकडे होतं. या काळात एकपेशीय वनस्पतींपासून बायो डिझेल करण्याच्या एका विशेष प्रकल्पाशी त्यांची भेट झाली. हा प्रकल्प करताना क्लीन टेक्नॉलजी ( स्वच्छ तंत्रज्ञान) या संकल्पनेशी दुबे यांचा पहिल्यांदा संबंध आला. हा एक व्यापक व्यवसाय आहे याची जाणीव त्यांना यावेळी झाली. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्यानंतर दुबे यांनी McKinsey & Co. सोबत काही काळ काम केलं. या कंपनीचा बड्या सोलार कंपनींशी संबंध होता. ‘‘ या कंपनीत काम करत असतानाच मला वनस्पतीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची कल्पना सुचली ’’, असं दुबे सांगतात.

अरुण दुबे

अरुण दुबे


भारतामधल्या शहरी वनस्पतींसाठी ही संकल्पना महत्वाची असल्याचं दुबे यांनी ओळखलं. आपली ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दुबे यांनी ऑक्टोबर २०१० साली नेक्सेस व्हेंचर पार्टनरच्या ग्रे वॉटर प्रकल्पासोबत काम करण्यास सुरुवात केली. आज ते या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीची व्यवसाय वृद्धी, अर्थकारण आणि रणणिती हे तीन विभाग दुबे सांभाळतात.

सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणारे स्वयंचलित प्लग आणि उत्पादन ग्रे वॉटरनं तयार केली आहेत. या उत्पादनाचा खर्चही कमी असून ती अधिक विश्वसनीय आहेत. ‘’ आपल्या देशाचं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढतंय. या सर्वांना सुविधा पुरवण्यासाठी महापालिका यंत्रणेवर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीमध्ये आमची उत्पादन ही काळाची गरज आहे. आम्ही वनस्पतीच्या सांडपाण्यावर केवळ प्रक्रिया करत नाही. तर त्याचा वेगवेगळ्या प्रकल्पात पुनर्वापर करण्यास मदत करतो. तसंच ही सेवा दहापट स्वस्त दरामध्ये ग्राहकांना पुरवली जाते ’’ असं दुबे सांगतात.

उद्योग क्षेत्रामध्ये काम करण्याचा मोठा अनुभव असलेली अनेक दिग्गज मंडळी ग्रे वॉटरशी जोडली गेलेली आहेत. ही सर्व मंडळी अनुभवी तर आहेतच त्याशिवाय ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करण्यासाठीही ओळखली जातात. श्री सुनिल तुपे ( सीईओ), श्री राजेश नायर ( संचालक, सेल्स), श्री सचिन परदेशी ( ऑपरेशन विभाग प्रमुख) अशी तीन दिग्गज मंडळी ‘ग्रे वॉटर’ शी जोडली गेलेली आहेत.या सर्वांचा एकत्रित अनुभव तब्बल १०८ वर्ष आहे.

‘’ आमची उत्पादन ही पूर्णपणे स्वयंचलित आहेत, त्यांचा पुनर्वापर होऊ शकतो, सर्व प्रकारच्या पाण्यासाठी त्याचा वापर करता येतो, तसंच देशातल्या सर्व पर्यावरणवादी मंडळांनी त्याला मान्यता दिलेली आहे ’’, असं दुबे सांगतात.

‘’आमच्या उत्पादनामुळे विजेची ५० टक्के बचत होते. तसंच याचा देखभालीचा खर्चही ५० टक्के कमी आहे ’’, असा दावा दुबे करतात. GREWA-RS ही आमची यंत्रणा बदलता भार देखील हाताळू शकते. भारतामधल्या अशा प्रकारच्या अन्य कोणत्याही उत्पादनात ही क्षमता नाही, असं दुबे यांनी सांगितलं.

‘’आपल्या समाजातील अनेकांचा या विषयाकडे बघण्याचा परंपरागत दृष्टीकोण ग्रे वॉटरसाठी अडथळा होता. अनेकदा केवळ व्यवसायासाठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एसटीपी प्रकल्पाची दर्शनी भिंत उभारली जाते ’’, असा अनुभव दुबे यांनी सांगितला. मात्र आता नियमाच्या अंमलबजावणीमुळे ही परिस्थिती हळू हळू बदलत चाललीय. तसंच स्वच्छ पाण्याची कमतरता आणि त्याची वाढलेली किंमत हे देखील परिस्थिती बदलण्याचं कारण असल्याचं दुबे स्पष्ट करतात.

ग्रे वॉटर प्रकल्पाचे छायाचित्र

ग्रे वॉटर प्रकल्पाचे छायाचित्र


कॆंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ( सीपीसीबी) च्या माहितीनुसार देशातल्या प्रमुख महानगरांमध्ये केवळ ३२ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते.त्यानंतरच्या शहरांच्या गटामध्ये हे प्रमाण केवळ ९ टक्के आहे. २०१८ पर्यंत दररोज २४ दशलक्ष लिटर सांडपाणी वाया जाईल असा अंदाज आहे. शहराची स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणासाठी ही एक गंभीर समस्या असेल. यामुळे शहरात साथीचे रोग पसरण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी एसटीपी प्रकल्पाचा देशभर प्रसार होण्याची आवश्यकता आहे.

या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ग्रे वॉटर तंत्रज्ञान आवश्यक आहे असं दुबे सांगतात, ‘’ आमच्या अभियंत्यांनी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन ही प्रणाली विकसीत केली आहे. शहरातल्या अनेक इमारतींमध्ये आढळणा-या डिझेल जनरेटरप्रमाणेच ग्रे वॉटरचे यंत्र दिसते. पण याचा कोणताही आवाज होत नाही तसेच वासही येत नाही. या यंत्राची उभारणी होऊन ते कार्यान्वित होण्यास २ ते ३ आठवड्यांचा कालावधी लागतो ‘’

ग्रे वॉटर प्रकल्पाचे छायाचित्र

ग्रे वॉटर प्रकल्पाचे छायाचित्र


‘’ या वर्षी NETEL ( नेटेल ) इंडिया या कंपनीनं ग्रे वॉटरशी भागिदारी केली आहे. पर्यावरणाची उत्पादने आणि सेवा प्रदान करणारी नेटेल ही भारतीय बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आहे. त्यांचा बाजारपेठेतला रिच चांगला आहे. तर आमची उत्पादनं सर्वोत्तम आहेत. त्यामुळे दोन्ही कंपन्यांना याचा उपयोग होतो. तसंच आमची उद्दीष्टंही परस्परपुरक असल्यानं नेटेल कंपनीला विशिष्ट वर्गात आमच्या उत्पादनाचा प्रचार करणं शक्य होतं’’ असं दुबे यांनी सांगितलं.

‘’ सामान्यपणे एसटीपीची उत्पादनं छोट्या कंपनीला वितरीत केली जातात. याची रचना ग्राहकांच्या गरजेनुसार बनवली जाते. परंतु योग्य माध्यमातून निश्चित मानक ( स्टॅँडर्ड ) उत्पादनाची विक्री करण्याचा आमच्या कंपनीचे ध्येय आहे. नेटेल कंपनी आमच्या ( GREWA- RS) स्टॅँडर्ड उत्पादनाची ग्राहकांपर्यंत मार्केटिंग करते. त्याचा देशभरात आम्हाला मोठा फायदा होत आहे. ही भागीदारी दोन्ही कंपन्यासाठी फायदेशीर आहे ,’’ असं दुबे यांनी स्पष्ट केलं.

या भागिदारीनंतर मोठ्या ग्राहकांची कंत्राटं मिळवण्यात ग्रे वॉटरला यश आलंय. डेल, क्लब महिंद्रा,बीपीसीएल आणि वाधवा बिल्डर्स यासारख्या मोठ्या उद्योग प्रकल्पांचं काम आता ग्रे वॉटरकडे आहे.

देशातल्या सर्वच प्रमुख महानगरांमध्ये पाण्याची उपलब्धता तसंच त्याच्यावर होणारी प्रक्रिया ही मुख्य समस्या आहे. महानगरांमधली ( तसंच ग्रामीण भागातील) ही समस्या ओळखून या वर्गाच्या गरजा पूर्ण करण्याचं ध्येय ग्रे वॉटरपुढे आहे. या कंपनीसमोर आगामी काळ मोठा आव्हानात्मक असेल. पण ते हे आव्हान पेलण्यास निश्चितच सक्षम आहेत.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags