संपादने
Marathi

सेकंडहँड वाहनांचे सर्वोत्तम ठिकाण ʻबाइकर्सहायवेʼ

Ranjita Parab
28th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

एखाद्या सर्वसामान्य गृहिणीने किवा स्त्रीने मनात आणलं तर पुरुषी मक्तेदारी असलेल्या कुठल्याही क्षेत्रात ती आपले वर्चस्व गाजवू शकते. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे चित्रा बॅनर्जी. उत्तर ओडिशामधील विद्यापीठातील इकॉनॉमिक्स ऑनर्सची विद्यार्थिनी असलेल्या चित्राने आयुष्यात अशी प्रगती केली की, त्याबद्दल वाचताना आपल्याला चित्राबद्दल गर्व वाटल्याशिवाय राहत नाही. विकास कुमार बॅनर्जी यांच्या पत्नी चित्रा घरगृहस्थीमध्ये रमलेल्या एक सर्वसामान्य गृहिणी होत्या. मात्र त्यांचा आता स्वतःचा व्यवसाय आहे. चित्रा यांच्या या कहाणीची सुरुवात २०१३ मध्ये झाली. एके दिवशी संध्याकाळी कॉफी पित असताना एका मुलीला सेकंड हॅंड दुचाकी विकत घेताना किती अडचणींचा सामना करावा लागतो, या विषयावर त्या आपल्या पतीसोबत चर्चा करत होत्या. या चर्चेअंती मल्टी ब्रॅंड प्रमाणित दुचाकी वाहनांचे ऑनलाईन शोरुम ʻबाइकर्सहायवेʼची निर्मिती करण्याच्या निष्कर्षावर त्या आल्या. चित्रा सांगतात की, ʻआजकाल लोक भाजीपालादेखील ऑनलाईन विकत घेतात. लोकांना वापरलेल्या वस्तू (सेकंड हॅंड) खरेदी करण्यात अडचणी येतात. कारण वापरलेल्या वस्तूंचा बाजार भारतामध्ये असंघटीत आहे. आम्ही वापरलेली प्रमाणित दुचाकी वाहने हमीसह (वॉरंटी) आणि घरपोच मोफत पोहोचवण्याच्या सोयीसहीत विकण्याचा विचार केला. भरपूर अभ्यास केल्यानंतर आम्ही पुण्यात या कामाचा श्रीगणेशा केला.ʼ चित्रा यांनी सांगितले की, ʻपुण्यामध्ये कोणीही व्यक्ती अशी सापडणार नाही जी गुणवत्तेबाबत जागरुक असण्यासोबतच हमी आणि मोफत सेवा देईल. चारचाकी वाहनांच्या बाबतीत या मागण्या पूर्ण केल्या जातात.ʼ ʻबाइकर्सहायवेʼने नोव्हेंबर २०१३ ते नोव्हेंबर २०१४ या एका वर्षात ४२६ दुचाकी गाड्यांची विक्री केली आहे.

जास्तीत जास्त ग्राहक ओएलएक्स, क्विकर आणि बाईकवाले या संकेतस्थळांवर सेकंडहॅंड दुचाकी गाड्यांचा शोध घेतात. त्यानंतर फोन करुन विक्रेत्याकडून या दुचाकींची जास्त माहिती घेतात. ग्राहकांना दुचाकी खरेदी करण्यासाठी जास्त लांब प्रवासदेखील करावा लागू शकतो. सेकंडहॅंड दुचाकी गाड्या विकल्यानंतर विक्रेता किंवा डिलर या गाड्यांची कोणतीही हमी घेत नाहीत. किंवा विक्रीनंतर कोणतीही मोफत सेवा देत नाहीत. त्यामुळे अशा मागण्यांची पूर्तता करणे, हे चित्रा, त्यांचे पती विकास आणि दहा जणांच्या टिमसाठी नक्कीच सोपे नव्हते. चित्रा सांगतात की, ʻलोकांना ʻबाइकर्सहायवेʼवरुन वाहन खरेदी केल्यानंतर गर्व वाटायला हवा, अशी सेवा देण्याची आमची अपेक्षा होती. ग्राहकांना घरबसल्या हमी आणि मोफत सेवेसोबत चांगली सेकंडहॅंड दुचाकी खरेदी करता यावी, अशी आमची इच्छा होती.ʼ त्या सांगतात की, ʻआम्ही ग्राहकांच्या घराजवळ वाहन नेऊन त्यांना टेस्ट ड्राईव्हची संधी देतो. त्यामुळे त्यांना सेकंडहॅंड वाहन खरेदी करण्यासाठी आता लांबच्या लांब प्रवास करावा लागत नाही.ʼ सुरुवातीला हेच काम त्यांना एखाद्या दलालच्या कामाप्रमाणे वाटले. मात्र हे चित्र फार काळ दिसले नाही. त्यानंतर चित्रा यांनी स्वतः वाहनांची खरेदी केली. त्यांचे नुतनीकरण आणि त्यांच्यात सुधारणा केल्यावर त्या वाहनांची विक्री केली. या वाहनांच्या नुतनीकरणाचा खर्च बाहेरील दुकानातून केल्यास जास्त होत होता. त्यामुळे चित्रा यांनी डिसेंबर २०१४ साली आपले स्वतःचे सर्विस सेंटर सुरु केले.

image


विकास याबाबत बोलताना सांगतात की, ʻआम्ही पैसे जमविण्यास सुरुवात केली. आम्ही तीन लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून ही योजना सुरू केली होती आणि आज आमची बचत २० लाख रुपये एवढी आहे.ʼ याशिवाय आता त्यांना एचएनआय ( हाय-नेट-वर्थ इंडिविजुअल्स )गुंतवणुकदारदेखील मिळाला आहे. जो येणाऱ्या कालावधीत त्यांच्या व्यवसायात ५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करणार आहे. शिवाय काही काळानंतर तो त्या गुंतवणुकीच्या रक्कमेत वाढदेखील करणार आहे. वाहनांच्या उद्योगात जिगव्हिल्स, कारदेखो, कारवाले, क्षरट्रेड यांसारखे प्रतिस्पर्धी असल्याने बरीच स्पर्धा आहे. मात्र या सर्वांचे लक्ष बहूतेक करुन चारचाकी वाहनांवर आहे. ओएलएक्स आणि क्विकर यांच्याशी थेट स्पर्धा असल्याचे चित्रा सांगतात. चित्रा यांच्या या व्यवसायाप्रति असलेल्या निष्ठेने विकास यांना आपसूकच या व्यवसायाशी जोडले आहे. त्यांनी आता एजंट, कॉल सेंटर कार्यकर्ता आणि तांत्रिक अधिकारी यांच्यासोबत आपला एक संघ बनविला आहे. सध्या चित्रा आणि विकास यांचा व्यवसाय फक्त पुण्यापुरताच मर्यादित आहे. मात्र लवकरच तो मुंबई आणि बंगळूरूमध्ये विस्तारीत केला जाईल, अशी योजना असल्याचे चित्रा यांनी सांगितले.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags