संपादने
Marathi

मानवी जीवनाला मौलिकता मिळवून देणारी मालती

एका संघर्षाची यशोगाथा

8th Sep 2015
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

देणाऱ्याने देत जावे .. घेणाऱ्याने घेत जावे ... घेणाऱ्याने घेता घेता .... देणाऱ्याचे हात घ्यावे... विंदांच्या या ओळी मालती भोजवानीच्या आयुष्याला अचूक लागू पडतात. इतरांना त्यांच्यातील सुप्त गुणांची ओळख करून देणारी मालती ही लाईफ कोच आणि सात्विक आयुष्याचे धडे शिकवणारी प्रशिक्षक आहे. आपत्तींवर मात करून त्याचे संधीत रुपांतर कसे करायचे याचे उदाहरण म्हणजे तिचे आयुष्य. संकटे, नुकसान, संघर्ष आणि यश यांनी तिच्या आयुष्याची गोष्ट भरलेली आहे. व्यक्तिगत समस्यांवर मात करत मालतीने इंडोनेशिया मध्ये इंग्रजी शिक्षक म्हणून सुरुवात केली सोबतच फॅशन डिझाईन आणि रत्नशास्त्राचं सूद्धा शिक्षण घेतलं. त्यानंतर मालती तिच्या कौटुंबिक व्यवसायात सहभाग झाली. जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा तिनेही तिच्या सुखी संसाराची स्वप्ना रंगवली होती. पण आयुष्याने एक वेगळ वळण घेतलं, तीचं वैवाहिक आयुष्य फार काळ टिकू शकलं नाही आणि वयाच्या २६ व्या वर्षी ती तिच्या नवऱ्यापासून वेगळी झाली, सोबत तिच्या लहान मुलीची जबाबदारीही तिनेच उचलली. ती सांगते “ "मी पहिल्यांदा टोनी रोबिन्स यांच्या व्यक्ती विकास कार्यक्रमात सहभागी झाले जिथे आम्हाला जळत्या कोळश्यावरुन चालायला सांगण्यात आले. मी HPM (Human Potential Movement) शाखा असलेले intensive LGAT (Large Group Awareness Training) सुद्धा पूर्ण केलं. यामुळे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला मी शिकले आणि स्वतःविषयी अनुकंपा वाटणं आणि स्वतःला लाचार समजणं सोडून दिलं. एका प्रशिक्षकाची भूमिका किती प्रेरणादायी असते ते इथे मी अनुभवलं". मालतीने International Coach Federation इथे प्रवेश घेतला आणि life coach होण्याचं प्रशिक्षण घेतलं.

या मोहक हास्या मागे दडलाय एका संघर्षाचा इतिहास

या मोहक हास्या मागे दडलाय एका संघर्षाचा इतिहास


जरी तिने उद्योजिका होण्याच ठरवलं होत पण गोष्टी तेवढ्या सोप्या नव्हत्या. तिला ह्या व्यवसायाविषयी पुरेशी माहिती नव्हती, केवळ यशापर्यंत पोहोचण्याची इच्छा होती. साधारण २००० सालच्या सुरुवातीपासून जवळ – जवळ तीन वर्ष मालती आर्थिक आणि व्यक्तिगत समस्यांना सामोरे जात होती. या काळा बद्दल मालती सांगते "अनेक शुभचिंतकानी मला सांगितलं कि चांगली नोकरी शोध. पण मी माझ्या निर्णयावर कायम राहिले आणि आज मी म्हणू शकते की, माझा निर्णय योग्य होता, मला त्याचं बक्षीस मिळालं".“ अजून एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे तिच्या व्यक्तीगत आयुष्यातील निराशाजनक परिस्थितीवर मात करणं शक्य झालं आणि ती म्हणजे तिचा दृढ संकल्प आणि ईश्वरावर असलेली श्रध्दा”. मालती ने तिचे हे सगळे अनुभव '7 Recovery Steps to get over a break up’ ह्या पुस्तकात सांगितले आहे. न्यूनगंडाने ग्रासलं जाणं ते आत्माभान ठेऊन ताकदीनं उभं राहणं, हे मालतीचं आयुष्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं. “"खरतरं मी थोडीशी जाडी होते, वजनही जास्त होतं" असं आता एक सडपातळ बाई म्हणते जी आज शिडशिडीत बांध्याची व्यक्ती आहे, "मला जाणीव झाली की मला मिळालेला आनंद माझ्यातूनच आलेला आहे कुण्या बाहेरच्या व्यक्ती किंवा शक्तीतून नाही. खरखुरं प्रेमात पडणं तेही स्वताच्या हे मी माझ्या अनुभवातून शिकले. “मी माझी सगळी उर्जा आणि सगळा वेळ माझ्या व्यवसायाकडे आणि माझा brand उभं करण्यात लक्ष केंद्रित केलं" ” मालती सांगते.

एका सामान्य गृहिणीचे एका यशस्वी उद्योजीकेत झालेले हे रुपांतर

एका सामान्य गृहिणीचे एका यशस्वी उद्योजीकेत झालेले हे रुपांतर


ह्या प्रवासात, मालती ने आतापर्यंत ५०० लोकांना प्रशिक्षित केलं आहे आणि त्यांनी आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघावं ह्यासाठी ती नेहमीच प्रयत्नरत राहिली आहे. life coach म्हणून तीन – चार महिन्यात प्रत्येक व्यक्तीला जी सेवा तिच्याकडून दिली जाते त्यात मालती त्या लोकांना भेटते आणि त्यांना सावरण्यास मदत करते. या स्वतंत्र समुपदेशना शिवाय तिने Multi Coaching International प्रशिक्षण कार्यशाळा आणि corporate training सारखे वेगळे उपक्रमही आयोजित केले आहेत. या वेगवेगळ्या प्रशिक्षणा व्यतिरिक्त एक दिवसाची कार्यशाळा थायलंड मध्ये Microsoft कंपनीत काम करणारे वरिष्ठ अधिकारी ह्यांच्यासाठी घेण्यात आली होती त्या विषयी मालती सांगते "मी कधीही कॉर्पोरेट जगात काम केलं नाही, मी निश्चित नव्हते, पण अखेरीस उपस्थित असलेल्या सर्वांशी जुळवून घेण्यात आणि काही वेगळे घडवून आणण्यात मी यशस्वी झाले". मालती लिहिते सुद्धा. तिने लिहिलेल्या दोन पुस्तकांपैकी एक पुस्तक ‘Don’t Think of a Blue Ball’ ह्या पुस्तकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आणि हे पुस्तक बहासा ह्या इंडोनेशिया च्या भाषेत भाषांतरित झालं. दुसर जे पुस्तक आहे ‘Thankfulness Appreciation Gratitude’ त्याचं पुनर्मुद्रण होत आहे. येणाऱ्या काही वर्षात ती अजून बरीच पुस्तके प्रकाशित करण्याच्या योजना आखत आहे. ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे अशा लोकांसाठी ती स्वतः वेबसाईट आणि युटयूब सारख्या सोशल मीडिया मार्फत पोहोचत आहे. “ "मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे स्त्री आणि पुरुष तसेच उद्योजक, गृहिणी ,कलाकार ह्या सर्वांबोबत काम करते आहे. प्रशिक्षण देणे म्हणजे ‘घडणे’ आणि ‘घडवण्याची’ प्रक्रिया आहे. आपण कोण आहोत हे खरोखरच जाणून घेण्याचं कौशल्य शिकून घेण्याची गरज आहे, कुठल्या गोष्टी आपल्याला एक माणूस म्हणून घडवतात हे शोधायला प्रत्येक व्यक्तीला मदत मदत मिळायला हवी".” मालती ह्या सगळ्या विषयी बोलतात. लोकांनी विशेषतः स्त्रियांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याचं आयुष्य जगावं ह्यासाठी एक मंच, चिकित्सकांच्या आणि विशेषज्ञ यांच्या मदतीने उभा रहावा असं स्वप्न मालती बघतात आणि तेही केवळ देशातल्याच नाही तर जगातील सर्वच लोकांकरिता. बंगलोर मधील इंदिरानगर इथे लवकरच त्या life coaching and personal development space नावाची कार्यशाळा उघडणार आहेत, त्याला ते Brain Spa ह्या नावाने संबोधतात. मालती कबुल करतात कि Oprah Winfrey त्यांचे प्रेरणास्थान आहे. भारतीयांना पुढे ज्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे त्याविषयी त्या फार चिंतीत आहेत. मालती सांगतात कि "अजूनही आपल्या देशात चुकीच्या गोष्टी घडत आहेत. त्या सुधारायला life coaching and ontological training ह्यासारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. भारतामध्ये अजूनही therapist किंवा life coach ह्यांना ढोंगी समजलं जातं. इथे आधुनिक जगातल्या बऱ्याच गोष्टी मदत करू शकतात जसे की “ ऑनलाइन मीडिया मार्फत लोक सचेतन मनस्थितीत माझ्यापर्यंत पोहचू शकतात".” मालती स्पष्ट करतात. "व्यवस्थापन बोर्ड वर भागीदार आणण्यासाठी स्वतःच्या भौगोलिक मर्यादाना विस्तारावे लागेल". मालतीला लांबचा प्रवास करायचा आहे. जिच्याकडून मालतीला खूप प्रेरणा मिळते ती व्यक्ती म्हणजे तिची २२ वर्षाची मुलगी, जी आता ऑस्ट्रेलिया इथे प्रकाशनाच्या व्यवसायात काम करते आहे. वैयक्तिक अपयशांना कसं सामोरं जायचं याच्या तीन पायऱ्या मालती सांगते " १. केलेल्या चुकांविषयी पश्चाताप करू नका, त्यांना विसरून जा. जे कोणी तुम्हाला नेहमी दुखावतात त्यांच्यापासून सावधानता बाळगत स्वतःचे रक्षण करा. २. नेहमी प्रयत्नशील राहा, सगळं काही खूप सहज, सोप असेल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वतः ची तुलना इतरांशी करू नका. यश हे एक अपवाद आहे तर नेहमी अपवादात्मकच रहा. कारणे देणे सोडून द्या, अशी कारणे नेहमीच स्वताला मागे खेचतात. ३. ‘मी पुरेसा चांगला नाही’ किंवा ‘मी हे करू शकत नाही’ ‘ते फार कठीण आहे’ या सगळ्या तुमच्या अंतर्मनात असलेल्या गोष्टी काढून टाका. एक सकारात्मक आणि बुलंद आवाज तुमच्या अंतर्मनातून येऊ द्या. स्वतःला नेहमी ह्या गौरवपूर्ण मनस्थितीत ठेवा जे नेहमी तुम्हाला हे ओरडून – ओरडून सांगेल कि ‘मी चांगला व्यक्ती आहे’". असा हा मालती भोजवानी यांचा आतापर्यंतच्या आयुष्याचा प्रवास जो नेहमी आपणा सर्वाना आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला मदत करेल आणि संकटाना स्वतःच्या ध्येया समोर क्षुल्लक ठरवेल.

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags