संपादने
Marathi

‘शक्तिमान’ दिपावली साजरी करुया. आपण काय म्हणता?

shradha sharma
1st Nov 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

जर माझ्यासारखे आपणही भारताच्या छोट्या शहरात लहानाचे मोठे झाले असाल तर, सायरनच्या आवाजाने गतकाळातील त्या सफेद ऍम्बेसडर गाड्या जाणिवपूर्वक अरुंद बोळीतून घुसवून नेल्या जात असत, त्या स्मृती जाग्या होत असतील. आजुबाजूच्या वाहनांमध्येही त्यांना वाट देण्याची तातडी असे, पादचारी आणि रस्त्यावर खरेदीसाठी आलेले त्यांना बाजुला होऊन जागा करून देत आणि ते काही एकटे नसत. त्यांच्या सुरुवातीला मोटरसायकल स्वार असत जे माणसं बाजुला करत असत. त्यांच्या मागोमाग विशिष्ट जिप्सी(९०च्या दशकातील एसयुव्ही )चा ताफा असे, त्यात बंदुका रोखून उलटे बसलेले हत्यारी पोलीस असत. ही दृश्य मी त्यावेळी शेकडो वेळा पाहिली असतील. आणि प्रत्येकवेळी माझे लक्ष त्या मुख्य लालदिव्याच्या गाडीवर असायचे कारण ही सारी शक्ति त्या गाडीवरील लाल अंबरदिव्याची असायची. गोल फिरत आणि प्रकाश झोत टाकत जाताना तो दिवा आम्हाला सर्वाना ही जाणिव करुन देत असे की त्याच्यासमोर किती सामान्य माणसे होतो आम्ही.

image


मी सारे पहात होते, विद्यार्थ्याच्या उत्सुकतेतून तोंड बंद ठेऊन आणि विस्मयाने. नेमकेपणाने त्यात आतमध्ये काय आहे हे पाहण्याची उत्कंठा होती. काहीवेळा माझी नजर आतमध्ये असलेल्या छोट्याश्या पंख्यावर आणि सफेद पडद्यावर फिरायची (जर काळ्या काचा उघड्या असतील तर) ‘वॉव’ इतकाच शब्द त्यावेळी माझ्या मुखातून निघणे बाकी असे. आणि म्हणूनच मला समजले की, माझ्या आईची इच्छा मी बिहारमध्येच सरकारी नोकरी करावी अशी का होती, सरकारी नोकरी म्हणजे प्रतिष्ठा आणि शक्ति यांचे प्रतिक होते.

आणि आजही, मला आश्चर्य वाटते की, खरंच शक्ती किवा सामर्थ्य काय असते? शक्ति म्हणजे काय? तिची व्याख्या तुम्ही कशी करता?

मी अनेक वर्षांपासून त्याचाच विचार करते, आणि या दिवाळीत मी तुम्हाला सांगते की, या देशात शक्ती कशाला समजतात, अनेक वर्षांपासून सामर्थ्यवान घटक आपल्या शक्तीचा, बळाचा वापर करत समाजातील कमकुवत घटकावर अधिराज्य गाजवतात. हे राजकारणातच घडते असे नाही तर उद्योग जगतात, क्रिकेटमध्ये, आध्यात्मिक गुरुंमध्ये, आणि अगदी दिग्गज पत्रकारंमध्येही पाहायला मिळते. जगभरात पाहिले तरी काय दिसते, ट्रम्प आणि क्लिंटन यांच्यात संघर्ष सुरू आहे, तो का तर जगातील सर्वात शक्तिमान पदासाठीच ना. हा संघर्ष घृणास्पद वाटावा असा आहे असे म्हणायची वेळ आली तरी. अगदी आपल्या इथेही राजकीय घराणी फुटीच्या उंबरठ्यावर आहेत त्यांच्यातील शक्तीची मर्यादा संपेपर्यंत पुन्हा शक्तिसंपादन करण्यासाठीच.

शक्तिमान लोकांची आणखी एक वृत्ती असते ती म्हणजे त्यांना त्यांच्यासमोर दुसरा कोणी उभा राहिला तर खपत नाही. ते त्याच्याशी काल्पनिक वैर निर्माण करतात आणि त्याच्यासमोर दुसरा कुणी आलेला त्यांना मुळीच चालत नाही.

जीवनाच्या सुरुवातीच्या काळात माझे एक वरिष्ठ होते, जे नितीवचनावर विश्वास ठेवत, ‘मी सांगतो तीच पूर्व’ असा त्यांचा रोख असे. अर्थातच मी त्यांना सोडून माझा उद्यमशिलतेचा मार्ग धरला. तेंव्हा तुम्हाला समजले असेल मला काय म्हणायचे आहे: जे लोक तुमचे काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, त्यांना केवळ त्यांच्या मनाचे वागायची सवय असते. त्यांनतर तेथे केवळ हुकूमशाही आणि कंटाळवाणी प्रवचने होतात ज्यातून संवाद हरवतो, आणि बोलणी खाणे इतकेच उरते. त्याचे कारण असे की, संवादाचा प्रयत्न करणे म्हणजे नियंत्रण घालविणे? असे त्यांना वाटते. चला त्यांचा सामना करु. इतर व्यसनांप्रमाणेच शक्तिमान होणे हे एक व्यसन आहे, प्रभावशाली व्यसन आहे. ज्याच्या प्रभावाची लक्षणे आयुष्यभर राहतील आणि ती तुम्हाला त्या उंचीवर घेऊन जाईल. 

पण या दिपावलीत, मी तुम्हाला “खरीखुरी शक्ती” मिळावी अशी सदिच्छा व्यक्त करते.

शक्ति किवा सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी जेवढा आपण त्याचा पाठलाग करू तेवढे आपण शक्तिहिन होत जाऊ. खरी शक्ति स्वत:ला ओळखण्यात आणि हे मान्य करण्यातच आहे की आपण शक्तिहीन सामान्य आहोत. वास्तव स्वीकारा आणि या विचारांना शरण जा, शक्ति किवा सामर्थ्य तात्पुरत्या स्वरूपाचे असते. मला माहिती आहे की, करण्यापेक्षा बोलणे सोपे असते. आणि ते प्रत्यक्षात साकारणे अवघड असते कारण आपल्या सभोवताली अनेक प्रकारच्या ‘लाल बत्ती’ची बंधने असतात. प्रत्येक दिवशी, क्षणोक्षणी. माझ्यातील बालकाला आजही अनेकदा ऍम्बेसडर वरच्या लाल बत्तीचा मोह होतो. पण माझ्यातील समजूतदारपणा मला सांगतो की, शक्ति ही क्षणभंगूर असते, चंचल असते आणि शक्ति ज्यावेळी माझ्या मनाला नादी लावण्याचा प्रयत्न करते त्यावेळी माझ्या मनातूनच अमिताभ बच्चन यांचे ते गाणे मोठ्या आवाजात मला ऐकू येऊ लागते.

मै पल दो पल का शायर हू, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags