संपादने
Marathi

मुझून अलमेल्हान, 'सिरीयाची मलाया' बनल्या आहेत सर्वात तरूण सदिच्छादूत!

Team YS Marathi
27th Jun 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

मुझून अलमेल्हान, १९ वर्षीय शिक्षण कार्यकर्ती, युनिसेफच्या यूएन चिल्ड्रन फंड साठी पहिल्या वहील्या अधिकृत निर्वासित सदिच्छादूत म्हणून नियुक्त झाल्या आहेत.

याशिवाय त्या युनिसेफच्या सर्वात नव्या आणि तरूण सदिच्छादूत म्हणून जागतिक निर्वासीत दिनी नियुक्ती मिळवणा-या कार्यकर्ती ठरल्या आहेत. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “ लहान मुल म्हणूनही, मला माहिती होते की शिक्षण हेच माझे भविष्य आहे, त्यामुळे ज्यावेळी मी सिरीया सोडले त्यावेळी देखील मी माझ्यासोबत केवळ माझी पुस्तके घेतली. निर्वासीत म्हणून मी पाहिले की, लहान मुलांना कशी बळजोरी करून लग्न लावले जाते किंवा त्यांचा बालकामगार म्हणून वापर करून घेतला जातो. त्यांचे शिक्षण बंद होते, आणि भविष्यात यातून बाहेर जाण्याचा मार्ग देखील”.


image


जॉर्डनमध्ये ज्यावेळी त्यांना आपला निर्वासीत तळ सोडावा लागला त्यावेळी त्यांना युनिसेफने मदत केली, कै ऑन्ड्री हेपबर्न यांच्या मार्गाने ज्यांना युनिसेफचा पाठींबा होता, आणि नंतर जे त्यांचे सदिच्छादूत होते, त्या सहीसलामत तेथून निघाल्या.

सिरीयात २०१३मध्ये आणिबाणी निर्माण झाली त्यावेळी मुझनून यांनी जॉर्डन मध्ये निर्वासीत म्हणून तीन वर्ष घालविली, त्यावेळी त्या कुटूंबियासोबत जॉर्डनच्या झा तारी कॅम्प येथे रहात होत्या. त्यांनी मुलांच्या शिक्षणाचे हक्क आणि अधिकारांसाठी पुढाकार घेण्यास सुरूवात केली, विशेषत: मुलींच्या हक्कासाठी. त्यानंतर त्या ब्रिटनला गेल्या मात्र त्यांनी आपले हे काम बंद केले नाही.

नुकतेच त्या युनिसेफ सोबत चाढ येथे दौ-यावर जावून आल्या, तेथे त्यांनी शिक्षणाबाबत जागृतीसाठी संदेश दिला, जेथे खूप कमी मुलांना आणि मुलींना शिक्षणाची संधी आहे.

सर्वसाधारणपणे सिरीयाची मलाया म्हणून ओळखल्या जाण-या त्यांनी सातत्याने या मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आवाज उठविण्याचे काम केले आहे, जेथे आणिबाणीच्या स्थिती मध्ये शिक्षणाची हेळसांड केली जात आहे. जरी त्या सध्या ब्रिटन मध्ये रहात असल्या तरी त्यांना पत्रकार होवून त्यांच्या मायदेशी जायचे आहे आणि तेथील लोकांना मदत करायची आहे. याबाबत एक वृत्ता नुसार त्या म्हणाल्या की, “ मला सिरीयाच्या फेरबांधणीसाठी जायचे आहे, तेथे डॉक्टर, अभियंता, वकील, आणि पत्रकार यांची गरज आहे, जेणेकरून लोकांना हे माहिती होईल की अजूनही आशा आहे चांगले काही होवू शकते”.

जागतिक निर्वासीत दिनी, जगभरातील लोक आपल्यासारख्याच माणसांना जे त्यांच्या देशातून परागंदा झाले आहेत त्यांना माणुसकीचे दर्शन घडवितात. हा दिवस त्यासाठी देखील साजरा केला जातो की या लोकांना बळ आणि शक्ति मिळावी की ते लाखो निर्वासीत लढा देवून त्याच्या मायदेशी पुन्हा सुखरूप परत जावे.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags