संपादने
Marathi

७९ वर्षीय मेडिसिन बाबा गरीब असून गरिबांसाठी लाखोंची औषध दान करण्याचा उपक्रम

10th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

साधारणतः बाबा शब्द कानावर पडताच आपली धारणा एका वृद्ध व्यक्तीच्या प्रतिमेत बदलते. बऱ्याच वेळा ते आपल्या धर्माचा प्रचार करतांना दिसतात, पण दिल्ली स्थित एक असे बाबा आहे जे जाती धर्माच्या विरुद्ध जाऊन मानवता धर्माबद्दल विचार करून गरिबांची मदत करणे हेच आपल्या आयुष्याचे ध्येय मानतात. जे लोकांना ज्ञान न देता स्वतः गरीब लोकांचे आयुष्य बदलण्याचे कार्य करतात. स्वतः अपंग असतांना ७९ व्या वर्षी आपल्या या उमेदीने कोणत्याही तरुणाला लाजवेल असे त्यांचे धाडस आहे.


image


मेडिसिन बाबा हे खूप वृद्ध असूनही मागच्या काही वर्षा पासून दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, गुडगाव च्या गल्लीबोळात फिरून लोकांना जुनी औषधं दान करण्याची विनंती करतात. वास्तविक त्यांचे नाव ओमकारनाथ आहे. ते नोएडाच्या एका कैलाश हॉस्पिटल मध्ये टेक्निशियन होते. पण त्यांच्या या चांगल्या कामाने लोक त्यांना मेडीसिन बाबा म्हणून ओळखू लागले.

मेडिसिन बाबा सांगतात की, " दिल्लीच्या लक्ष्मीनगर भागात मेट्रो बांधकामा दरम्यान झालेल्या दुर्घटनेत अनेक गरीब मजुरांचा बळी गेला व अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर मी खूप अस्वस्थ झालो व विचार केला की, या गरीब लोकांच्या उद्धारासाठी काहीतरी केले पाहिजे. गरीब लोकांकडे औषधं घेण्याचे पण पैसे नसत आणि डॉक्टर पण औषधं उपलब्ध नसल्याचा आव आणायचे, त्यामुळे आजारी लोकांना योग्य ते औषधोपचार मिळत नव्हते. औषधे खूप महागडी असल्यामुळे दुकानातून ते आणणे शक्य नव्हते त्यामुळे त्यांच्यावरचे उपचार हे अशक्यच होते, म्हणून त्यांना अनेक अडचणींना व आजारांना तोंड द्यावे लागत.


image


ओंकारनाथजींनी एक भगव्या रंगाचा कुर्ता घालून त्यावर आपला फोन नंबर, ईमेल हे मोठमोठ्या अक्षरात लिहून दिल्लीच्या गरीब लोकांसाठी औषध मागण्याचा परिपाठ आज पर्यंत सुरु ठेवला आहे. ते लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना जी औषध त्यांच्या आता उपयोगाची नाही ती दान करण्याची विनंती करतात. त्या नंतर मेडिसिन बाबा ती औषधं दवाखान्यातल्या डॉक्टरांना देतात, की जेणेकरून त्या औषधांचे गरीब लोकांमध्ये मोफत वाटप होऊन ते बरे होतील. मेडिसिन बाबा दर वर्षी लाखो रुपयांचे औषध दवाखान्यात दान करतात. ते दिल्लीच्या एम्स, राम मनोहर लोहिया तसेच लेडी हार्डिंग मेडीकल कॉलेज आणि दिन द्याल उपाध्याय दवाखान्यात औषधे दान करतात.


image


आज आपल्या देशातच नाहीतर परदेशातून पण मेडिसिन बाबांना औषधांच्या रुपात मदत मिळत आहे, जेणेकरून गरिबांना त्याचा फायदाच होईल. याव्यतिरिक्त लोक आपली व्हीलचेअर, ऑक्सिजन सिलेंडर, बेड,सिरींज सुद्धा दान करीत आहे. उत्तराखंडाच्या आपत्ती मध्ये मेडिसिन बाबाने भरभरून आपले योगदान दिले व लाखो रुपयांचे औषध गरजवंताना पोहचविले होते.

मेडिसिन बाबा सांगतात की, " औषधांच्या साठ्याचा मोठा प्रश्न आहे. ते स्वतः एका भाड्याच्या घरात रहातात जिथे त्यांचे एक ऑफिस पण आहे. स्वतःच्या कामात एकनिष्ठ असलेले मेडिसिन बाबा म्हणतात की जर सरकारकडून मदत मिळाली तर आपल्या कामाला हातभार लागेल व विस्तृतपणे जास्तीत जास्त गरीब लोकांना याचा फायदा होईल. भविष्यात त्यांना एक मेडिसिन बँक उघडायची आहे जिथे गरजवंताला मोफत औषध सेवा उपलब्ध होईल.


image


मेडिसिन बाबा स्वतः नीट चालू शकत नाही पण लोकांची मदत करण्याचे ध्येय त्यांना सदैव पुढे जाण्यासाठी प्रेरित करते. आपल्या देशाला सशक्त बनविण्यासाठी नि:स्वार्थ भावनेने ते हे कार्य करीत आहेत. गरीब लोकांना मदत करणे यालाच ते आपला धर्म मानतात व आपल्या कार्यावर ते खुश आहेत. ते मानतात की समर्थ व सधन लोकांनी देशाच्या गरीब लोकांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे.

जर तुम्ही सुद्धा मेडिसिन बाबांच्या या उपक्रमाला साथ देऊन लोकांची मदत करू इच्छितात तर त्यांना सरळ संपर्क करता येऊ शकतो.

फोन नंबर – ०९२५९२४३२९८

वेब- http://www.medicinebaba.com

लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किरण ठाकरे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags