संपादने
Marathi

सुरांनी सजवलं जीवन...

27th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share“माझ्या आई-वडिलांना संगीताची आवड होती म्हणून मी संगीत शिकण्यास सुरूवात केली आणि शिकता शिकता संगीतच माझ्या जीवनाचं प्रेरणास्रोत बनून गेलं,” प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सुभद्रा देसाई आपल्या सांगितिक प्रवासाबद्दल सांगतात, “ हे सगळं अचानक झालं. मी संगीत शिकत होते, गाणं गात होते, संगीतातील दिग्गजांना ऐकणं, त्यांना रियाज करताना पाहणं, त्यांच्या गायनाचं सूक्ष्म निरीक्षण करणं, संशोधन करणं आणि सादरीकरण करणं, याच गोष्टी माझ्या डोक्यात सतत असायच्या. मी माझ्या मनाचं ऐकलं आणि संगीतासाठी मी दिल्लीतील एका नावाजलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकपदाच्या नोकरीचा राजीनामा दिला.”


image


सुभद्रा यांचा जन्म दक्षिण बंगालमधील कल्याणीमध्ये झाला. त्या दोन वर्षांच्या असताना त्यांचं कुटुंब दिल्लीत स्थलांतरीत झालं. “ माझ्या कुटुंबातील लोक कायम पूजा पाठ, संगीत आणि अध्यात्म यात रमलेले असत. ” सुभद्रा बालपणीच्या काही गोष्टी आठवून सांगतात. “ माझी आई प्राध्यापिका होती आणि उत्तम गायिकासुद्धा होती. माझे वडील अभियंते होते पण तरीही ते उत्तम पद्धतीने वाद्य वाजवायचे. माझे बरेच नातेवाईक व्हायोलीन आणि इतर वाद्य दिवसभर वाजवायचे. त्या काळी आमच्या घरातील प्रत्येकाला संगीताचं वेड लागलं होतं पण एक दिवस हेच संगीत हाच आपला व्यवसाय होईल असा विचारही कोणी केला नसेल.

सांगितिक प्रवास

सुभद्रा यांनी वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या सांगितिक कारकिर्दीची सुरूवात केली. कोणत्याही बंगाली परिवारासारखं आपणही एका स्थानिक संगीत शिक्षकांकडे शिकण्यास सुरुवात केली. संगीत शिकता शिकता त्या जशा परिपक्व होत गेल्या तशी त्यांना जाणीव झाली की संगीत हेच त्यांचं खरं प्रेम आहे. सुरूवातीच्या दिवसात दिल्लीतल्या गंधर्व महाविद्यालयात त्यांना प्राचार्य पंडित विनयचंद्र मौदगाल्य आणि श्रीमती पद्मादेवी यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिकण्याची संधी मिळाली म्हणून त्या स्वत:ला खूप भाग्यवान समजतात.


image


त्यानंतर त्यांनी गुरू पंडित मधुप मुदगल यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतलं आणि संगीतावरील त्यांचं प्रेम हळू हळू वाढत गेलं. आपले अनुभव सांगताना सुभद्रा म्हणतात, मधुपजी यांची संगीतावर खूप निष्ठा होती आणि ते शिस्तप्रियही होते. संगीतामधील सूक्ष्म गोष्टी सांगतानाही त्यांचं मन एकाग्र असायचं. त्या सांगतात की आठ वर्षात त्यांनी संस्थेमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतरही अनेक वर्ष त्यांनी गुरू-शिष्य पद्धतीने मधुपजींकडून शिक्षण घेतलं. आजही त्या गुरूंकडून संगीतामधील सूक्ष्म गोष्टी शिकत आहेत. काही काळासाठी त्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्तीच्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील दिग्गज मालिनी राजुरकर यांच्याकडेही संगीत शिक्षण घेतलं.

संगीत शिकता शिकता सुभद्रा देसाई उदयोन्मुख गायिकेपासून एक आत्मविश्वासपूर्ण गायिका कधी झाल्या हे त्यांनाही कळलं नाही. त्या सांगतात की हा बदल आपोआप झाला की प्रत्यक्षात झालाच नाही हे कळत नाही, पण प्रत्येक कलाकाराला या प्रक्रियेमधून जावं लागतं. संगीतामधील प्रवास जेवढा कठीण आहे तेवढाच सोपाही आहे. हा प्रवास सोपा आहे कारण संगीत थेट आत्म्याशी जोडलेलं असतं. संगीतामधील सूक्ष्म गोष्टी शिकताना स्वर आणि राग यांच्या संगमामुळे अंतरात्म्याला एक प्रकाराचं समाधान मिळतं आणि हे कठीण यासाठी आहे की संगीत शिकण्यापासून ते एका ध्येयापर्यंत जाताना तुम्ही एकटे असता.


image


संगीत प्रवासातील यशोशिखर

भारतीय शास्त्रीय गायन क्षेत्रात मणि मन फेलोशीप मिळवणाऱ्या पहिल्या गायिका सुभद्रा देसाई यांनी आपल्या जीवनात यशाची अनेक शिखरं गाठली आहेत. आपल्या संगीत प्रवासाबद्दल बोलताना त्या स्वत:ला भाग्यवंत समजतात. त्यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या उत्सव आणि कार्यक्रमांना आपल्या सूरांनी सजवलं आहे. दिल्लीत विष्णू दिगंबर जयंती आणि तीनमूर्ती भवनात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी आपलं गाणं सादर केलंय. याशिवाय त्यांनी दिल्लीतील नेहरु पार्कमध्ये भक्ती उत्सवात दलाई लामा यांच्यापुढेही आपलं गायन सादर केलंय. तिरुपतीचं द्वारका मंदिर, जर्मनीतील बर्लिन विद्यापीठ, वॉशिंग्टन डीसी, आणि अमेरिकेच्याच रोड आयलंडमध्येही सुभद्रा यांनी आपलं गाणं सादर केलंय. त्यांचं पहिलं पुस्तक, ‘ म्युझिक इन वाल्मिकीज रामायण’ हे हॉर्वर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयात ठेवण्यात आलंय. या पुस्तकाचं प्रकाशन काश्मीरचे राजे आणि राजकीय नेते डॉ. करणसिंह यांनी केलं होतं.

कारकीर्द आणि कौटुंबिक जीवन

आपल्या सांगितिक कारकिर्दीसाठी नातेवाईकांनी दिलेल्या प्रोत्साहनाबाबत त्या स्वत:ला भाग्यवान समजतात. त्या सांगतात, “ संगीतामध्येच मी कारकीर्द करावी यासाठी माझ्या पतीने पावलोपावली मला साथ दिली. मला संगीत कार्यक्रमांसाठी किंवा संशोधनासाठी बाहेरगावी जावं लागणार असेल तर माझे पती आणि सासरच्यांनी मला कायम मदत केली. त्यामुळेच संगीत क्षेत्रात एक चांगली गायिका म्हणून आणि ऐतिहासिक वारशांबाबत संशोधन करण्याच्या कामात समतोल साधू शकले.” सुभद्रा यांनी, ‘स्नॉग्ज ऑफ सीयर्स अँड संत ऑफ इंडिया’वरही संशोधन केलं. हे काम त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या सहकार्यानं पूर्ण केलं. या संशोधनानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलंय ते आता प्रकाशित होणार आहे. पुस्तकाबद्दल त्या म्हणतात, “ आपल्या आत्म्याचा आवाज आध्यात्मिक मार्गांनी गाण्याच्या माध्यमातून जगासमोर मांडणाऱ्या महिलांकडून मला कायम प्रेरणा मिळते. वैदिक संस्कृत,तामिळ, तेलगू, कन्नड, मराठी, गुजराती, हिंदी, मारवाडी, ओडिया, काश्मीरी आणि आणखी इतर मातृभाषांमध्ये गाणाऱ्या गायिकांची गाणी गाणं हा मी माझा सन्मान समजते.”

शास्त्रीय संगीत शिकण्याची परंपरा अजूनही सुरू आहे आणि त्याला वाहून घेतलेले शिक्षक आणि विद्यार्थी आजही भेटू शकतात, असं सुभद्रा देसाई यांचं म्हणणं आहे. पण पूर्वी असं नव्हतं, तेव्हा संगीतामध्ये घराण्यांमधील वाद होते आणि हे वाद पिढ्यानपिढ्या चालायचे. पण आज कोणालाही शास्त्रीय गायनाची आवड असेल तर तो शिकू शकतो. पण पूर्वी ज्यांचा संगीत घराण्यांशी संबंध असेल त्यांनाच या क्षेत्रात काहीतरी करता येत होतं. त्या काळी गुरू-शिष्य ही परंपरा अस्तित्वात होती. पण आता हे सर्व कमी होतंय.

सुभद्रा यांच्या मते, “ आज अनेकजण शास्त्रीय संगीतात करीअर करण्यास उत्सुक आहेत. या माध्यमातून व्यावसायिक संगीतकार होण्याचं स्वप्नही काहीजण बघत आहेत. एवढंच नाही तर अनेक औद्योगिक घराण्यांनी संगीत कार्यक्रमांसाठी आर्थिक मदत द्यायलाही सुरूवात केलीये. ” हे शुभ संकेत आहेत. काही लोक तर संगीत हाच आपला व्यवसाय बनवण्यासाठी स्वत:चं करीअर सोडायला तयार आहेत.

पण सुभद्रा देसाई यांना असं वाटतं की संगीताशी संबंधित काही ज्येष्ठ लोकांनी आता जास्त लक्ष द्यायला हवं. त्यांना वाटतंय की संगीतकारांना मिळणारा त्यांच्या कामाचा मोबदला पुरेसा नाहीये. तरुण संगीतकारांना असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही. मोठ्या संगीत घराण्यांशी संबंध नसलेल्या संगीतकारांना योग्य व्यासपीठ आणि कामाची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे, नाहीतर या क्षेत्रात आल्याचा त्यांना पश्चाताप होऊ शकतो. तरुण संगीतकारांना सुभद्रा देसाई सांगतात की कोणत्याही कलेचा श्रीगणेशा करण्याआधी निर्धार, शिस्त आणि कठोर कष्ट करण्याची तयारी असायला हवी अर्थात हा मंत्रच यशाची गुरूकिल्ली आहे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags