संपादने
Marathi

डोंबिवलीच्या केतकीने साकारली ‘अनोखी गुढी’

Pramila Pawar
7th Apr 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

डोंंबिवली शहराला सांस्कृतिक नगरी म्हणूनही ओळखले जाते. गुढीपाढवा आणि डोंबिवलीचे नाते काही निराळेच...गुढीपाढवा काही दिवसांवर येऊन ठेपला की सगळीकडे लगबग सुरू असते गुढी उभारण्यासाठीच्या साहित्याची जमवाजमव करण्याची. आपण घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो. गुढी उंच बांबूपासून तयार केली जाते. तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधला जातो व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी राहते. हा ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो. या सर्व वातावरणामुळे प्रत्येकाच्या घरात आनंदी वातावरण निर्माण होते.

image


परंपरा जपायला तर सगळ्यांनाच आवडते. पण त्याचबरोबर हे पारंपरिक सण साजरे करण्यासाठी आज अनेकांना वेळ देता येत नाही. आज स्पर्धेच्या युगात प्रत्येक महिला या कमावत्या झाल्या आहेत. नोकर्‍या करायला लागल्या. करिअर ओरिएण्टेड झाल्या. त्यामुळे हे पारंपरिक सण साजरे करायला वेळच नाही, असं व्हायला लागलं आहे. नवीन लग्न झाल्यावर करायलाच पाहिजे म्हणून आज कित्येक घरात लग्नानंतरचा पहिला गुढीपाढवा पारंपारिक विधींनी साजरा होतो. गुढीपाढवा म्हणजे रजा घ्यायला लागणार आणि अगोदरच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी बाजार गाठून सर्व साहित्यांची जमवा जमव करावी लागणार. कित्येक घरांमध्ये तर एकटी महिला असल्याने घाईगडबडीत एखादे साहित्य आणणे विसरते आणि मग दुसर्‍या दिवशी सकाळी आयत्यावेळीच आणखी उरलेल्या साहित्याची जमवाजमव करण्याचा गाडा सुरू होतो. बरं ते झालं...त्यानंतरही अनेक नव्या नवरीचा पहिला गुढीपाढवा असल्यामुळे गुढी कशी उभारायची हे अनेकदा माहित नसते. घरात कुणी वयस्कर बायका असतील तर त्यांच्याकडून थोडी फार माहिती मिळते अन्यथा शेजार्‍यांकडून गुढी उभारण्याची ट्रेनिंग घेणे हे आलेच....

image


या सर्व अडचणी ओळखून गुढी पाडव्यानिमित्त डोंबिवलीत येथील ‘टंग इन चेक’च्या केतकी कुलकर्णी यांनी साडेतीन फुटी फोल्डेड अनोखी गुढी बाजारपेठेत आणली आहे. ही गुढी छोट्या ब्लॉकमध्ये रहाणार्‍यांसाठी फायदेशीर ठरणार आहे आणि नोकरी करणार्‍या तसेच नव्या नवरीसाठी सुद्धा...आपण बांबूची उंच काठी वापरून गुढी उभी करतो. मात्र सध्या बांबू लोप पावत चालले असून यातून निसर्गाचाही र्‍हास होत आहे. या धर्तीवर निसर्गाचे संगोपन करण्याबरोबरच गुढीपाडवा हा सण साजरा करण्यासाठी ही अनोखी पद्धतीची गुढी केतकी कुलकर्णी या तरूणीने बाजारपेठेत आणली आहे. या गुढीबाबत केतकी कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितले की, साडेतीन मुहुर्तापैकी गुढी पाडवा हा एक मुहूर्त आपण मानतो. यामुळे या गुढीची उंचीही साडेतीन फुटाची आहे. ही गुढी पूर्णपणे फोल्डेड असून याकरिता स्टीलचा रॉड वापरला गेला आहे. गुढी व्यवस्थित उभी रहावी याकरिता लाकडी बेस तयार करून स्टीलचा रॉड एकमेकाला जोडता येण्यासारखा आहे. गुढीला तांब्याचा कळस असून भरजरी कापड व प्लास्टीक फुलांची माळ आहे. अतिशय देखण्या स्वरूपाची ही गुढी वर्षानुवर्षे जतन करून ठेवण्यासारखी आहे. अनेक कलाकार, राजकीय नेतेमंडळींनी या गुढीचे कौतुक केले आहे. शहरी वस्तीत आता या गुढीमुळे प्रत्येकाला गुढीपाडवा सण साजरा करता येणार आहे. फोल्डिंग गुढी तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठेही उभारू शकता. याचा बेस लाकडाचा आहे. तो वेगळाही करता येतो. या गुढीत जरीकाठी खण आहे. त्यावर चांदीच्या कोटिंगचा मंगलकलश आहे. तळभागावर आकड्यांची सरस्वती आहे. ही गुढी तुम्ही वर्षानुवर्षे वापरू शकता. या गुढीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुढीपाढव्यानिमित्त तुम्हाला कोणा व्यक्तीला भेट द्यायची असेल तर अशा आकर्षक फोल्डींग गुढी शिवाय दुसरा कोणता पर्याय असणार? घरी वापरायलाच नव्हे, तर विजयाचं अथवा सद्भावनेचं प्रतीक म्हणून ही गुढी भेट देता येऊ शकेल.

image


ऑफिसमध्ये अथवा घरात टेबलावर टेबल गुढीही तुम्हाला ठेवता येईल. विविध पद्धतीचे गुढीचे कलशही उपलब्ध आहे. कारमध्ये अथवा देव्हार्‍यात ठेवण्यासाठी, कार गुढी ही देखील तिने बाजारात आणली आहे. त्यामुळे तुम्ही छोट्या प्लॅटमध्ये राहत असाल किंवा गुढीपाढव्याच्या दिवशी गाडीने कुठे प्रवास करीत असाल...प्रत्येक ठिकाणी ही फोल्डींग गुढी उभारून तुम्ही गुढीपाढवा आनंदाने साजरा करू शकता.

image


 या गुढ्यांची किंमत ११०० रु. इतकी आहे. गुढीपाडवा हा ऐतिहासिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या शुभ, सद्प्रवृत्तीच्या स्वागताचा दिन मानला जातो. बदलत्या काळाला साजेशा रुपात आपल्याला तो साजरा करता आला, तर आनंदात भरच पडेल, नाही का? अशा इको फें्रडली गुढी तुमच्या घरात उभारायची असल्यास ९६१९३०९३०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. 

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags