संपादने
Marathi

गाथाडॉटकॉमः येथील प्रत्येक कलाकृती सांगते एक रंजक कथा

Team YS Marathi
2nd Mar 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

हा लेख सिटीस्पार्कस् मालिकेचा भाग असून त्याचे प्रायोजक वेरीसाईन (Verisign) आहेत.

भारताला हस्तकलेचा अतिशय संपन्न वारसा आहे. शतकानुशतके एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेल्या या कला...पण काळानुरुप आता या कलांचा ऱ्हास होताना दिसत आहे. यामागे तंत्रज्ञानाचाही काही प्रमाणात हात आहेच... कारण तंत्रज्ञानामुळे आणखी स्वस्त पर्याय सहजपणे उपलब्ध झाले आहेत. कारणं काहीही असोत, पण आपल्या अद्भूत कलेच्या सहाय्याने अप्रतिम कलाकृतींच्या निर्माणाची ताकद असणाऱ्या या कारागिरांची अवस्था मात्र आज अतिशय वाईट आहे. आपल्या कुटुंबियांचे पोट भरण्यासाठी म्हणून दरवर्षी देशातील हजारो कारागीर रोजंदारीच्या शोधात शहरांमध्ये स्थलांतर करतात, हे एक कटू सत्य आहे आणि पिढ्यांपिढ्या चालत आलेले हे कलाज्ञान शहरांतील गलिच्छ झोपड्यांमध्ये प्राण सोडताना दिसत आहे. मात्र या परिस्थितीत गाथाडॉटकॉम एक आशेचा किरणच ठरताना दिसत आहे. सद्य परिस्थितीशी लढा देण्याच्या आणि लोप पावत चाललेल्या या कलांना पुन्हा एकदा प्रकाशात आणण्याच्या हेतूनेच सुमिरन पांडे, शिवानी धर आणि हिमांशु खार या तीन मित्रांनी ‘गाथा’ प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.

अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ डिजाईन (एनआयडी) या प्रतिष्ठीत संस्थेत शिक्षण घेणारे हे तिघे एकमेकांचे जवळचे मित्र....त्यांचे शैक्षणिक संशोधन सुरु असतानाच त्यांना हस्तकलेप्रती असलेल्या आपल्या उत्कट आवडीची जाणीव पहिल्यांदा झाली.

image


वेगाने ऱ्हास पावत चाललेल्या भारतीय कला आणि या कलांचा वारसा, याबाबत संशोधन आणि त्यासंबंधीचे दस्ताऐवज जतन करण्याच्या हेतूने, नोव्हेंबर, २००९ मध्ये पहिल्यांदा गाथा या उपक्रमाला सुरुवात झाली. मात्र, यानिमित्ताने कारागिरांबरोबर झालेल्या संवादातून त्यांना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. मुख्य म्हणजे केवळ संशोधनानेच काही मदत होणार नसून, या कलांविषयीचा अभिमान नव्याने जागृत करण्याची आणि त्याचबरोबर व्यावसायिक संधी निर्माण करण्याची, असलेली गरज त्यांच्या लक्षात आली. आणि याच कारणाने, ऑगस्ट २०१३ गाथाडॉटकॉम या ई कॉमर्स पोर्टलची मुहूर्तमेढ रोवली गेली.

या कारागिरांना जागतिक पातळीवरील ग्राहकांशी जोडणारा एक पुल म्हणून काम करण्याचा गाथाच्या टीमचा प्रयत्न आहे. सुमिरन सांगतात, “ गाथा एक असे माध्यम बनत आहे, जेथे कलेची विक्री केवळ एक वस्तू म्हणून होत नसून, एक कथा आणि एक विचारसरणी म्हणूनही होत आहे. यामाध्यमातून केवळ ‘विक्री’ करण्याचाच आमचा प्रयत्न नसून, आम्हाला कारागीर आणि त्यांच्या आश्रयदात्यांमध्ये ‘संवाद’ निर्मितीचेही काम करायचे आहे, त्याचबरोबर सहनिर्मितीला प्रोत्साहन द्यायचे आहे आणि एकत्रित प्रगती साधायची आहे.” ते खास करुन सांस्कृतिक वारसा आणि कलात्मक प्रक्रियेतील अस्सलपणा टिकवून ठेवण्यासाठी वचनबद्ध आहेत.

गाथाः कथा ऑनलाईन

अहमदाबाद स्थित गाथाडॉटकॉमवर दरमहा सरासरी ४५० ते ६०० मागण्या नोंदविल्या जातात. अगदी हटके डायरीजपासून ते सुरेख असे कोरीव लाकडी कंगवे, फॅशन आणि गृहसजावटीच्या वस्तू, जसे की सिरॅमिकचे दागिने, सिल्कचे स्टोल्स आणि मधुबनी पेंटीग्ज...... गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश आणि काश्मिरमधील भारतीय हस्तकलांचा एक खजिनाच जणू गाथाडॉटकॉम वर उपलब्ध आहे. बाटीक प्रिटींग, क्विल्टींग, पॅपियर-माक वर्क, मेटल कास्टींग आणि पंच वर्क यांसारख्या विविध तंत्रांचा वापर करुन या कलाकृती बनविण्यात आल्या आहेत. तर त्यामध्ये लाकूड, लेदर, फायबर, बांबू, गवत आणि अगदी अर्बन वेस्ट अर्थात शहरी कचऱ्याचाही वापर करण्यात आल्याचे दिसून येते.

image


गाथाच्या टीमने त्यांच्या संकेतस्थळासाठी डॉटकॉम सोडून दुसऱ्या कोणत्याही डोमेन नेमचा विचारही केला नाही, कारण जगभरातील कला पारखींपर्यंत याविषयाची माहिती पोहचविणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता आणि डॉटकॉम डोमेन नेम हे लक्षात ठेवायला सर्वात सोपे होते आणि अतिशय लोकप्रिय होते. गाथाडॉटकॉमची नोंदणी झाल्यानंतर, त्यांच्या इन हाऊस डेवलपर्सनी कला, उत्पादन आणि कारागिरांना केंद्रस्थानी ठेवून संकेतस्थळाच्या डिजाईनवर काम केले.

विविध कलांविषयी वाचण्याची आवड असलेल्या हस्तकला प्रेमींचे सर्वात प्रथम लक्ष वेधले जाते ते गाथाडॉटकॉमवरील ब्लॉगकडे आणि त्यानंतरच या संकेतस्थळावरुन ते खरेदी करतात. सुमिरन सांगतात, "अशाच प्रकारची उत्पादने विकणारी इतर अनेक संकेतस्थळे आहेत, जी इंटरनेटवरून मजकूर घेऊन त्याची आपल्या संकेतस्थळांवर फक्त नक्कल करतात. त्याउलट, आमच्या संकेतस्थळावरील मजकूर मात्र अनेक वर्षांच्या सखोल संशोधनातून निर्माण झालेला आहे".

येथे नोंदविण्यात आलेल्या मागण्यांची भारतभरात कुठेही केवळ पाच दिवसांत पूर्तता केली जाते तर अमेरिका आणि सिंगापूरसारख्या देशांमधील मागण्या पूर्ण करण्यासाठी आठवड्याभराचा वेळ लागतो. जरी सध्या त्यांचे बहुतेक ग्राहक हे भारतातीलच असले, तरी परदेशांतून येणाऱ्या मागण्यांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर समाजमाध्यमांवरही गाथाने आपले अस्तित्व दाखवून दिले असून, खास करुन त्यांचे फेसबुकपेज खूपच लोकप्रिय आहे.

कारागिरांबरोबरील भागीदारी

हे तरुण संस्थापक सातत्याने प्रवास करत असतात, कारागिरांना सतत भेटत असतात आणि संकेतस्थळावर आणता येतील अशा नव्या कलांच्या सतत शोधात असतात. गाथावर दीडशेहून अधिक कारागीर, तेथील पन्नास उत्पादन श्रेणींसाठी आपले योगदान देतात. कारागिरांना त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी माध्यम उपलब्ध करुन देणारी इतर संकेतस्थळे असली, तरी गाथा मात्र एक पाऊल पुढे जात, प्रत्येक उत्पादनाचे छायाचित्र काढून ठेवते आणि विपणनाचीही संपूर्ण काळजी घेते. गाथाडॉटकॉमवर प्रत्येक उत्पादनाची, मग ते अतिशय सुंदर अशी विणलेली साडी असो किंवा ब्रास कलाकृती, मांडणी आणि प्रदर्शन अतिशय प्रेमाने करण्यात येते. काही वेळा तर ते कलाकृतींच्या उत्पादनाशीही जवळून निगडीत असतात.

कारागीर आणि त्यांचे आश्रयदाते यांच्यामध्ये कथा आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून गाथाडॉटकॉम एक नवीन नाते निर्माण करत आहे. पूर्वी कधी नव्हे एवढे आज लोकांना या कलाकृतींच्या गोष्टी ऐकण्याची, त्या जाणून घेण्याची इच्छा आहे.

अशाच काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

क्वर्कस्मिथः ज्वेलरी स्टार्टअपद्वारे चांदीला नवी झळाळी आणण्याचा बत्रा भगिनींचा प्रयत्न 

कचऱ्याचे सोने करणारी ‘अमृता…’ 

स्ट्रीट फॅशनला ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देणारे 'स्ट्रीटबाजार.इन'

लेखक – शारीका नायर

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags