संपादने
Marathi

'कॉलेज ड्रॉपआउट' असलेले गौतम अदानी आहे अब्जोंच्या प्रॉपर्टीचे मालक

'फोर्ब्स'नुसार, देशातील सर्वाधिक श्रीमंताच्‍या यादीत 11 व्‍या क्रमांकवर असलेले गुजरातचे उद्योगपती गौतम अदानी गर्भश्रीमंत उद्योजक आहेत. कोळशाच्या खाणी, विद्युत निर्मिती, लॉजिस्टिक्स, रियल एस्टेट, एग्रो प्रॉडक्ट्स, ऑइल व गॅस सारख्या क्षेत्रात त्यांच्या कंपन्या आहेत. अदानींच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 30,000 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

Team YS Marathi
29th Jun 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

ही काही सर्वसाधारण यशोगाथा नाही. ही एक असामान्य कहाणी आहे अशा माणसाची ज्याने दबून राहण्यास विरोध केला आणि उद्योगाच्या जगतात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. गौतम अडाणी, संस्थापक आणि अध्यक्ष अदानी  समूह जो भारतातील सध्याचा आघाडीच्या उद्योगांपैकी एक गणला जातो.

इतर अनेक उद्योजकांप्रमाणे अडाणी यांना त्यांच्या शक्ती आणि स्थान वारश्यातून मिळालेले नाही. परंपरागत गुजराती-जैन कुटुंबातून आलेल्या गौतम यांच्या रक्तातच ते ‘धंद्याचे’ कौशल्य आहे ज्याचे इतरांना अनुकरण करावेसे वाटते. त्यांचे माता-पिता शांताबेन आणि शांतीलाल अदानी यांनी उत्तर गुजरातच्या थारद या छोट्याश्या गावातून अहमदाबाद येथे स्थलांतर केले ते आठ मुलांच्या उज्वल भवितव्यासाठीच. 

फोटो सौजन्य बिझनेसटुडेडॉटइन

फोटो सौजन्य बिझनेसटुडेडॉटइन


गौतम यांनी आपले शालेय शिक्षण शेठ सीएन विद्यालय अहमदाबाद येथून पूर्ण केले आणि नंतर त्यांनी स्वत:च गुजरात विद्यापीठातून वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. बीकॉम करत असताना अकाउन्टस आणि बँकिंग विषयात ते फार काळ रमले नाही. त्यावेळी त्यांच्या लक्षात येऊ लागले की हा काही त्यांच्यासाठीचा विषय नाही. त्यापेक्षा आपला वेळ चांगल्या आणि मोठ्या कामी यावा असे त्यांना वाटू लागले. त्याचवेळी दुस-या वर्षात असताना अदानी यांना धक्का बसला त्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले आणि केवळ खिशात शंभर रुपये घेऊन त्यांनी मुंबईची स्वप्ननगरी गाठली. त्यांच्या नशीबाची गाठ त्यांच्या महिंद्रा बंधू यांच्याकडील पहिल्याच नोकरीत पडली. व्यवसायाचे 'a' टू 'z' पर्यंतचे बारकावे शिकून घेत असतानाच त्यांनी त्याचवेळी बदलत्या बाजाराच्या नोंदी घेण्यास सुरुवात केली. झवेरी बाजारात त्यांनी मग स्वत:चा हि-याच्या दलालीचा उद्योग सुरु केला. पहिल्याच वर्षी त्यांनी लाखोंची कमाई केली. त्यांच्या आयुष्यातील ही पहिली यशाची मोठी झेप होती.

वर्षभरानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधु महासुख अदानी यांनी अहमदाबाद मध्ये प्लास्टिक उद्योग सुरू केला आणि त्यांना विनंती केली की घरी परत येऊन त्यात लक्ष घालावे. गौतम यांच्या जीवनात हाच ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. पॉलिव्हिनल क्लोराईड औद्योगिक जगतातील महत्वाचा कच्चा माल आयात करण्याचा त्यांचा निर्णय महत्वाचा ठरला. त्याने त्यांच्या जागतिक बाजारातील धाडसाची प्रचिती दिली.

जागतिक आर्थिक उदारीकरण गौतम यांच्यासाठी वरदानच ठरले. ज्या स्थितीचा फायदा त्यांना बाजारात झाला. त्यांनी १९८८मध्ये अदानी  समूहाची स्थापना केली. त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांत झटपट बहुराष्ट्रीय व्यापारी पेढ्यांचे महामंडळ बनलेल्या या समुहाने आधी शेती आणि ऊर्जा या क्षेत्रात जम बसविला. १९९१च्या सुमारास कंपनीने स्त्रोत आणि शक्ती यांच्यात चांगली वृध्दी केली. गौतम यांना विश्वास होता की हीच वेळ कंपनीचा विस्तार आणि वाढीसाठी योग्य होती. त्यानंतर अदानी समुहाने विस्तारीत उर्जाक्षेत्र आणि वाहतुकीच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्याचबरोबर वीज निर्मिती आणि पारेषणासहीत,कोळसा व्यापार उत्खनन वाहतूक, नैसर्गिक वायुवहन, तेल आणि वायु उत्खनन त्याच बरोबर बंदरेविकास आणि विशेष आर्थिक क्षेत्र. असंख्य लक्षावधी डॉलर्सच्या या गुंतवणूकीसोबतच या उद्योगांच्या मालकाने या क्षेत्रांचे नेतृत्व केले पण गौतम यांनी आपल्या पूर्वीच्या दयनिय स्थितीला लक्षात ठेवले. अशा प्रकारे सारे काही समाजाला परत देण्याचे त्यांनी ठरविले तेच त्यांच्या पत्नी प्रीती अदानी यांच्यासोबत, ज्या दंतवैद्य आहेत आणि अडाणी समुहाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त देखील आहेत. अदानी समुह अनेक वैचारिक बांधिलकी असलेल्या संस्था आणि शिक्षण, सामाजिक आरोग्य, यथायोग्य जीवनमान विकास आणि ग्रामीण पायाभूत सुविधा विकासातील संस्थांशी जोडल्या गेल्या आहे. त्यांचा दृष्टीकोन आहे की, “ समाजाच्या विकासाच्या टप्प्यावरील अडथळ्यांना दूर करण्याची बांधिलकी, त्याचसाठी परिपूर्णतेने स्वयंसिध्द विकासाचा प्रयत्न करणे, त्यातूनच जीवनमान उंचाविणे”

गौतम यांचा विकासांच्या कामातही सरकार सोबत न्यायाचा झगडा झाला आहे. त्यांच्या काही जमिनीच्या व्यवहारातून वादंग निर्माण झाले आहेत ज्यांची योग्यपणाने मंजूरी झाली नाही. त्याचबरोबर अनेक उद्योगांच्या प्रकल्पांना राज्य सरकारी पर्यावरण विभागाच्या परवानग्या नसल्याने उच्च न्यायालयात दावे दाखल झाले आहेत.

असे असले तरी गौतम यांनी त्यांच्या उंचीने या सा-यांचा मुकाबला केला आहे. “ सरकारसोबत व्यवहार म्हणजे तुम्हाला लाचच द्यावी लागेल असे काही नाही”, असे त्यांना अनेक कार्यक्रमात बोलताना ऐकले असेल. हे सारे असले तरी गौतम यांनी सज्जन जिंदल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जेडब्ल्यु स्टिल यांना सोबत घेऊन उडपी येथे सहा हजार कोटी रुपयांच्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी यशस्वीपणे पाऊल टाकले आहे. अशी वदंता आहे की, गौतम यांनी हा कठीणातील कठीण सौदा केवळ दोन दिवसांत निश्चित केला!

त्यांच्या ५४व्या वाढदिवशी, आम्ही गौतम अदानी यांच्या प्रेरक जीवन प्रवासाला आणि कठोर परिश्रमातून मिळवलेल्या यशश्रीला करारीपणाच्या निर्धारपूर्वक उभ्या असलेल्या दिपस्तंभाला सलाम करतो. ते जसे नेहमी सांगतात की, यशाची गुरुकिल्ली दडली आहे सातत्यपूर्णतेने काहीतरी शिकत राहण्यात. त्यांचा हा मंत्र घेऊनच त्यांची वाटचाल सुरू आहे आणखी लक्षावधी डॉलर्सच्या उद्योगांना गवसणी घालण्यासाठी!

या सारख्या आणखी काही यशस्वी उद्यमींच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

शिक्षण अर्धवट सोडलेल्या उद्योजकाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतातील ३% जनता करते करभरणा 

वाहनचालक ते पुरस्कारप्राप्त उद्योजक, श्रीलंकेतल्या शरण्यन शर्मा यांची यशोगाथा

शेतकऱ्याचा मुलगा ते ४०० दशलक्ष ग्राहकांपर्यंत इंटरनेट टीव्ही सेवा पुरवणारे उदय रेड्डीं

लेखिका : संजना रे

अनुवाद : नंदिनी वानखडे -पाटील

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags