संपादने
Marathi

A3 Performance! फिटनेसमध्ये दक्ष, खेळाकडे लक्ष!!

Chandrakant Yadav
2nd Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

अश्विनी जयसिंहा आणि साई प्रसन्न हे दोघे बालमित्र आहेत. दोघांना खेळात कमालीचा रस. अश्विनी बास्केट बॉल खेळायची तर साईने क्रिकेटमध्ये आपला जोर आणि कौशल्य आजमावलेले. शालेय शिक्षण आटोपल्यानंतर पदवीसह त्यांनी क्रीडाविषयक अभ्यासालाही सुरवात केली. साईने बीकॉम करत असतानाच एक फिटनेस कोर्सही सुरू केलेला होता, तर अश्विनी स्पोर्टस् सायकॉलॉजी (क्रीडा मानसशास्त्र) शिकायला म्हणून विदेशात गेलेली.

शिक्षण एकदाचे आटोपल्यावर आता दोघांनी मिळून आपले स्वत:चे एखादे काम सुरू करावे, असे ठरवले. आणि अशा प्रकारे फेब्रुवारी २०१३ मध्ये A3 Performance चा जन्म झाला.

खेळाडू आणि फिटनेसबद्दल जागरूक असणाऱ्यांसाठी A3 Performance एक आदर्शवत असे ठिकाण आहे. फिटनेस जोपासू इच्छिणाऱ्यांना आपले इप्सित साध्य करण्यासाठी स्वत:वरच अवलंबून राहावे लागते. दैनंदिन धावपळीत आरोग्य सुदृढ ठेवायचे, देहयष्टी मजबूत ठेवायची तर दुसरे कोण काय मदत करणार? आणि म्हणून A3 Performance अशा मंडळींच्या मदतीला तत्पर असते. फिटनेस सेंटर म्हणून A3 Performance चे अस्तित्वात येणे ही स्वत:चा मेक-अप स्वत:च करण्यासारखी एक प्रक्रिया होती. अश्विनी यांनी दोन क्रीडाप्रकारांतून आपल्या राज्याचे प्रातिनिधित्व केलेले होते आणि अवघे आयुष्य खेळालाच वाहिलेले. कुठल्याना कुठल्या खेळाशी संबंधित असणे, सतत सरावात असणे हे आपल्यासाठी आवश्यक नव्हे तर अनिवार्य आहे, याची जाणिव अश्विनी यांना चांगलीच होती. त्या सांगतात, ‘‘आम्ही A3 Performance ची सुरवात करताना त्याला एक काम किंवा मग केवळ एक अर्थार्जनाचे साधन असे समजलोच नाही. ते आमचे ‘पॅशन’ होते. त्याला आम्ही आमचा जीव की प्राण असेच मानले.’’

image


‘ए-३ परफॉर्मंस’ची दोन प्रमुख कार्यक्षेत्रे...

क्रीडाविषयक प्रदर्शन : हे साहजिकच खेळांसंबंधीचे प्रशिक्षण आहे. उदाहरणार्थ क्रिकेटचे विशेष प्रशिक्षण. अत्युच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण. खेळादरम्यान मार लागू नये म्हणून घ्यावयाच्या काळजीचे आणि प्रतिबंधात्मक उपायांचे प्रशिक्षण तसेच क्रीडाविषयक मानसशास्त्राची खेळाडूंना मदत. हे सगळे यात समाविष्ट आहे.

व्यक्तिमत्वाशी निगडित वैयक्तिक प्रदर्शन : एकट्याने करावयाचे प्रयत्न, वेळेचा सदुपयोग. व्यायामातले टायमिंग, योग्य आणि रितसर प्रशिक्षण. संपूर्ण शरीराचा व्यायाम.

फिटनेसबद्दलची जागरूकता ही पाश्चिमात्य देशांतून सर्वसामान्य बाब आहे. आता आपल्या देशातही तरुण वर्गात यासंदर्भातली जागरूकता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

A3 पारंपरिक व्यायामशाळेहून जरा वेगळी आहे. व्यक्तीच्या प्रकृतीनुसार वेगवेगळे नियम इथे आहेत. सडपातळ व्यक्तीसाठी वेगळ्या प्रकारातले व्यायाम सुरवातीला करायला सांगितले जातात. व्यक्तीत काय बदल अपेक्षित आहेत, त्या हिशेबाने व्यायामाचे प्रकार आणि प्रमाण इथे प्रशिक्षकांकडून ठरवले जाते.

A3 एखाद्या विशिष्ट खेळासाठी आहे तशीच ती फिटनेससाठीही आहे. खेळाचा विषय निघतो तेव्हा क्रिकेटचीच आपल्याकडे जास्त चलती असते. नंतर मग फुटबॉल आणि टेनिसचा क्रमांक लागतो.

अश्विनी सांगतात, ‘‘आम्ही प्रत्येक खेळाडूची संपूर्ण काळजी घेतो. खेळाडूंना मानसिकदृष्ट्याही सक्षम बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो. खेळाडूंना जे जे अपेक्षित आहे, ते ते सारे देण्याचा आमचा प्रयत्न असतो. फिटनेस अपेक्षित असणाऱ्यांसाठी तर आम्ही सर्वोत्तम आहोत. अत्यंत अनुकूल वातावरण आम्ही त्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे.’’

A3 कडून बंगळुरूत इनडोअर तसेच आउटडोअर अशी दोन्ही प्रकारे क्रीडांगणे तसेच व्यायामाची साधने उपलब्ध करून दिली जातात. त्यानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. एक वर्षापासून इथे खेळाडू तसेच फिटनेसप्रेमींना मार्गदर्शन, प्रशिक्षण प्राप्त होते आहे.

आजकाल सर्वांचीच जीवनशैली बदललेली आहे. धावपळ आहे. तणाव आहे. अशा वातावरणात स्वत:चे आरोग्य सांभाळणे हे एक आव्हानच बनलेले आहे. प्रकृती सुदृढ असेल तर कुठलेही काम मग ते नोकरीतले का असे ना अधिक क्षमतेने माणुस करू शकतो, हे सगळ्यांनाच आता कळू लागलेले आहे. म्हणून फिटनेस सेंटर हे एक उद्यमाचे उत्तम क्षेत्र म्हणून अलीकडच्या काळात नावारूपाला येऊ लागलेले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानानेही या क्षेत्रासाठी मोलाचा हातभार लावलेला आहे. आरोग्यासंबंधीच्या क्रियाकलापांना कधी नव्हे इतका वेग सध्याच्या काळात आलेला आहे. या क्षेत्रात विकास आणि संशोधन जोमाने सुरू आहे.

A3 performance ची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. प्रशिक्षकांची एक चांगली टिम या सेंटरकडे आहे. प्रत्येक प्रशिक्षक आपापल्या क्षेत्रातील विशेषज्ञ आहे. सभासद ग्राहकांना उत्तम सेवा त्यांच्याकडून दिली जात आहे. सध्या बंगळुरूतील केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देणे, यावरच सेंटरने आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. इथले सगळे स्थिरस्थावर झाल्यावर अन्य ठिकाणीही सेंटर सुरू केले जातील.

Website: http://a3performance.in/

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags