संपादने
Marathi

आत्महत्याग्रस्त विदर्भात, एका साध्या बियाणे महोत्सवाने जीवदान दिले

Team YS Marathi
11th Mar 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

भारतात गेल्या काही वर्षात आपण अनेकदा शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त ऐकले आहे. असे असले तरी या आत्महत्या टळाव्या म्हणून एक महोत्सव दरवर्षी अयोजित केला जातो. या महोत्सवाला बिजोत्सव म्हणतात, आणि बिजोत्सव समूह त्याचे आयोजन करतो. हा बियाणांच्या प्रदर्शन आणि विक्री यांचा कार्यक्रम असला तरी त्यात शेतीला केंद्रस्थानी मानून त्यासाठी आवश्यक सर्व समस्या आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने जसे की, विविध बियाणे, शेती उत्पादने, पुस्तके यांच्यासह पाहूणे आणि शेतकरी यांच्यात संवाद होतो. येत्या ७ ते ९ एप्रिल दरम्यान नागपूरात हा महोत्सव होणार आहे.

आत्महत्यांची वाढती संख्या ही विदर्भात खरेतर सर्वाना शरमेची बाब म्हटली पाहिजे, १९९५नंतर सुरू झालेल्या या आत्महत्या २०१३मध्ये अगदी कळसाला पोचल्या होत्या, असे पी साईनाथ यांचे मत आहे. या काळात सुमारे ६०७५० शेतकरी शेतीमधील समस्यांचा गुंता पाहून या टोकाच्या निर्णयाप्रत पोहोचले होते. या मध्ये सरासरी ३६८५ शेतक-यानी त्यांची जीवनयात्रा दरवर्षी संपविली. हे खरेतर विश्वास बसणार नाही असे वाटते परंतू याचा अर्थ गेल्या दहा वर्षात रोज किमान दहा शेतकरी मृत्यूला कवटाळत होते असा होतो.


image


या आत्महत्यांची काही कारणे देखील आहेत, राष्ट्रीय कृषी धोरण, किमान हमी भाव, महागडी बियाणी, खते, किटनाशके, आणि खार्चिक शेती व्यवसाय, इत्यादी. या शिवाय हवामान बदलांच्या परिणामामुळेही या शेतीवर परिणाम झाला आहे, त्यामुळे सात त्याने नापिकी होते, मातीचा दर्जा घटल्याने पिक येत नाही, आणि किडींच्या हल्यात पिके नष्ट होतात त्यामुळे हाती काही लागले नाही तरहा शेतकरी जगणार कसे या चिंतेने हताश होवून आत्महत्या करतो.

जनुकीय बदल करून तयार केलेल्या कपाशीच्या बियाणामुळे यातील बराच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, देशाच्या कपाशी लागवडी पैकी ९० टक्के याच कापसाची लागवड होते, बहुतांश गुजरात, महाराष्ट्र, आणि आंध्रप्रदेशात यांची लागवड करतात. मात्र याचा उपयोग केल्यानंतर दीर्घकालीन नुकसान कसे होते हे सांगितले जात नाही.

जरी बियाणे महाग असले, तरी ते लहान मध्यमवर्गीय शेतक-यांच्या आवाक्या बाहेर असते. महत्वाचे म्हणजे या बियाणांचा पुन्हा वापर करता येत नाही. जीएम कपाशीचे बियाणे मध्ये अश्या प्रकारच्या उणिवा नाहीत. शेतकरी त्यांच्या शेतीमधील बियाणे नेहमी पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवत असतो, पण ते शक्य होईनासे झाले. जि एम कपाशीच्या पेरण्यांनंतर येणा-या उत्पादनाने ही शेतक-यांचे समाधान होत नव्हते, कारण त्याच्या लागवडीच्या खर्चाच्या तुलनेत ते नव्हते. बाजारातील किमती आणि कर्जाचा बोजा यांच्या कात्रीत सापडून शेतकरी हवालदिल होते. त्यामुळे त्यापैकी बरेचजण आत्महत्या करत होते.

हे समजून घेतले पाहिजे की देशात आजही शेती हाच प्राधान्याचा व्यवसाय आहे, लोकांच्या जगण्याचे ते साधन आहे. हेच बिजोत्सव समूहाने जाणले, आणि या प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी अनेकांचे सहकार्य घेतले. या मागची संकल्पना अशी आहे की यातून प्रेरणा घेवून इतरांनी देखील असे आयोजन करावे. आणि त्यातून लोकांच्या रोजच्या जीवनाचा हा भाग व्हावा जेणेकरून त्यांना आत्महत्या न करता या विविध पर्यायांची मदत होवू शकेल.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags