संपादने
Marathi

ऑस्ट्रेलियन विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी पाण्यातील क्षार वेगळे करण्याची पध्दत विकसित केली

Team YS Marathi
21st Mar 2017
Add to
Shares
5
Comments
Share This
Add to
Shares
5
Comments
Share

जगभरात क्षार युक्त पाण्याची समस्या ही पाण्याच्या प्रदुषणाचा सर्वात मोठा प्रकार आहे. २००७मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की, जगभरात ७० देशातील १३७ दशलक्ष पेक्षा जास्त लोक या समस्येने ग्रस्त आहेत. असे असले तरी ऑस्ट्रेलियातील संशोधकांच्या एका चमूने हा प्रश्न मार्गी लावण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी पाणी शुध्दीकरण यंत्रणा उभारली जात असून पुन्हा वापर करण्याजोग्या पाण्यावर प्रयोग केले जात आहेत. हेच बहुदा सर्वाधिक स्वस्त आणि सहजपणे उपलब्ध होणारे तंत्र असून त्यातून या धोक्याची सूचना देणा-या प्रश्नावर नियंत्रण मिळवता येणार आहे. 


Source : A Global Village

Source : A Global Village


सध्या, या पध्दतीचा वापर जमिनीखाली असलेल्या पाण्यातून क्षार वेगळे करून ते पिण्यायोग्य करण्यासाठी गाळणीतून वाहून नेवून केले जाते. या प्रक्रीयेत पाण्यातील गाळ आणि हानीकारक पदार्थ वगळून क्षार वेगळे केले जातात.

युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी सिडनी (यू टी एस) येथील खास चमू खास प्रकार च्या नव्या पाणी गाळण्याच्या पध्द्तीला विकसीत करण्यासाठी प्रयत्नरत आहे. यासाठी पाच लाख डॉलर्सचा खर्च अपेक्षित असून क्षार वेगळे करून पाणी पिण्यायोग्य बनविले जाते. यामध्ये भारतीय वंशाचे प्रो. सर्वनामुथ विग्नेश्वरन आणि डॉ. व्हिन न्यूग्यूयेन हे अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधक प्रमुख आहेत. त्यांनी हे तंत्रज्ञान व्हिएतनामच्या रेड रिव्हर डेल्टा मध्ये विकसित केले आहे. प्रमुख संशोधक विग्नेश्वरन यांनी सांगितले की, “ या पध्दतीमध्ये तीन महत्वाचे घटक आहेत: सेंद्रीय मुलद्रव्य, टाकी किंवा ड्रम ज्यात ही मुलद्रव्य सोडली जातात, आणि शोषून घेणारे घटक जी स्थानिक औद्योगिक कच-यातून मिळणा-या घटकांपासून तयार केली आहेत. ही परवडण्यायोग्य पध्दत स्थानिक स्त्रोतामधून तसेच क्षारयुक्त किंवा पर्यावरणातून होणा-या पाण्याच्या प्रदुषणाला दूर करते, त्यामुळे आरोग्य आणि जीवनाचा स्तर उंचाविण्यास मदत होते.

या प्रकल्पातून लवकरच मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण होणार असून त्या बरोबरच त्यातून निर्माण होणा-या उत्पादनाला डिलर्सची गरज पडेल. यूटिएसच्या चमूने या प्रकल्पावर अनेक वर्षापासून खूप मेहनत घेतली आहे, आणि त्यासाठी खूप मोठे संशोधन करून ते प्रसिध्द केले आहे. (थिंक चेंज इंडिया)

Add to
Shares
5
Comments
Share This
Add to
Shares
5
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags