संपादने
Marathi

गुगलने मुंबईतील छोट्या आणि मध्यम उद्योगांना डिजीटली सक्षम करण्यासाठी शब्द खरा केला!

Nandini Wankhade Patil
22nd Apr 2017
Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share

भारतात छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना डिजीटली सक्षम करण्यासाठी गुगलने दिलेला शब्द अखेर पूर्ण केला आहे, त्यांनी एसएमबी हिरो या देशव्यापी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या देशव्यापी कार्यक्रमात त्यांच्या सोबत सहकार्य करणा-या एफआयसीसीआयने, एसएमबीचे वर्गीकरण तीन प्रकारात केले आहे. डिजीटलच्या माध्यमातून व्यवसायाचा शोध, डिजीटलच्या माध्यमातून व्यवसायातील बदल आणि महिलांना व्यवसायाचे नेतृत्व! आजपासून ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल त्यानी ‘एसएमबी हिरो’ज चे संकेतस्थळ g.co/smbheroes या संकेतस्थळावर संपर्क करावा. यासाठी अंतिम दिनांक २४ एप्रिल हा देण्यात आला आहे. यातून प्रत्येक वर्गातील एका विजेत्याला पाच विभागातून निवडण्यात येणार आहे, ज्यांची अंतिम निवड याच वर्षी दिल्ली येथे केली जाईल.


फोटो सौजन्य- गुगल  

फोटो सौजन्य- गुगल  


‘एसएमबी हिरोज चॅलेंज २०१७’ बाबत बोलताना शालिनी गिरिश, संचालक- गुगल विपणन विभाग म्हणाल्या की, “ लहान आणि मध्यम उद्योजक हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, ज्यांच्यामध्ये देशाला भविष्यात सक्षम करण्याचे सामर्थ्य आहे. आम्ही अशा व्यवसायांना पाठबळ देण्यासाठी प्रतिबध्द आहोत,जे उच्च दर्जाच्या डिजीटल प्रशिक्षणातून आणि साहित्यातून वृध्दी आणि विकास साधू शकतील. आमचा नवा उपक्रम एसएमबी हिरोज अशा लहान आणि मध्यम उद्योजकांना पाठबळ देत आहे ज्यांना डिजीटल उद्योगात गती आहे आणि जे भविष्याचा उज्वल मार्ग यातून इतरांना देखील घालून देवू शकतील”.

गुगल आणि केपीएमजी यांनी शोध घेतला त्यानुसार ‘इम्पॅक्ट ऑफ इंटरनेट ऍण्ड डिजीटायजेशन ऑन एसएसमबीज् इन इंडिया’ मध्ये ५१ लाख भारतीयांपैकी ६८ टक्के भारतीय ऑफलाईन आहेत. इंटरनेटच्या सुक्ष्म प्रभावाबाबत प्रकाश टाकताना या संशोधनात दिसून आले की छोट्याआणि मध्यम उद्योगांना डिजीटल माध्यमांशी जोडल्यास सकल राष्ट्रीय उत्पन्नात दहा टक्के वाढ अपेक्षित आहे, जी २०२० पर्यंत ४६-४८टक्के पर्यंत जावू शकते. ऑफलाइनच्या तुलनेत असे दिसून आले आहे की, डिजीटलच्या माध्यमातून छोटे आणि मध्यम उद्योग दुपटीने प्रगती साध्य करू शकतात. डिजीटलयुक्त व्यवसायाची वृध्दी ५२ टक्के होते तर त्याच वेळी ऑफलाईन उद्योगांची वाढ केवळ २९ टक्के होते असे दिसून आले आहे. या बाबतच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, डिजीटल बाबत कमालीचे अज्ञान असून कौशल्यांचा देखील आभाव आहे त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात ऑफलाइन राहिले आहेत.

ही पोकळी भरून काढण्यासाठी गुगलने डिजीटल ऑनलाइनला चालना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑफलाईन असणा-यांना मोबाईल प्रशिक्षण देवून हजारो भारतीय छोट्या आणि मध्यम उद्योजकांना हे कौशल्य अवगत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रशिक्षणाच्या विविध प्रकारच्या गरजा लक्षात घेता भारतातील लाखो उद्योजकांना ऑनलाइनच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम देण्यात येत आहे, तसेच ऑफलाईन आणि मोबाईल वरूनही दिले जात आहे. यातील ऑफलाईन प्रशिक्षण एफ आयसीसीआयच्या माध्यमातून दिले जात आहे, आणि त्यासाठी येत्या तीन वर्षासाठी देशातील ४० शहरातून पाच हजार कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. ऑनलाइन प्रशिक्षणात ९० स्वयंस्फूर्त व्हिडिओ शिकवण्यांच्या माध्यमातून दिले जात आहे, जे भारतात मोफत g.co/digitalunlocked  या संकेतस्थळावर दिले जात आहे. या शिकवणीतून वेब प्रेझेन्स, आणि ऑनलाईनच्या माध्यमातून व्यवसाय वृध्दी कशी करता येईल जेणेकरून ग्राहकांपर्यंत मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून कसे पोहोचता येते याचे शिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणा नंतर गुगल, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस आणि एफआयसीसीआय प्रमाणपत्र देणार आहेत. पुढील तीन वर्षात गुगल सोबत भागीदारी करून ४० भारतीय शहरात पाच हजार कार्यशाळा एफआयसीसीआय घेणार आहे.

याशिवाय, भारतातील मोबाईलधारकांसाठी गुगलने प्रिमीयर हा मोबाईल ऍप सुरू केला आहे, ज्यातून मुक्तपणे डिजीटल व्यवहार कसे करावे यांचे शिक्षण घेता येते ‘गुगल प्ले’ किंवा आयओएस मधून तो डाऊनलोड करून घेता येतो, प्रिमीयर ऑफलाइनसुध्दा काम करतो आणि तो इंग्रजी आणि हिंदीत उपलब्ध आहे याशिवाय त्यांच्या तमिळ, तेलगू आणि मराठी आवृत्या देखील लवकरच सुरू होत आहेत. मागील दोन महिन्यात प्रिमीयरला साडेपाच लाख लोकांनी डाऊन लोड करून घेतले आहे. ( साभार - सीएसआर )

Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags