संपादने
Marathi

शिकेल इंडिया, तरच तरेल इंडिया

11th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

प्रत्येक मनुष्याची वैचारिक पटली ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा भिन्न असते म्हणून काही लोकांसाठी नोकरी ही केवळ पैसे कमविण्याचे साधन आहे, पण काही जण हे आपले काम व आपली जबाबदारी समजून ते निगुतीने करतात. जे लोक केवळ पैशासाठी काम करतात भले ही प्रारंभी त्यांना लवकर यश मिळते पण ते एका जागेवर जास्त दिवस टिकून राहत नाही. पण काही जण आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेने लोकांची मन जिंकून घेतात. असे लोक आपल्या आजूबाजूला तसेच समाजासाठी एक उदाहरण बनतात. अशीच एक गुणी व्यक्ती अनूप पारीख जे टीच फॉर इंडिया या कार्यक्रमाद्वारे मुंबईमधील गोविंदी भागातल्या गरीब आणि झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या मुलांना शिकवण्याचे काम करीत आहेत. अनूप अमेरिकेमध्ये अकॅडमिक सल्लागार म्हणजे कौन्सलर होते. एकदा त्यांची भेट अशा मित्रांशी झाली जे टीच फॉर इंडिया आणि टीच फॉर अमेरिका यांच्याशी निगडीत होते. त्यांच्याशी चर्चेनंतर ते बरेच प्रभावित झाले आणि त्यांची मनोमन गरीब मुलांना शिकवण्याची इच्छा जागृत झाली व त्यांनी निर्णय घेतला की या कार्याला आपण पण हातभार लावायचा. त्यासाठी त्यांनी भारतातल्या गरीब मुलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. कारण अनूप यांचे पालनपोषण भारतातच झाले होते म्हणून त्यांना आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा जागृत झाली.


image


त्यानंतर अनूप भारतात आले व सन २०१० मध्ये टीच फॉर इंडिया ची शिष्यवृत्ती मिळवून मुंबई मधल्या गरीब मुलांना शिकवू लागले. पण त्यांनी निवडलेला मार्ग सोपा नव्हता, अनेक अडचणी आल्या. इथल्या शाळा व्यवस्थित नव्हत्या त्यामुळे अशा ठिकाणी शिकवणे अवघड होते. तसेच दररोज त्यांना नवीन समस्येला सामोरे जावे लागायचे.

प्रारंभी त्यांचा आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागला व त्यांना वाटायचे की ते अशा वातावरणात खरेच मुलांना शिकवू शकतील का? पण हळूहळू ते या वातावरणात रमू लागले. त्याचबरोबर मुलांबरोबर मैत्री करून त्यांनी अभ्यासाला रुचकर बनवून मुलांची अभ्यासातील गोडी वाढवली. त्यांना वाटायचे की मुलांनी अभ्यास हा आनंदाने केला पाहिजे त्याचे ओझे वाटता कामा नये. हळूहळू मुले त्यांच्याशी मिसळून वागू लागली व त्यांना शिक्षक न समजत मोठा भाऊ समजून सन्मान देऊ लागली. परिणाम स्वरूप मुलांना परीक्षेत गुण चांगले मिळाले.


image


अनूप सांगतात की ते परदेशात चांगला पैसा कमवू शकत होते पण त्यांना आपल्या गरजेपुरताच पैसा पाहिजे होता. चंगळवादी आयुष्यापेक्षा ते साधारण जीवन जगण्याला प्राधान्य देतात तसेच या कामाने त्यांना समाधान व शांती मिळते म्हणून टीच फॉर इंडिया च्या शिष्यवृत्ती नंतर काहीजण माघार घेतात पण ते ठाम राहून टीच फॉर इंडिया तर्फे गरीब मुलांना शिकवतच आहेत.

अनूप सांगतात की ‘प्रत्येक मुलात काहीतरी उपजत बुद्धी असते इतकेच नव्हेतर गरीब मुलांनी जीवनातले खाचखळगे जवळून बघितले असतात. त्यांना कल्पना असते की त्यांचे पालक कशाप्रकारे एक-एक पैसा कमावतात. पण बऱ्याच वेळा अनुभव व बुद्धी असूनदेखील गरिबीतून लवकर बाहेर येण्यासाठी ते चुकीच्या मार्गाला लागतात जे अतिशय त्रासदायक आहे’.

आणि अशाप्रकारे टीचर अनूप मुलांना योग्य मार्गदर्शन देणे ही आपली नैतिक जबाबदारी मानतात.

गरीब मुलांना प्रत्येक जागेवर अडचणींना सामोरे जावे लागते. सरकारने मुलांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत पण त्याची पूर्तता होत नाही आणि ज्या गोष्टी सहज होवू शकतात त्यांच्याकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे जो अतिशय चिंतेचा विषय आहे म्हणून प्रत्येकाने मिळून प्रयत्नशील असले पाहिजे. अनूप सांगतात की जेव्हा ते मुलांना शिकवतात तेव्हा ते सुद्धा मुलांकडून बरेच काही शिकत असतात. मुलांच्या जिज्ञासा व कुतूहल यांना उत्तर देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.

लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद :किरण ठाकरे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags