संपादने
Marathi

'आपण दुसऱ्याकडे नोकरी करून त्यांना का श्रीमंत बनवावे', प्रतीक दोशी, संस्थापक ‘चीकी चंक’

२०१४ मध्ये सुरु झाली ‘‘चीकी चंक’’ (Cheeky Chunk)....डिजाइनर छत्र्यांची नवनिर्मिती.... रोज ४०० छत्र्यांची होऊ लागली मागणी... ई-कामर्सच्या माध्यमातूनही केली जात आहे या छत्र्यांची विक्री...

Team YS Marathi
6th Aug 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

सगळ्यांनाच माहिती आहे की छत्रीमुळे ऊन-पावसापासून आपले संरक्षण होते. इतरांपेक्षा वेगळा विचार करणाऱ्या प्रतिक दोषी याने छत्री व्यवसाय करायचे ठरवले आणि काही महिन्यातच त्याने कमाल करत ३० लाख रुपयांच्या छत्र्यांची विक्री केली.

प्रतीक दोशी, संस्थापक,‘चीकी चंक’

प्रतीक दोशी, संस्थापक,‘चीकी चंक’


प्रतिकने वर्ष २०१४ मध्ये ‘चीकी चंक’(Cheeky Chunk) नावाची कंपनी सुरु केली. यापूर्वी त्यांने छोट्याश्या बाजारात अनेक प्रकारच्या छत्र्यांची विक्री केली. विक्री करत असताना त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याने नाविन्यपूर्ण डिझायनर छत्र्या तयार बनवायचे ठरवले, ज्याचे भाव सर्वसामान्य असतील. त्यासाठी त्याने पदव्युत्तर शिक्षणानंतर करत असलेली नोकरी सोडली. प्रतीकचे सांगतो की, डिझायनर छत्र्या तयार करण्याचा विचार त्यांच्या मनात दोन गोष्टींमुळे आला. एक म्हणजे या पद्धतीच्या छत्र्या यापूर्वी कोणीही तयार केल्या नव्हत्या आणि दुसरे म्हणजे त्याला हेही वाटत होते की आपण नोकरी करून दुसऱ्यांना का श्रीमंत बनवावे. प्रतिकला आठवते की, त्याने जेव्हा मित्रांसमोर हा प्रस्ताव ठेवला तेव्हा तेव्हा त्यांनी त्याची खिल्ली उडवली. कारण त्या सर्वांचे म्हणणे होते की, अशा पद्धतीच्या छत्र्यांची निर्मिती करून व्यवसाय केला जाऊ शकत नाही. त्याचे सर्वच मित्र एमबीए करून चांगली नोकरी करण्यात व्यस्त होते, मात्र प्रतिक शहरातील गल्लीबोळ्यात फिरत धक्के खात होता. कारण त्याला त्याने पाहिलेल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवायचे होते.

‘चीकी चंक’ छत्र्यांचे डिजाईन

‘चीकी चंक’ छत्र्यांचे डिजाईन


प्रतीकने सुरवातीला ५०० छत्र्यांची निर्मिती केली आणि त्याने आपल्या मित्रपरिवाराच्या सहाय्याने विक्री करण्यास सुरवात केली. यासाठी त्याने त्याच्या बचतीच्या पैशामधून १ लाख ३५ हजार रुपये खर्च केले. जे त्याने काॅलेजच्या दिवसात शिकवण्या घेऊन कमावले होते. या पैशांना त्याने छत्र्यांचे डिझाईन, निर्मिती आणि वेबसाईट तयार करण्यासाठी वापरले होते. त्याने त्याची कल्पना प्रत्यक्षात तर साकारली. मात्र त्याला फार पैसे कमावता आले नाही. तरीही प्रतीकने आपली जिद्द सोडली नाही. तो काम करत राहिला आणि आज त्यांच्या एमबीए झालेल्या मित्रांच्या तुलनेत तो पावसाळ्यातील तीन महिन्याच्या कालावधीतच दोन वर्षाचा पगार कमावतो. एक उत्तम छत्री तयार करण्यासाठी गरज असते एका हॅन्डलची, कपड्याची, फ्रेम प्रिंट आणि शिलाईची. सगळ्या वस्तू दर्जेदार असाव्यात म्हणून प्रतिक छत्रीची फ्रेम राजस्थान मधून मागवतो. या सर्व गोष्टी एकत्रित करून ते शिवणकाम करतात. प्रतिक सांगतो की, हे आपलं काम करून घेण्यासाठी त्याने प्रिंटर्सबरोबर खूप चांगल्या प्रतीचे संबंध प्रस्थापित केले. त्याला त्यांच्याशी गोड बोलून काम करून घ्यावे लागेल. एवढेच नाहीतर छत्र्या वेळेवर तयार करण्यासाठी अनेकदा त्याने आपल्या पाठीवर छत्रीला लागणारे कापड घेऊन कितीतरी किलोमीटर प्रवास केला. आज दररोज त्याला ४०० पेक्षा जास्त छत्र्या तयार करण्यासाठी ऑर्डर्स मिळत आहे. त्यांच्या छोट्याश्या टीमला एवढ्या ऑर्डर्स पूर्ण करणं कठीण जात आहे. कारण त्याच्या टीममधील सदस्यच छत्र्यांची पॅकिंग, दर्जा तपासणी, आर्थिक व्यवहार ही सर्व कामे पाहतात.

image


प्रतिकचे म्हणणे आहे, त्याला त्याच्या या व्यवसायातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. यासाठी तो गीतेतल्या पंक्तींचे उदाहरण देतो, “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” अर्थात तुम्ही कर्म करत रहा फळाची चिंता करू नका. ‘चिकी चुंक’ सात सदस्यांची एक छोटीशी टीम आहे. ज्यामध्ये दोन एमबीए इंटर्न्स पण सहभागी आहे. टीम मध्ये एक अकाऊंटन्ट आणि दोन जण छत्र्यांच्या निरीक्षणाचे आणि पॅकिंगचे काम पाहतात. प्रत्येक छत्री बारकाईने तपासली जाते. पावसाच्या पाण्यापासून बचाव करता येतो की नाही तसेच अन्य बाबींचीही तपासणी केली जाते.

image


‘चीकी चंक’ यांच्या मार्केटिंग मध्ये फोटाेग्राफी हा महत्वाचा भाग आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ५० टक्के मार्केटिंग हे आपले उत्पादन आणि ग्राहकच करत असतात. या व्यतिरिक्त ई-कामर्स प्लॅटफॉर्मचा वापर करण्यावरही त्यांचा अधिक जोर आहे. त्याचे म्हणणे आहे की, कोणतेही उत्पादन अपलोड करण्यासाठी १०० पेक्षा जास्त की-वर्डचा वापर करायला हवा. म्हणजे ग्राहक तुमच्या उत्पादनापर्यंत जलद गतीने पोहोचतात. त्याने सांगितले की जेव्हा त्याने अमेझॉनवर आपल्या छत्र्या विकण्यास सुरवात केली तेव्हा त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याने त्याच्या एका परिचित व्यक्तीला सांगितले की अमेझॉनच्या वेबसाईटवर जाऊन छत्री खरेदी कर तेव्हा लक्षात आले की छत्री वेबसाईटच्या विसाव्या पानावर आहे. मात्र तीन आठवड्याच्या आत त्यांच्या छत्र्यांनी पहिल्या पानावर आपले स्थान निर्माण केले. आज अमेझॉन डॉटकॉमवर चिकी चुंक हा सर्वात जास्त विक्री होणारा ब्रांड तयार झाला आहे.

image


प्रतिक सल्ला देतात की कधीही ग्राहकाला आपले उत्पादन खरेदी करण्यासाठी सांगू नका. त्यापेक्षा त्याचे लक्ष आपल्या उत्पादनाकडे कसे जाईल यावर जास्त लक्ष केंद्रित करा आणि असेच उत्पादन बनवा की लोक तुमच्या उत्पादनावर प्रेम करतील. ‘चीकी चंक’ चा फोकस यावरच असतो की लोक पावसात सुद्धा आनंदी राहतील. चिकी चुंक सध्या त्यांच्या वेबसाईट व्यतिरिक्त फ्लिपकॉर्ट, अमेझॉन, स्नॅपडील, आणि मुंबईच्या काही किरकोळ विक्रेत्यांमार्फत त्यांच्या उत्पादनाची विक्री करतात. या माध्यमातूनच त्यांना सर्वात जास्त मागण्या येतात. यावर्षी त्यांनी फक्त एक हजार छत्र्या विक्रीचे उद्दिष्ट ठेवले असताना आत्तापर्यंत इकॉमर्सच्या माध्यमातून सात हजार छत्र्यांची विक्री झाली असल्याचा ते दावा करतात.

यामध्ये टियर-२ आणि टियर-३ शहरातून खास मागणी आहे. ४० टक्के छत्र्या बिहार, छत्तीसगड आणि ओरिसा या राज्यात विकल्या गेल्या. प्रतिक यांचा अंदाज आहे की, छत्र्या या गतीने जर विकल्या गेल्या तर वर्षाअखेर १० हजार छत्र्या विक्रीचा आकडा ते पार करतील.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया पासून मिळाली प्रेरणा, चार मित्रांच्या प्रयत्नांनी देशातील पहिली ग्रामपंचायत बनली फ्री वाय-फाय झोन

२४-२५ वर्षांचे पाच युवक, २५ दिवसांचे संशोधन, २५ दिवसांचे कामकाज आणि पुढील पाच वर्षात २५० कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचे लक्ष्य

सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन कोरफडच्या शेतीतून करोडपती झालेल्या हरिश धनदेव यांची प्रेरक कहाणी!

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : नंदिनी वानखडे -पाटील

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags