संपादने
Marathi

सामाजिक कार्यासाठी कॉर्पोरेट फंडा

29th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

१६ वर्षांच्या एका मुलानं अनाथ आश्रमातल्या एका भेटीत स्वता:शीच एक शपथ घेतली. अनेक वर्षांनंतरही तो त्या शपथेला जागला. वॉल स्ट्रीट मध्ये आणि जे.पी. मॉर्गनसारख्या कंपनीला यशस्वी वाटचालीत नेण्यासाठी खिंड लढवतानाही ती शपथ त्याच्या लक्षात होती आणि म्हणूनच तो परतला आणि आपल्या यशाचा उपयोग सत्कर्मी लावण्याचा ध्यासच पियुष जैन यांनी घेतला.

" त्या अनाथाश्रमात मी अक्षरशः हेलावलो. मला जाणीव झाली की मी किती नशीबवान आहे. मला घर आहे, कुटुंब आहे आणि शाळेत जाता येतं. मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि गुंतवणूक क्षेत्राकडे वळलो. वॉल स्ट्रीटवर काम करण्याचा अनुभव अतिशय रोमांचक होता. पण मला सतत हे जाणवायचं की आपल्यात असणाऱ्या वित्तीय कुशलतेचा आपण व्यापक अशा सामाजिक कार्यासाठी उपयोग करायला हवा " - पियुष जैन

सामाजिक उपक्रमांमध्ये अधिक प्रभावीपणे महसूल मिळवण्यासंदर्भातला सखोल अभ्यास करताना, पियुष जैन यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये एक संशोधन पत्रिकाही छापली ज्याच नाव होत, ' व्यापार उद्यमासाठी लागणाऱ्या अर्थव्यवस्थेचे नाविन्यपूर्ण पर्याय.' या संशोधन पत्रिकेनं त्यांना सिंगापूरला नेलं. इथे बीसीजीमध्ये उद्योग जगतातील मोठमोठ्या नावांची ओळख त्यांना झाली . त्यांनी दोन शक्यता इथे पडताळून पहिल्या, 'सामाजिक परिणाम करार ' आणि ' क्राऊडफंडींग . अर्थात भारतात , पहिला पर्याय चालवणे अशक्य असल्याचं त्यांनी ताडलं, आणि दुसरा पर्याय ज्याने अमेरिकेसारख्या देशात प्रचंड प्रसिद्धी मिळवली , भारतात मात्र अत्यंत संथ अशी वाटचाल या पर्यायात दिसून आली. कारण जिथं निधी मिळू शकतो तिथंपर्यंत न पोहोचणे.

imageक्राऊडफंडींग संदर्भात तुम्हाला माहिती का नव्हती ?

या लोक सहभागाची तीन महत्त्वाची सूत्रं आहेत. पहिलं म्हणजे सामाजिक किंवा धार्मिक कार्यासाठी निधी देणाऱ्या भारतीयांचा आकडा तब्बल ३५० दशलक्ष इतका आहे, जी संपूर्ण अमेरिकेची लोकसंख्या आहे.

पियुष जैन यांच्या संशोधनानुसार स्मार्ट फोन ही भारतीयांची चौथी गरज बनल्यापासून भारतात इंटरनेटचं जाळ अधिक विस्तारलं. ब्रॉडबॅँड सेवेचा आवाका फारसा नसला तरी दर तीन महिन्यात मोबाइल इंटरनेट सुविधा वापरणारे सुमारे २० दशलक्ष ग्राहक वाढताहेत. अनेक अत्याधुनिक पाश्चात्य देशांपेक्षाही भारतात ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डसारख्या प्लास्टिक पैशाचा आवाका अनेक खिशांमध्ये नसला तरी डिजिटल पाकीट मात्र ही समस्या निश्चित सोडवतायत .

सामाजिक उद्यामासाठी लागणारा महसूल गोळा करण्याचे मार्ग शोधताना पियुष याच्या असं लक्षात आलं की, त्यांना लागणारा बराचसा खर्च कमी केला जाऊ शकतो आणि त्या बदल्यात परिणाम मात्र दुपटीने जाणवतो .

" लोक सहभाग हे आपल्या रक्तात शतकानुशतके चालत आलं आहे. आपल्याकडे फक्त तशी यंत्रणा उपलब्ध नव्हती. मला आठवतंय, शाळेत आम्हाला निरनिराळ्या शिबिरांसाठी निधी गोळा करावा लागत असे. तोही , दारोदार जावून, फॉर्म्सवर सह्या गोळ्या करून. आजही बऱ्याचश्या स्वयंसेवी संस्था, कॉल सेंटर आणि दारोदार जाऊन निधी गोळा करण्यावर भर देताना दिसतात. पण यासाठी बराच खर्च अपेक्षित असतो . आणि जमा केलेला निधी हा या निधी गोळा करण्याच्या खर्चावरच अधिक जातो. हा खर्च म्हणजे अवाढव्य उधळपट्टी आहे जी या संस्था एरवी सत्कारणी लावू शकल्या असत्या.

इम्पॅक्ट गुरु :

पियुष यांच्या इम्पॅक्ट गुरूचं बीज हावर्ड इनोवेशनमध्ये वर्षभरापूर्वी रोवण्यात आली ज्याची ओळख, डिजीटल लोक सहभाग तंत्र आणि अन्य विविध निमित्तांसाठी अशी ठरली. या तांत्रिक व्यासपीठामुळे त्यांचा कमिशन म्हणून अन्य संस्थाना द्यावा लागणारा खर्च वाचतो. सोशल मिडियाचा प्रभावी वापर यावरच इम्पॅक्ट गुरूचं हे व्यासपीठ आधारलेलं आहे.

" सोशल मिडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे इतका की आज प्रत्येकाची फेसबुक वॉल ही एक मौल्यवान अशी स्वतःची मालमत्ता आहे की ज्याचा वापर योग्य सामाजिक कारणांसाठी होऊ शकतो." – पियुष जैन

त्यांनी गरजू अशा संस्थाचा भक्कम डेटाबेस तयार केला आणि त्याची अत्यंत चिकित्सक पद्धतीनं चाचणी केली, ज्याचे निकष हे पारदर्शकता, परिणाम, एफसीआरए कायद्याअंतर्गत असणारी वैधानिक मान्यता असे होते. या पडताळणी नंतर तब्बल नव्वद टक्क्यांपेक्षांवर खऱ्या उतरलेल्या ३० संस्था आज त्यांच्या व्यासपीठावर आहेत.

या व्यासपीठाचं तीनच आठवड्यांपूर्वी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. तेव्हापासून सुमारे तीन लाखांचा निधी त्यांच्या व्यासपीठावर उपलब्ध असणाऱ्या विविध संस्थांसाठी जमा झाला आहे.

" ऑनलाईन दान ही संकल्पना अद्यापही भारतात म्हणावी तेवढी रुजलेली नाही. लोकांना या आभासी जगाचा आणि बिनचेहऱ्याच्या व्यवहाराबद्दल अद्याप शंका आहेत आणि त्यामागची कारणही योग्य आहेत. बनावट स्वयंसेवी संस्थांच्या नावे होणाऱ्या फसवणुकीच्या घटना नवीन नाहीत. त्यामुळे आम्ही आमच्या व्यासपीठावर असणाऱ्या संस्थांच्या बाबतीत पूर्ण पडताळणी आणि शहानिशा करून त्या संस्थांची ओळख करवून दिली आहे. ज्यामुळे लोकांचा दान या संकल्पनेवरील विश्वास दृढ होईल. अगदी आपल्या जवळच्या स्थानिक संस्थानाही त्यांच्या विश्वासार्तेमुळे मदत करायला लोक कचरतात, पण आमचं म्हणणं असं आहे की इम्पेक्ट गुरुवर विश्वास ठेवून लोकांनी सामाजिक कार्यात आपला सहभाग वाढवावा " असं मत पियुष व्यक्त करतात .

image


दुहेरी फायदा:

एकीकडे नफा मिळवणं आणि दुसरीकडे हाती घेतलेल्या उपक्रमांना प्रभावीपणे राबवणं असं दुहेरी लक्ष्य साध्य करत आर्थिक गणिताचं कोडं इम्पॅक्ट गुरुनं सोडवलंय. " जेपी मॉर्गनसारख्या संस्थेचे महासंचालकांनी आमची पाठराखण केली. सिक़्वियाच्या अध्यक्षांनी आम्हाला निधी पुरवला आणि या बळावर आम्ही आमचा हा अत्यंत वेगळा प्रवास सुरु केला आहे. अर्थात दात्यांनाही त्यांच्या दानाच्या बदल्यात काहीतरी हवं असत, आजचा जमाना हा पैसे परत मिळणे या सूत्राचा आहे हे हेरून अन्य सुविधांबरोबरच ८०जीचं प्रमाणपत्र दिलं जातं. तरीसुद्धा पियुष यांना निव्वळ मोठ्या संस्थाना आपलं व्यासपीठ द्यायचं आहे असं मुळीच नाही तर , निधीची गरज असणाऱ्या अगदी छोट्या शिबिरांना, लहान संस्थाना आणि लोकांनाही हे व्यासपीठ उपलब्ध करवून द्यायचं आहे. यामुळं त्यांना आपली शिबीरं सुरु करता येतील आणि त्यांची कार्याची आखणी प्रमाणबद्ध करता येईल .

" ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे व्यासपीठ आहे . निधी उभारण्यासाठी असणाऱ्या या व्यासपीठावर स्वतःचा मंच तयार करणं हे फक्त ५ मिनिटाच कामं आहे. त्या बदल्यात ते विविध कॉर्पोरेट क्षेत्रात विनावेतन इंटर्न म्हणून काम करू शकतात. अश्या अगणित संधी उपलब्ध आहेत"

सीएसआर म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रेस्पोन्सीबिलिटी हे प्रत्येक कंपनीसाठी सक्तीचे आहे . पण मोठ्या कंपन्यांनी स्वत:च्या संस्था आधीच उभारल्या आहेत. तरी छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या इम्पॅक्ट गुरुशी भागीदारी करू शकतात आणि त्यांच्या सीएसआरची जबाबदारी आउटसोर्स करू शकतात. कंपन्यांनी ज्या सामाजिक कार्याला मदत करण्याच ठरवलं आहे, त्याच्या विपणन व्यवस्थेची जबाबदारी घेऊन सोशल मिडियावर त्याचा प्रसार करणं हे देखील आलंच.

त्यांच्या प्रयत्नांतून जगात ‘स्मित’ फुलवण्यासाठी त्यांच्याकडे अजून एक कारण आहे.

स्माइल :

इम्पॅक्ट गुरु हे जगातलं अशाप्रकारचं पाहिलं व्यासपीठ आहे जे दर फेसबुक शेअर करणाऱ्याच्या वतीने धर्मादाय पद्धतीने सोशल मिडियाच्या माध्यामातून दान करत . प्रत्येक शेअर मागे या डोनेशन ची किंमत १००० रुपयाहून अधिक असू शकते(अटी लागू) आणि हा छोटासा प्रयास आम्ही स्माइल या नावाने सुरु केला आहे. स्माईल म्हणजे सोशल मिडिया इम्पेक्ट लीन्कड एन्गेजमेन्ट.

"खरतर १०० लोकांपैकी फक्त दोनच जण या डोनेशन व्यासपीठावरील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करतात. त्यामुळं अशी योजना बनवलीय ज्यात आम्ही प्रत्येक भेट देणाऱ्याला प्रोत्साहित करतो आणि त्यामुळे प्रत्येक कॅम्पेन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतं. फेसबुकच्या शेअरींगमुळं कमी अधिक प्रमाणात दानात भर पडते अर्थात त्याच्या काही अटी ही असतात.”

आइस बकेटसारख्या आव्हानाबद्दल बोलताना ते म्हणतात," प्रत्येक सहभागी धारकाने निधी दिला असं नाही, पण या कॅम्पेनला लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर वेळ आणि जागा दिली आणि हे व्हायरल झाल्यानं फक्त एक महिन्यात १५० दशलक्ष डॉलर्स जमा झाले."

"म्हणजे तसं बघायला गेलं तर, कोणत्याही मोहीमेसाठी ज्याला ५०० शेअर आणि २० डोनेशन मिळतील तेव्हा आम्ही आमचं कमिशन शुल्क १०% वरून ५%पर्यंत कमी करून या पद्धतीने हा निधी दान करतो”.

मैलाचा दगड :

इंडस एक्शन ही कंपनी वंचित मुलांच्या शिक्षण हक्कासाठी कार्यरत आहे , याकंपनीच्या निधी उभारणीसाठीचा इम्पेक्ट गुरुनं १९ सप्टेंबरला राबवलेला उपक्रम एक मैलाचा दगड ठरला. त्यांनी ग्रामीण क्षेत्रातील मुद्द्यांकडे शहरी लोकसंख्येचं लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांनी एक दुवा साधण्याचा प्रयत्न केला. " ९०% दात्यांना शिक्षण हक्क कायद्याची माहितीच नव्हती की ज्यामुळे, सामान्य पार्श्वभूमी असणारा विद्यार्थीही चांगल्या शाळेत शिक्षण घेऊ शकतो." पियुष म्हणाले .

आणि मार्ग सापडला - मुंबईतल्या अशा ठिकाणी जिथं विविध गटातले उद्योजक एकत्र येतात अशा ठिकाणी तिकीट विक्री करणे, ज्यामुळे फक्त एका संध्याकाळी ८५,००० रुपयांचा भक्कम निधी जमा झाला, ज्यामध्ये ४० मुलाचं शिक्षण होऊ शकतं.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags