संपादने
Marathi

प्रेसो- एक नाविन्यपूर्ण प्रयोग

8th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

लॉंड्री... आपल्या रोजच्या आयुष्यातील ही एक महत्वाचीच गरज म्हणावी लागेल... परिसरातील धोब्याने घरी येऊन, कपडे घेऊन जाणे आणि दुसऱ्या दिवशी धुऊन- इस्त्री करुन परत आणून देणे... ही आपल्यासाठी अगदी रोजचीच एक घडामोड.. त्यात नविन किंवा विचार करण्यासारखे काही असेल, असे आपल्याला वाटतही नसते. पण अमनदीप भाटीया यांना मात्र या व्यवसायातील काही उणीवा प्रकर्षाने जाणवल्या आणि त्यानंतर सुरु झाला एका आगळ्यावेगळ्या स्टार्टअपचा रंजक प्रवास...

समस्येची जाणीव :

स्थानिक लॉंड्री सेवा ही काळाची गरज आहे याची जाणीव अमनदीप भाटीया यांना झाली, ती स्वच्छता आणि आरोग्यशास्त्राशी निगडीत विविध घटकांमुळे.... “ परिसरातील धोब्याकडून आमच्या कपड्यांची धुलाई करुन घेण्याची खटपट करत असताना, हे क्षेत्र कितीअसंघटीत आहे, हे आम्हाला जाणवत असे. स्थानिक लाँड्रीमालकांचे काम ग्राहकांच्या गरजेनुसार नव्हे तर त्यांच्याच सोयीने सुरु असे. मुख्य म्हणजे ज्या पद्धतीचे कपडे एकत्र केले जात आणि ज्यापद्धतीने ते धुतले जात, ते पहाता, यामध्ये योग्य प्रकारची स्वच्छता ठेवली जात नाही, असे म्हणण्यात काहीच वावगे नाही. बऱ्याचदा आम्ही हेदेखील पाहिले की स्थानिक धोबी लहानलहान मुलांनाच कपडे देण्यासाठी घरोघरी पाठवत होते. शहरी आयुष्यात लॉंड्री ही अतिशय आवश्यक सेवा आहे. त्यामुळे ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन काम करणारी अशी हायपर लोकल लॉंड्री सेवा सुरु करण्यामध्ये असलेली खूप मोठी संभाव्य क्षमता आम्ही ओळखली आणि प्रेसोचा (Presso) जन्म झाला,” ते सांगतात.

image


हनीवेल, रेनीशॉ आणि कॉग्निझंट यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अमनदीप हे उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम करत होते, मात्र आता त्यांनी आपले सर्व लक्ष हे आपल्या स्टार्टअपवर केंद्रीत केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच स्थापन झालेली प्रेसो ही स्थानिक विक्रेत्यांना एकत्र आणणारे एक व्यासपीठ म्हणून काम करते. अमनदीप सांगतात, “ आमचे ऍप वापरुन ग्राहक आपली मागणी नोंदवतात. आमचे अल्गोरिदमस् अर्थात क्रमवार कार्यसूची प्रमाणे जवळच्या डिलिवरी बॉयला किंवा भागीदार विक्रेत्याकडे ती मागणी सोपवतात आणि ते ग्राहकांनी दिलेल्या वेळेनुसार त्यांच्याकडून कपडे घेतात आणि पुन्हा नेऊनही देतात. आमच्या ऍपच्याच माध्यमातून ग्राहक आपल्या या मागणीत काही सुधारणाही करु शकतात तसेच या सगळ्याचा मागही ठेवू शकतात.”

आव्हानेः

कंपनीला सुरुवात केल्यापासून अवघ्या चार महिन्यांतच, दिल्ली स्थित प्रेसोला चटका जाणवू लागला तो असंघटीत कामगारांचा आणि स्थानिक कलाबाबत नसलेल्या जागृतीचा.... ते सांगतात, “ सोय आणि गुणवत्ता या दोन्ही दृष्टीने, नियमित सेवा आणि प्रिमियम सेवांमध्ये एक खूप मोठी आणि आवश्यक बाजारपेठ आहे.” भारतभर हा व्यवसाय वाढवूनच हे आव्हान हाताळण्याची अमनदीप यांची योजना आहे. “ सध्या आमचे सर्व लक्ष आहे ते विक्रेते आणि ग्राहक या दोघांनाही एक असे व्यासपीठ देऊ करणे, ज्यामाध्यमातून आम्ही गुणवत्ता, किंमत आणि सोयीबाबतचे ग्राहकांना दिलेले वचन पूर्ण करु शकू. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांचा विचार करुन छोट्या आणि मोठ्या विक्रेत्यांबरोबर भागीदारी करत वाढ करण्याचा आमचा इरादा आहे. आमची विक्रेता व्यवस्थापन टीम ही विक्रेत्यांशी संपर्क करते. आमचे ग्राहक ऍप, ऑपरेशन्स आणि वितरण व्यवस्था यांचे एक निश्चित मॉडेल असून वेगवेगळ्या क्षेत्रानुसार त्याचा वापर केला जातो,” ते स्पष्ट करतात.

अमनदीप यांच्या मते दोन घटक शहरी भारतीय लोकांचा स्वभाव स्पष्ट करतातः खर्चायोग्य उत्पन्नामध्ये झालेली वाढ आणि वेळेची कमी. “ त्याचबरोबर अधिक गुणवत्तापूर्ण सेवांच्या मागणीतही वाढ झालेली दिसून येते. या बाजारपेठेचे आयोजन करण्यासाठीची व्याप्ती आणि क्षमता जवळजवळ अमर्यादच म्हणावी लागेल,” ते पुढे सांगतात. अमनदीप यांच्या म्हणण्यानुसार सुरुवात केल्यापासून पहिल्या तीन महिन्यांतच प्रेसोकडे सुमारे तीन हजार मागण्या आल्या आणि आठवड्यागणिक तिची वेगाने वाढ होत आहे.

कंपनीला आरंभ झाल्यानंतर त्यांनी भांडवल उभारणी केली. “ त्यानंतर आम्हाला सनस्टोन कॅपिटलकडून एंजल फंडींग मिळाले, ज्यामुळे आम्हाला ही व्यवस्था स्थापन करायला आणि वेगाने वाढायला मदत झाली,” ते विस्ताराने सांगतात. अमनदीप आणि त्यांचे सहसंस्थापक सुभाषिश पटनायक, हे दोघे मिळून प्रेसो चालवितात. अमनदीप म्हणतात, “ आमची ताकद ही परस्परपूरक असल्याने, आमच्या स्टार्टअपशी संबंधित विविध बाजूंना भिडताना आम्हाला मदत होते.”

त्यांच्या मते स्टार्टअप सुरु करण्याबाबतची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे, वेगाने निर्णय घेण्याची आणि ते अंमलात आणण्याची त्यामध्ये असलेली क्षमता. “ मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत असताना या एका गोष्टीची कमी आम्हाला नेहमीच जाणवायची. तेथे निर्णय प्रक्रिया खूपच मंद गतीने चालते आणि बराच वेळ केवळ बोलण्यात किंवा चर्चेतच जातो. मी ग्राहकांच्या दृष्टीने विचार करणाऱ्या उत्पादन मानसिकतेतून आलो आहे आणि आमच्या स्टार्टअपद्वारे अखेर मला तो विचार पूर्णपणे अंमलात आणण्याची संधी मिळाली आहे,” अमनदीप सांगतात. त्यांना आतापर्यंत मिळालेला सर्वात चांगला सल्ला म्हणजे ग्राहकांसाठी कंपनी उभारा, गुंतवणूकदारांसाठी नको. “ आमचे सुमारे ४०-५० टक्के ग्राहक हे त्यांना आमच्याबद्दल सध्याच्या ग्राहकांनी दिलेल्या संदर्भातूनच आलेले आहेत आणि ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे,” ते सांगतात.

मोलाचा सल्लाः

अमनदीप यांच्या मते भारतीय अर्थव्यवस्था खुली झाल्यामुळे, त्यांच्या स्टार्टअपसारख्या स्टार्टअप्सचे भविष्य उज्ज्वल आहे. “ हायपर लोकल क्षेत्राची सखोल जाण असल्याने नविन सेवा सुरु करण्याची आणि वेगाने वाढण्याची मोठी संधी आहे,” ते पुढे सांगतात. त्यांच्यासारख्याच इतर व्यावसायिकांना त्यांचा सल्ला आहे, “ असा एक सहसंस्थापक शोधा ज्याची नजर तुमच्यासारखीच असेल आणि तुमच्या कौशल्यांना तो पुरक असेल. ग्राहकांचे खरे प्रश्न जाणून घेण्यावर आणि त्यांना काय पाहिजे यावर लक्ष केंद्रीत करा.”

लेखिका– राखी चक्रवर्ती

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags