संपादने
Marathi

ग्रामीण भारताचे चित्र बदलण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना मदत करणारी ʻहंस फाऊंडेशनʼ

Team YS Marathi
23rd Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

उत्तराखंड या राज्याबद्दल श्वेता रावत यांच्या मनामध्ये विशेष स्थान होते. उत्तराखंडच्या गल्लीबोळांमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या श्वेता यांच्यावर उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीचादेखील खोलवर परिणाम झाला. २ ऑन्स ५ अवर एनर्जी शॉट (ऊर्जा पेय) तयार केल्याने अमेरिकेत यशस्वी ठरलेले आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले उद्योजक मनोज भार्गव, यांना वाटत होते की, गरिबीचा सामना करताना जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. त्यामुळे गरिबीच्या संकटाचा सामना करत असलेल्यांना मदत करणाऱ्यांच्या हाती आपली संपत्ती जाणे गरजेचे असल्याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी २०१२ साली एक वचननामा साक्षांकित केला, ज्यानुसार ते त्यांच्या संपत्तीचा ९० टक्के भाग सामाजिक कार्यासाठी दान करणार होते. जेव्हा त्यांच्या या निःस्वार्थी वचननाम्याची आणि एका शेतकऱ्याच्या दृढनिश्चयाची गाठभेट झाली, तेव्हा स्थापना झाली ती ʻहंस फाऊंडेशनʼची (Hans Foundation). भारताच्या ग्रामीण भागाला समृद्ध बनवण्याकरिता ही संस्था कार्यरत असून, सध्या ती उत्तराखंड येथे काम करत आहे.

image


ʻमाझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी मनोज यांच्या कारकिर्दीचा विचार करत होते. मनोज हे आमच्या कुटुंबाचे चांगले मित्र आहेत. त्यांनी आमच्यासमोर संपत्ती दान करण्याबाबतचा विचार व्यक्त केला होता. कोणत्याही प्रकारच्या पारदर्शकता आणि जबाबदारीशिवाय खात्रीलायक निकाल मिळेल, अशाप्रकारे आपण दान करु शकत नाही, हा मुद्दा मी त्यांच्या निदर्शनास आणून दिला. तेव्हा आम्ही स्वतःची संस्था स्थापन करण्याच्या निर्णयावर पोहोचलो. ज्यामुळे आम्ही त्याचे परिणाम आणि आमच्या प्रयत्नांचे यश, याचा तपशील ठेऊ शकत होतो.ʼ, असे श्वेता सांगतात. आज हंस फाऊंडेशन ही देशात सर्वाधिक निधीचा पुरवठा करणारी संस्था आहे. आरोग्य, महिला सबलीकरण, जीवनशैली, अपंगत्व आणि शिक्षण क्षेत्रात ते निधी पुरवतात. श्वेता सांगतात की, ʻजातपात, आर्थिक स्तर, लिंगभेद आणि धर्म या पलीकडे जाऊन सर्वांना समान संधी देण्याचे आमचे प्राथमिक ध्येय आहे.ʼ

२००९ साली स्थापना केल्यापासून ते आजवर त्यांनी जवळपास २५० पेक्षा जास्त संस्थाना आर्थिक मदत केली आहे. त्या संस्थांचा सर्वाधिक प्रभाव पडावा म्हणून ते कार्यरत होते. अनेक संस्थांनी त्यांच्याशी फक्त आर्थिक मदतीकरिता संपर्क साधला. मात्र त्या संस्थांची सत्यता पडताळूनच ते त्यांना मदत करत असत. मनोज यांची कंपनी अमेरिकन असल्याने, स्वयंसेवी संस्थांना त्यांच्याकडून निधी मिळवण्याकरिता प्रमाणित असणे, अनिवार्य होते. ʻआर्थिक मदतीव्यतिरिक्त आम्ही त्यांच्या सेवेतदेखील सहभागी होत होतो. अनेक संस्थांना आम्ही त्यांच्या दैनंदिन मोहिमेकरिता सहाय्य पुरवतोʼ, असे ते सांगतात.

image


या संस्थेची सहकारी संस्था असलेली अमेरिकन इंडिया फाऊंडेशनसोबत (एआय़एफ) चर्चा करुन आम्ही त्यांचे गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये असलेले नाते समजून घेण्याचा प्रय़त्न केला. गेल्या १४ वर्षांपासून एआय़एफने भारतातील जवळपास २.५ दशलक्ष लोकांचे जीवन पालटले आहे. २०१८-२०१९ पर्यंत हाच आकडा ५ दशलक्षपर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे. हंस फाऊंडेशन गेल्या सात वर्षांपासून एआयएफचे भागीदार आहेत. एआय़एफच्या LAMP (लर्निंग एण्ड मायग्रेशन) कार्यक्रमास हंस फाऊंडेशनने सहकार्य़ केले होते. या कार्य़क्रमात स्थलांतरीत लोकांच्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षात आम्ही सामंजस्य कराराची पाच वर्षे पूर्ण केली आहेत. ज्यात उत्तराखंडमधील ८० शासकीय शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटल इक्वलायझर कार्य़क्रमांर्तगत मदत करण्यात आली आहे. तसेच एआय़एफच्या MANSI (मॅटर्नल एण्ड न्यू बोर्न सर्व्हावल इनिशिएटीव) कार्य़क्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे लक्ष्य उत्तराखंडातील नवजात शिशू आणि माता यांचा मृत्यूदर कमी करण्याचे आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख भागीदार कोका कोला, सीएनएन आयबीएन, जीओआय यासहित टीएचएफ हेदेखील आहेत. या कंपन्या वीर (Veer) या कार्यक्रमांतर्गत अपंगत्वाचा सामना करणाऱ्या दोन हजार लोकांना प्रशिक्षण देणार असून, त्यानंतर ते त्यांना नोकरीची संधीदेखील उपलब्ध करुन देणार आहेत, असे या संस्थेचे संस्थापक सांगतात.

image


हंस फाऊंडेशनने आपल्या पूर्ण क्षमतेने आपला विस्तार केला आहे. त्यांच्या या कार्य़ाचे चांगले पडसाद पश्चिम बंगाल आणि उत्तराखंड येथे पाहायला मिळाले आहेत. श्वेता सांगतात की, ʻएका प्रकल्पाकरिता मला अंजलीचा अभिमान वाटतो. मानसिक आणि बौद्धिक अपंग असलेल्या लोकांच्या मानसिक आरोग्य संस्थेकरिता कौशल्य विकासाकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले होते. ʻधोबीघाटʼ नावाचा प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही त्यांना मदत केली.ʼ अक्षय पत्रावन नावाच्या अजून एका प्रकल्पाचा श्वेता उल्लेख करतात. या प्रकल्पाशी ते जोडले गेलेले असून, दक्षिण भारतात ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या आर्थिक सहकार्य़ाने अक्षय पत्रावन ही संस्था ५० हजार लोकांना मध्यान्ह भोजन पुरवते. स्थानिक संस्थांसोबत जोडले गेल्याने या संस्थेचा फायदा अनेक लोकांना झाला आहे.

जेव्हा हंस फाऊंडेशन आणि उत्तराखंड सरकारने सामंजस्य करार साक्षांकित केला, तेव्हा सामाजिक उपक्रमात सक्रिय असलेल्या श्वेता यांचा उद्योजकतेचा प्रवास प्रकाशझोतात आला. यामुळे जवळपास ५० बड्या स्वयंसेवी संस्था एका छताखाली आल्या. हंस फाऊंडेशनने आरोग्य, शेती, शिक्षण, वन, पाणी तसेच अपंग कल्याणाकरिता आजवर जवळपास ६०० कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे.

लेखक - बिंजल शाह

अनुवाद - रंजिता परब

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags